Home » मराठीतला पहिला रॉकस्टार !

मराठीतला पहिला रॉकस्टार !

by Team Gajawaja
0 comment
Sadananda Atmaram Bhende
Share

सदानंद आत्माराम भेंडे टोपण नाव नंदू भेंडे मुळचे ज्युईश मराठी म्हणजेचे बेने इस्राईली कम्युनिटी ! ५०-६० च्या दशकात जेव्हा रॉक आणि पॉप म्युझिकचं वारं संपूर्ण जगावर पसरलं होतं, त्याचदरम्यान १९५६ साली त्यांचा जन्म झाला होता. मराठी सोडा बॉलीवूडलाही अशा प्रकारच्या म्युझिक बनवायला ६० वर्ष उजाडली. मुंबईअशी अनेक कलाकारांची सुद्धा आई याच आईने नंदू भेंडे यांना रॉक म्युझिकचं खूळ लावलं. वडील आत्माराम भेंडे हे हेसुद्धा Theatre Actor ! तर प्रसिद्ध कवी आणि लेखक निस्सीम एझीकील हे त्यांचे मामा ! पहायला गेल तर कलेचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. त्यामुळे आपणसुद्धा काहीतरी वेगळ करावं, असं भेंडे यांना वाटलं आणि त्यांची गाडी वळली रॉक म्युझिककडे. (Sadananda Atmaram Bhende)

त्याकाळी रॉक म्युझिकचा भारतावर इतका पगडा नव्हता. अनेकांना वाटायचं ही फक्त इंग्रजी आणि श्रीमंतांची गाणी आहेत. त्यात सूर ना ताल, काहीतरी विचित्र ओरडून गाण्याला संगीत कोण म्हणत, असं सगळ्यांना वाटायचं. पण हा  Barrier मोडून काढण्याचं काम नंदू भेंडे यांनी केलं. शास्त्रीय संगीत आवडायचं, पण आपण त्याच्या पलीकडे जायचं, असं नंदू यांनी ठरवलं. ७०च्या दरम्यान नंदू भेंडे यांनी मराठी रॉकची तार छेडली आणि चक्क मराठीमध्ये रॉक म्युझिक अवतरली. भावगीतांच्या काळात लोकांना रॉक गाण्यांची ओळख करुन दिली. त्यांनी मुंबईतच पहिल्यांदा रॉक म्युझिक ऐकलं होत. त्यावेळी जिम मॉरीसनचा बँड द डोर्स, द व्हू, द मुडी ब्लूज, रोलिंग स्टोन्स, जिमी हेंड्रीक्स, क्रीडेन्स क्लिअर Water रीव्हायवल या सर्वांची प्रचंड क्रेज होती. (Social News)

या सगळ्यांपासून Inspire होऊन आपणसुद्धा मराठीत काहीतरी युनिक करायचं असं भेंडे यांनी ठरवलं. ७०च्या दशकातच आपल्या काही साथीदारांसह त्यांनी वेलवेटे फॉग नावाचा बँड सुरु केला. या बँडचे मेंबर रॉक म्युझिकची गाणी बनवायला लागली. म्युझिक कल्चर जरी वेगळ असलं तरी त्यांची कपड्यांची स्टाईल पूर्णपणे भारतीय होती. लांब केस, कुर्ता आणि कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पोशाख… त्यांच्या ‘गेट Organized’ या अल्बममधलं नो वे इट्स बॉम्बे हे गाणं तुम्ही ऐकू शकता यानंतर त्यांनी Atomic Forest, Brief Encounter आणि Savage Encounter असेही बँड तयार केले आणि गाणी बनवण सुरु ठेवलं. (Sadananda Atmaram Bhende)

पण त्यांना खरी फेम तेव्हा मिळाली, जेव्हा ते Acting मध्ये वळले. १९७४ साली त्यांनी अॅगलेक पदमसींच्या ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ या नाटकात ज्युडासची भूमिका केली होती, ती खूप गाजली. त्यानंतर पु.ल. देशपांडे यांच्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या म्युझिकल ऑपेरामध्ये त्यांनी अंकुश ही भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी मराठी रॉक आणि पॉप म्युझिकचा पहिला प्रयोग केला. ‘गेलो होतो रानात’, ‘आपल्या आयुष्यात प्रेम येत’, ‘असा कसा घोळ होतो’,अशी अनेक मराठी पॉपची गाणीसुद्धा म्युझिक लव्हर्सच्या पसंतीला पडली. यानंतर त्यांची गाडी बॉलीवूडकडे आली. मिथुनच्या ‘डिस्को डान्सर’ या मुव्हीमध्ये बप्पी लाहीरिंसोबत त्यांनी ‘क्रिश्ना धरती पे आजा’ हे गाण गायलं. यानंतर आर. डी. बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा फेमस म्युजिक डिरेक्टर्ससोबत त्यांनी काम केलं. अनेक टीव्ही सिरियल्सलाही त्यांनी आपली म्युझिक दिली होती. त्यांचं एक मराठी पॉप गाण तुम्ही ऐकू शकता. (Social News)

‘डिस्को डान्सर’ या मुव्हीनंतर भारतात रॉक, पॉप आणि हाउस म्युझिकची भर पडली. पण म्हणायला गेलं, तर बॉलीवूडच्याही आधी हा प्रयोग नंदू भेंडे यांनी सुरु केला होता आणि तोसुद्धा मराठीत  तसं भारताचा पहिला रॉकस्टार शम्मी कपूर यांना म्हटलं जायचं. पण शम्मी कपूर हे केवळ अभिनेते होते आणि गाण्यांमध्ये ते Acting करायचे, गाणी गात नव्हते. पण भेंडे गाणी गाण्यापासून Acting सुद्धा करत होते. त्यामुळे भारताचा पहिला रॉकस्टार नंदू भेंडे यांना म्हटलं, तरी वावगं ठरणार नाही. म्युझिक इंडस्ट्रीत आपली छाप पडल्यावर ते म्युझिक सॉफ्टवेअरकडे वळले आणि १९८७ साली स्वत:ची ‘म्युझिक सॉफ्टवेअर’ याच नावाची संगीत-निर्मिती कंपनी काढली. यानंतर १९९२ मध्ये त्यांनी ‘स्पेक्ट्रम मल्टिमीडिया’ ही कंपनी स्थापन केली. (Sadananda Atmaram Bhende)

====

हे देखील वाचा :  चीनमध्ये सोन्याचा पाऊस !

========

यापैकी स्पेक्ट्रमने एफएम रेडिओसाठी मराठी आणि कोकणी भाषेत प्रोग्राम सुरु केले. नंदू भेंडे हे केवळ म्युझिकचेच वेडे नव्हते, तर म्युझिकच्या मागचं सायन्स काय, याचही त्यांना आकर्षण होत. नव्वदीनंतर म्युझिकमधले प्रयोग भारतभर प्रचंड वाढल आणि हा मराठीतला पहिला रॉकस्टार हळू हळू धूसर व्हायला लागला. अनेकांना आपल्या लक्ष्याचं ‘मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं हे गाण माहितच आहे. पण हे गाण खर तर नंदू भेंडे यांना डेडीकेट करायला हवं. कारण त्यांनी या इतक्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत रॉक आणि पॉप म्युझिक दार उघडलं. आज अनेक मराठी लोकांना हा रॉकस्टार माहित नाही. ज्याप्रमाणे मराठी माणसाने इंडियन सिनेमाचा पाया रचला, त्याचप्रमाणे भारतात रॉक म्युझिकचा पाया नंदू भेंडे यांनी रचला होता. त्यामुळे काही का असेना, या महान कलाकाराचा आजच्या पिढीला विसर न पडावा, इतकच. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.