आज अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळणाऱ्यामध्ये आर्टस शाखेचे 5957 विद्यार्थी, कॉमर्स शाखेचे18,109 विद्यार्थी तर सायन्स शाखेचे 15,626 विद्यार्थी आहेत. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून हा प्रवेश 3 सप्टेंबर 5 वाजेपर्यत घ्यायचा आहे. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या व इतर क्रमांकवरील कॉलेज मिळाल्यास व त्यांना प्रवेश घ्यायचा नसेल तर ते दुसऱ्या फेरीसाठी जाऊ शकतील.
मुंबईतील 11 वी प्रवेशासाठी नामवंत कॉलेजचा कट ऑफ या वर्षी सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत आहे.
या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये 1,17,520 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 40, 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजच्या कट ऑफमध्ये साधारणपणे 2 ते 4 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
मागील वर्षी दाहवीमध्ये अंतर्गत गुण नसल्याने दहावीचा निकाल कमालीचा घसरलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे यावर्षी तोंडी व इतर अंतर्गत गुण देण्यात आल्याने दहावी बोर्डाच्या निकालाची टक्केवारीतील झालेली वाढ बघता यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजचे कट ऑफ सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत असून मागील वर्षीच्या तुलनेत सुद्धा कट ऑफ मध्ये वाढ झालेली पाहायला मिळतीय. विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
मुंबईतील महाविद्यालयांचे कट ऑफ
एच आर कॉलेज –
कॉमर्स -93.8 टक्के
के सी कॉलेज
आर्टस् – 90.2 टक्के
कॉमर्स -92.2 टक्के
सायन्स – 89.4 टक्के
जय हिंद कॉलेज
आर्टस् – 92.6 टक्के
कॉमर्स – 92.6 टक्के
सायन्स – 89.4 टक्के
रुईया कॉलेज
आर्टस् – 94.2 टक्के
सायन्स – 94.8 टक्के
रुपारेल कॉलेज
आर्टस् – 91.2 टक्के
कॉमर्स -92 टक्के
सायन्स – 93.4 टक्के
मिठीबाई कॉलेज
आर्टस् – 89.4 टक्के
कॉमर्स -91.8 टक्के
सायन्स – 89.8टक्के
वझे केळकर कॉलेज
आर्टस् – 91.6 टक्के
कॉमर्स -93.6 टक्के
सायन्स – 94.4 टक्के
झेवीयर्स कॉलेज
आर्टस् – 94.6 टक्के
सायन्स – 91.4 टक्के
एन एम कॉलेज –
कॉमर्स -94 टक्के
पोदार कॉलेज –
कॉमर्स – 94.2 टक्के
अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
176
previous post