आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा आता सर्वच क्षेत्रात प्रचार आणि प्रसार झाला आहे. फारकाय सौदर्यस्पर्धांमध्येही आता एआय सौदर्यवती भाग घेऊ लागल्या आहेत. हे वाचल्यावर आश्चर्य वाटेल. पण नुकतीच पहिली जागतिक मिस एआय स्पर्धा पार पडली. यात मोरोक्कोच्या एआय सौदर्यवतीला जागतिक मिस एआयचा बहुमान मिळाला. याच स्पर्धेत भारतील मिस एआय़ सौदर्यवतीनंही भाग घेतला होता. पहिल्या दहा सौदर्यवतींमध्ये तिचा समावेश झाला. एप्रिलपासून “Fanvue AI Creator Awards (WAICA)” नावाच्या संस्थेने ही स्पर्धा सुरु केली होती. (Morocco’s Kenza Layli)
व्हिज्युअल माध्यमातून झालेल्या या स्पर्धेनं तंत्रज्ञानाचे आधुनिक रुप जगासमोर ठेवले आहे. यासोबत या मिस एआय स्पर्धांमधील आणि नेहमी होणा-या स्पर्धेमधील फरकही स्पष्ट केला आहे. कारण या स्पर्धेची विजेती, मोरोक्कोची केन्झा लैली हिनं पहिल्याच मुलाखतीदरम्यान, ‘मी माणसांप्रमाणे भावूक होऊ शकत नाही, पण तरीही मी या विजयाने खूप आनंदी आहे.’ असे सांगून मानवी भावना आणि तंत्रज्ञान यातील फरक स्पष्ट केला आहे.
Fanvue AI Creator Awards या संस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक मिस एआय स्पर्धेत मोरोक्कोच्या सौदर्यवतीनं बाजी मारली आहे. मोरोक्कोची केन्झा ल्याली जगातील पहिली मिस एआय बनली. तिला २० हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चार्टमध्ये पहिल्या आलेल्या केन्झाने १५०० हून अधिक संगणक मॉडेल्सला मागे टाकून जगातील पहिली आभासी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चार्टमध्ये पहिल्या क्रमांकाची विजेती झालेली केन्झाचे लाखाच्यावर फॉलोअर्स सोशल मिडियामध्ये आहेत. या स्पर्धेत फ्रान्सची ललिना व्हॅलिना दुसऱ्या स्थानावर राहिली. तर पोर्तुगालची ऑलिव्हिया सी तिसऱ्या स्थानावर राहिली. (Morocco’s Kenza Layli)
भारताची संगणक मॉडेल या स्पर्धेत पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवू शकली. इंस्टाग्रामवर केन्झा ल्यालीचे १ लाख ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. केन्झा या आपल्या फोलोअर्सना अन्न, संस्कृती, फॅशन, सौंदर्य आणि प्रवास याबद्दल माहिती देते. केल्या दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सोशल मिडियावर अँक्टीव्ह असते. विशेष म्हणजे, ही संगणक मॉडेल तिच्या फॉलोअर्ससोबत सात वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधते. आता सौंदर्यवतीचा किताब मिळाल्यावर ही एआय मॉडेल महिला सक्षमीकरणासाठी काम करणार आहे. सोबत पर्यवरणाचे रक्षणही करण्यासाठी आपल्या ऑलोअर्सना आवाहन करणार आहे. (Morocco’s Kenza Layli)
शिवाय केन्झा एआय तंत्रज्ञानाचा प्रचारही करणार आहे. यासाठी केन्झा म्हणते, एआय हे मानवी क्षमतांना पूरक बनवण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन आहे, त्यांना बदलण्यासाठी नाही. मानवाला आनंद ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केन्झानं केले आहे. फिनिक्स एआयचे सीईओ बेसा यांनी तिची निर्मिती केली आहे. केन्झामुळे मोरोक्कोच्या संस्कृतीला जागतिक स्थान मिळाल्यानं आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व पुढील वर्षात किती असणार आहे, हे स्पष्ट झाले. या स्पर्धेत भारतीय एआय मॉडेलचाही सहभाग होता. भारताची पहिली एआय मॉडेल झारा शतावरी यात होती. केन्झाप्रमाणे झारा शतावरी सुद्धा इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.
====================
हे देखील वाचा : WhatsApp Meta AI च्या मदतीने तयार करू शकता आपल्या पसंतीचा फोटो, जाणून घ्या प्रोसेस
====================
आत्तापर्यंत तिचे १४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. झारा नेहमी आपल्या फॉलोअर्सना फॅशन, फिटनेस आणि फूड बद्दल माहिती देते. तिने तणाव आणि चिंता यावर लेखही लिहिले आहेत. झारा शतावरी या एआय मॉडेलला भारतीय मोबाईल ॲड एजन्सीचे संस्थापक राहुल चौधरी यांनी तयार केले आहे. जागतिक पातळीवरील सौदर्य स्पर्धा जिंकू न शकल्याबद्दलही झारा निराश झालेली नाही. तिनं मिस एआय स्पर्धा न जिंकल्याबद्दल सकारात्मक पोस्ट केली आहे. त्यात चाहत्यांचे आभार मानून मी भारतातील एकमेव एआय मॉडेल अंतिम फेरीत सहभागी होते आणि हा इतिहासाचा एक भाग आहे जो कधीही बदलणार नाही, असा आशावाद व्यक्त केला आहे. (Morocco’s Kenza Layli)
Fanvue AI Creator Awards संस्थेनं ही स्पर्धा पहिल्यांदाच घेतली असली तरी त्याला जगभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यावरुन पुढील काळ हा एआय तंत्रज्ञानाचा असणार आहे, हा संदेश देण्यात आला आहे.
सई बने