अवघ्या काही तासातच आपण २०२५ या सालाचा निरोप घेऊन २०२६ या नवीन वर्षांमध्ये प्रवेश करणार आहोत. २०२५ या वर्षाने दिलेल्या चांगल्या वाईट आठवणी घेऊन आपण २०२६ च्या नवीन वर्षांमध्ये प्रवेश करणार आहोत. आज रात्री १२ नंतर संपूर्ण जग २०२५ ला अलविदा म्हणत २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात करेल. मात्र तुम्हाला तर माहितीच आहे, संपूर्ण जगाचे एकच घड्याळ नाही. काही मोजके देश सोडले तर भारताच्या तुलनेत बाकीच्या देशाच्या घड्याळामध्ये अनेक तासांचा फरक आहे. त्यामुळेच अनेक देश भारताच्या आधी नवीन वर्षाचे स्वागत करतात तर काही देश भारतानंतर नवीन वर्ष साजरे करतात. पण या जगामध्ये सर्वात आधी कोणत्या देशात १२ वाजतात अर्थात कोणता देश जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत करतो माहिती आहे का? भारतीय वेळेनुसार कोणता देश किती वाजता नवीन वर्षात पदार्पण करणार ते बघणार आहोत. कोणता देश प्रथम नवीन वर्ष साजरा करतो, कोणता देश सर्वात शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करतो ते पाहूया.. (New Year 2026)
ओशनिया प्रदेशातील लोक प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतात. यापैकी टोंगा, सामोआ आणि किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. टोंगा या पॅसिफिक बेटावर नवीन वर्षाचा दिवस पहिला येतो, याचा अर्थ नवीन वर्ष साजरा करणारा पहिला देश आहे. भारतीय वेळेनुसार, सामोआ आणि ख्रिसमस बेट/किरिबाटी येथे ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता नवीन वर्षाची सुरूवात होते. आशियाई देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत सर्वप्रथम जपान आणि दक्षिण कोरियामध्ये केले जाते. येथे ३१ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता नवीन वर्ष सुरू होते. त्याच वेळी, नवीन वर्ष यूएस मायनर आउटलाइंग बेटावर सर्वात शेवटी साजरे केले जाते. भारतीय वेळेनुसार, १ जानेवारीच्या संध्याकाळी ५:३५ वाजता साजरा केला जातो. (Top Marathi News)

नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूह आहे. टोंगा भारतापेक्षा ७ तास ३० मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, ३१ डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी ४:३० वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच ०१ जानेवारी २०२३ रोजी नवीन वर्ष सुरू होईल. होय, हा जगातील पहिला देश आहे, जिथे नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. यानंतर सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर द्वीप समूह, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता (जीएमटीनुसार) किंवा संध्याकाळी ०५.३० (भारतीय वेळेनुसार) करतात. (Latest Marathi Headline)
या देशांमध्ये GMT नुसार, यावेळी ३१ डिसेंबर (2025) रोजी नवीन वर्ष साजरे केले जाईल
दुपारी ४.३० वाजता- न्यूझीलंड
संध्याकाळी ५:३० वाजता- रशिया
संध्याकाळी ६.३० वाजता -ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न, सिडनी, कॅनबेरा, होनियारा
संध्याकाळी ७ वाजता – अॅडलेड, ब्रोकन हिल, सेडुना
संध्याकाळी ७:३० वाजता-ब्रिस्बेन, पोर्ट मोरेस्बी, हॉगताना
रात्री ८ वाजता-डार्विन, अॅलिस स्प्रिंग्स, टेनंट क्रीक.. (Top Trending News)
रात्री ८:३० वाजता – टोकियो, सोल, प्योंगयांग,जपान आणि दक्षिण कोरिया
रात्री ९.३० वाजता – चीन आणि फिलीपिन्स
रात्री १०:३० वाजता – इंडोनेशिया आणि थायलंड
रात्री ११ वाजता – म्यानमार
रात्री ११.३० वाजता- बांगलादेश
==========
Blue Mountains Sydney : सिडनीमधील पर्वत निळ्या रंगाचे का दिसतात? जाणून घ्या त्यामागचं रहस्य
==========
रात्री ११:४५ वाजता – नेपाळचे काठमांडू, पोखरा, विराटनगर, धरण..
१२:०० वाजता – भारत आणि श्रीलंका
१२:३० वाजता- १ जानेवारी पाकिस्तान
सकाळी १ वाजता- अफगाणिस्तान
यानंतर अझरबैजान, इराण, मॉस्को, ग्रीस
१ जानेवारी, IST पहाटे ५:३० वाजता, युनायटेड किंगडम नवीन वर्षाचे स्वागत करेल. प्रत्येक देशाच्या भौगोलिक स्थानानुसार त्या देशाची स्थानिक वेळ ठरते. यामुळे काही देशांमध्ये दिवस आधी सुरू होतो, तर काही देश दुसऱ्याच्या मागे असतात. असे असले तरी प्रत्येक देश मोठ्या आनंदाने, जल्लोषाने नवीन वर्षाचे स्वागत करतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
