१६ जून १९६३, जगभरात या तारखेनंतर महिलांचा सन्मान अधिक वाढला गेला आणि महिलांसदर्भात उपस्थितीत करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले. या दिवशी सोवियत संघात एक गरिब घरात जन्म घेतलेल्या आणि सामान्य दिसणाऱ्या मुलीने अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. वेलेंटीना टेरेश्केवा (Valentina Tereshkova) असे त्यांचे नाव आहे. त्या अंतराळात झेप घेणाऱ्या पहिल्या महिला सोवियत आंतराळवीर होत्या. १६ जून १९६३ रोजी वेलेंटीना यांना स्पेसक्राफ्ट वोस्तोक ६ वर एका सोलो मिशनवर लॉन्च केले होते. वेलेंटीना यांनी पृथ्वी भोवती फेरी प्रदक्षिणा घालून तेथे ७० तासांहून अधिक वेळ घालवला होता.(First women in space)
वेलेंटीना यांचा जन्म ६ मार्च १९३७ च्या मध्य रशियातील बोल्शॉय मास्लेनिकोवो गावात झाला होता. त्यांची आई एका फॅक्ट्रीत काम करायची आणि वडिल ट्रॅकर चालक होते. त्यांना नंतर दुसऱ्या महायुद्धादरम्यान एक महान नायक म्हणून ओळखले गेले. परंतु जेव्हा वडिलांचे निधन झाले तेव्हा वेलेंटीना या फक्त दोन वर्षांच्या होत्या.
हे देखील वाचा- दुरावलेल्या माय -लेकी जेव्हा 64 वर्षांनी भेटतात…

वडिलांच्या निधनानंतर वेलेंटीना यांची शाळा सुटली. त्यामुळे आयुष्य जगायचे म्हणजे पैसे हवे. म्हणून वेलेंटीना यांनी आपल्या आईसोबत फॅक्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच वेलेंटीना यांना पॅराशूटिंगची आवड होती. वेलेंटीना यांनी मे १९५९ मध्ये २२ व्या वयात पहिल्यांदाच उंच झेप घेत एक लोकल फ्लाइंग क्लब मध्ये स्काइडायविंग करणे सुरु केले. एका आंतराळवीर महणून निवड होताना सुद्धा त्या एका स्थानिक कारख्यात कर्मचारी रुपात काम करत होत्या.
वेलेंटीना यांची निवड झाल्यानंतर सोवियत वायुसेनेसह त्यांनी १८ महिने ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंगदरम्यान, त्यांनी एक्स्ट्रिम ग्रॅव्हिटी, आपत्काळावेळी काय करावे आणि त्याचा सामना कसा करायचा, आंतराळात आयसोलेशन कसे असेल याबद्दल शिकवले गेले. अवघ्या २४ वर्षातच त्यांना मोठ्या सन्मानाने सोवियत वायूसेनेत सहभागी करण्यात आले. वेलेंटीना आता सुद्धा सर्वाधिक कम वय असलेल्या महिला आणि आंतराळात झेप घेणाऱ्या पहिल्या नागरिकाचा पुरस्कार त्यांच्या नावे आहे.(First women in space)
३ दिवसांसाठी जेव्हा वेलेंटीना पृथ्वी ग्रहाच्या बाहेर होत्या तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवली. तर सोवित संघातील सर्वात प्रसिद्ध मुलगी म्हणून त्या धरतीवर परतल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वेलेंटीना यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आले आहे. त्यांनी रशिया आणि ग्लोबल काउंसिल या दोघांसाठी प्रमुख राजकिय पदांवर काम केले आहे. १९६६ मध्ये वेलेंटीना यांना जागतिक शांती परिषदच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. आज ८५ वर्षीय वेलेंटीना रशियात आंतरराष्ट्रीय प्रकरणांच्या समितीसाठी उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच आंतराळवीर स्पेस कम्युनिटीमध्ये सुद्धा खुप सक्रिय आहेत.