Home » ‘असा’ होता जगातील पहिला लॅपटॉप

‘असा’ होता जगातील पहिला लॅपटॉप

by Team Gajawaja
0 comment
First Laptop in World
Share

सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे काही गोष्टींमध्ये खुप बदल झाले आहेत. त्या वजनाने कमी आणि आकाराने ही लहान येऊ लागल्या आहेत. अशातच पूर्वीच्या काळी असणारे लॅपटॉप हे वजनाने अधिक होते. पण तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येत होता. सन १९८१ मध्ये बनवण्यात आलेला Osborne 1 हा जगातील पहिला वास्तविक मोबाईल कंप्युटर होता. त्याला Osborne Computer Corporation ने तयार केला होता. त्या काळात तो एक यशस्वी पोर्टेबल माइक्रोकंप्युटर होता. Osborne 1 मध्ये ५ इंचाची स्क्रिन दिली गेली होती. त्याचसोबत यामध्ये दोन फ्लॉपी ड्राइव्स, एक मॉडेम, बॅटरी पॅक आणि एक कीबोर्ड होता. (First Laptop in World)

अधिक होते वजन
आजच्या प्रमाणे जुन्या काळातील कंप्युटर हा वजनाने अधिक होता. त्याचे वजन जवळजवळ ११ किलोग्रॅम होत. म्हणजेच एक लॅपटॉपचे वजन हे पाच Macbook Pro समान होते. हे लॅपटॉप अधिक प्रसिद्ध झाले नाही. मात्र लोकांनी त्यामध्ये पहिल्यांदा पोर्टेबल पर्सनल कंप्युटरची ताकद पाहिली. पहिल्यांदा लोक कंप्युटर आपल्या सोबत घेऊन जायचे आणि प्रवास करता करता ते काम करायचे.

किती होती किंमत?
ज्यावेळी हा लॅपटॉप लॉन्च केला गेला तेव्हा त्याची किंमत १७९५ डॉलर म्हणजेच आजच्या काळातील १,४६,७७५ रुपये.

सन १९८३ मध्ये आला Grid Compass 1101
हा पहिला पोर्टेबल लॅपटॉप असून जे खरंतर लॅपटॉपसारखाच दिसून आला. याला १९८३ मध्ये लॉन्च केले गेले होते. यामध्ये क्लॅमशेल डिझाइन होती. म्हणजेच स्क्रिन फोल्ड होऊन किबोर्ड समोर यायची. आपल्या अधिक किंमतीमुळे हा लॅपटॉप प्रसिद्ध झाला नाही.

First Laptop in World
First Laptop in World

सन १९८९ मध्ये आले Compaq LTE आणि Compaq LTE 286
या काळापूर्वीच्या लॅपटॉपला एका लगेज प्रमाणे पाहिले जायचे. कारण ते सामान्य पीसीच्या तुलनेत पोर्टेबल तर होते. पण त्यांना सहन सोबत घेऊन जाता येत नव्हते. त्यानंतर १९८९ Compaq LTE आणि Compaq LTE 286 रिलिज झाले. त्यांन प्रथम नोटबुक पीसीचा दर्जा दिला गेला. तो ट्रॅव्हलर्सच्या खुप पसंदीस पडला होता. (First Laptop in World)

Apple चा पहिला लॅपटॉप Macintosh Portable
सन १९८९ मध्येच अॅप्पलने पहिला लॅपटॉप आणला. मात्र तो सुद्धा आकाराने लहान नव्हता आणि त्याला ही लगेचच्या कॅटेगरीत ठेवण्यात आले होते. याची बॅटरी आणि स्क्रिन उत्तम होती.

Apple PowerBook 100 Series
सन १९९१ मध्ये अॅप्पलने PowerBook लॅपटॉपची सीरिज आणली. या सीरिजमध्ये PowerBook 100, Power Book 140 आणि PowerBook 170 उतरवण्यात आले. हा कंपनीच्या पहिल्या पोर्टेबल पीसीच्या तुलनेत अधिक यशस्वी झाला.

हे देखील वाचा- जगातील सर्वात लांब जलमार्गे ‘गंगा विलास क्रूझ होणार

IBM ThinkPad700
त्यानंतर १९९२ मध्ये IBM ने प्रथम ThinkPad लॅपटॉप आणले. त्यानंतर काही मॉडेल्स ८००, ७००c आणि ७००t होते. Apple PowerBook 100 Series सह त्यांना सुद्धा मॉडर्न लॅपटॉपमध्ये गणले जात होते. आज आपण ज्या प्रकारचे लॅपटॉप पाहतो त्याचे डिझाइन ही याच शेप मध्ये आले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.