बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात शिरून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. चोराने सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला केल्यानंतर ते स्वत: तातडीने रुग्णालयात दाखल झाले. या सर्व गदारोळात आरोपी फरार आहे. सैफ अली खान यांचा दुश्मन कोण? बिश्नोई गॅंगनेचा हा हल्ला घडवून आणला आहे. अशा अनेक चर्चा या घटनेनंतर झाल्या. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. पण संपूर्ण घटना नेमकी कशी झाली? चोराला सेफ अली खानच्या मुलांच्या रूम कुठे आहेत हे कसं माहिती होतं? या सर्व प्रश्नांची उत्तर, जाणून घ्या… (SaifAliKhan)
सैफ अली खान मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथे ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीत ११ आणि १२ व्या मजल्यावर त्यांचं घर आहे. घराबाहेर नेहमी पहारेकरी असतात. बॉडीगार्ड्स असतात. तरी या सर्वांना चुकांडा देऊन हा चोर त्यांच्या सोसायटीत शिरला. काळी पॅन्ट, शर्ट आणि पाठीवर बॅग तोंडाला कपडा गुंडाळून हा चोर Fire exitच्या जिन्यांनी वर ११ व्या मजल्यावर हा चोर पोहचला. जिथे तीन खोल्या आहेत. एक सैफ आणि त्यांची पत्नी करीना कपूर खान यांची, दुसरी त्यांचा मुलगा तैमूर आणि त्याची आया गीता यांची आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा जहांगीर आणि त्याची आया एलियम्मा फिलिप आणि जुनू. (SaifAliKhan)
एलियम्मा फिलिप यांनी दिलेल्या जबाबानुसार, रात्री ११ वाजता त्यांनी जहांगीरला झोपवलं आणि त्या सुद्धा त्याच खोलीत झोपल्या. रात्री २ वाजता आवाज झाला म्हणून त्या उठल्या. बघितलं तर खोलीचा दरवाजा उघडा होता. त्यांना वाटलं करीना ह्या मुलांना पाहायला आल्या असतील. पण जेव्हा त्या झोपेतून उठून बसल्या तेव्हा त्यांना बथरूम मध्ये कोणतरी उभं असल्याच जाणवलं. ते त्या व्यक्तीला पाहण्यासाठी जात होत्या. तेवढ्यात तो माणूस हातात काठी आणि धारदार हेक्सा ब्लेड होतं. तो बाथरूममधून बाहेर येऊन जहांगीरच्या पलंगाकडे जात होता. तसं फिलिप यासुद्धा जहांगीरला वाचवण्यासाठी त्याच्य पलंगाकडे धावल्या, त्यांना पाहून त्या माणसाने शांत राहण्याचा इशारा केला. त्यावेळी दुसऱ्या आया जुनू या पण जाग्या झाल्या. त्या माणसाने पुन्हा धमकावलं, “कोई आवाज नहीं, और कोई बहार भी नहीं जाएगा” असं तो म्हणाला. तेव्हा फिलिप यांनी त्याला विचारलं काय हवं आहे? त्यावर तो म्हणाला पैसा चाहीए. मग पुन्हा फिलिप यांनी त्याला विचारलं किती? तर तो म्हणाला, १ करोंड. त्यानंतर फिलिप यांनी जहांगीर कडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या अज्ञात माणसाने फिलिप यांच्यावर धारदार ब्लेडने वार केला. त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना आणि उजव्या हताला इजा झाली. त्यानंतर जुनूने मदतसाठी जोरजारत आवाज केला. तेव्हा सैफ आणि करीना हे दोघ तिथे धावत आले. सैफ अली खान हे जसे त्या खोलीत शिरले तसं त्या अज्ञात व्यक्तीने हेक्सा ब्लेडने त्यांच्यावर हल्ला केला आणि नंतर आया गीता हिला पण मारलं. तेव्हा सैफ आणि गीता यांनी त्याला खोलीत ढकलून दरवाजा बंद केला आणि ते १२ व्या मजल्यावर गेले. आवाज ऐकून घरतले चार कर्मचारी सुद्धा जागे झाले. जेव्हा ते त्या खोलीत गेले जिथे त्या हल्लेखोराला बंद ठेवलं होतं, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाला होता. या इमारतीतून आरामात खाली उतरत होता. तेव्हा cctv मध्ये त्याचा चेहरा दिसला. (Social News)
त्यानंतर सैफच्या घरच्यांनी त्यांना रिक्शाने हॉस्पिटलमध्ये पोहचले, सैफ अली खानच्या हाताला आणि एक मानेच्या उजव्या बाजूला आणि पाठीवर गंभीर जखम झाली होती. पाठीच्या कण्यामध्ये एक तीक्ष्ण वस्तू अडकली होती, जी खूप खोलवर गेली होती, लवकरात लवकर सर्जरी करून ती रात्रीच काढण्यात आली. सर्जरीनंतर आता सैफ अली खान यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (SaifAliKhan)
या प्रकरणावर करीना कपूर खान यांनी “आमच्या कुटुंबासाठी हा एक अविश्वसनीय आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही जे काही घडलं ते पचवण्याच प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी सातत्याने अंदाज बांधणे आणि कव्हरेज टाळावे.मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या सीमांचा आदर करा आणि कुटुंब म्हणून आम्हाला बरे होण्यासाठी आणि सामना करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ द्या.” असं सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. त्याची चौकशी सुद्धा करण्यात येत होती. अटककेलेल्या व्यक्तीवर ५ ते ६ घरफोडयांचे गुन्हे दाखल होते. पण अटक केल्यानंतर हा व्यक्ती तो नाहीच असं पोलिसांच्या लक्षात आलं आहे. तरी सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला करणार अज्ञात व्यक्ती अजूनही फरारच आहे. (Social News)
पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सैफ अली खान यांच्या घरात घुसणाऱ्या व्यक्तीने या आधी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी केली होती. असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्याचा आधी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात शिरण्याचा प्लॅन होता, असं बोललं जात आहे. तरी पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने त्या अज्ञात हल्लेखोराचा तपास करत आहेत. त्यासाठी पोलिसांची विविध शाखेची २० शोध पथक नेमली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तो अज्ञात हल्लेखोर हल्ला करून पळाल्यानंतर साधू वासवानी चौकात कपडे बदलून वांद्रे स्टेशन कडे जाताना दिसला होता. री हा अज्ञात हल्लेखोर सैफ अली खान यांच्या घरात चोरी करण्यासाठीच शिरला होता का? याचा सुद्धा तपास केला जात आहे. त्याशिवाय चोराला सेफ अली खानच्या मुलांच्या रूम कुठे आहेत हे कसं माहिती होतं? यात कोण घरातीलच कर्मचारी शामिल आहे का? याचा सुद्धा तपास घेतला जात आहे. (SaifAliKhan)
======================
हे देखील वाचा : Brahmaputra : ब्रम्हपुत्रवर चीनचं जगातलं सर्वात मोठं धरण…भारतासाठी धोका ?
======================
या प्रकरणावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. “या देशात सेलिब्रिटी आणि व्हीआयपी सुरक्षित नसतील, तर सामान्य लोकांच काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याआधी सलमान खानच्या घरा बाहेर बंदुकीची फायरिंग. नंतर भर रस्त्यात बाबा सीदीकी यांच्यावर गोळीबार आणि आता हे प्रकरण त्यामुळे खरंच मुंबई सारख्या शहरात सुद्धा कायदा सुव्यवस्था नाही आहे का? हा प्रश्न उभा राहतो आहे. (Social News)