अमेरिकेत पुन्हा एकदा मोठी आग लागली आहे. जंगलात लागलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान होत असल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना राज्यातील जंगलात ही आग लागली असून या आगीचा वा-यामुळे अधिक फैलाव होत आहे. कॅरोलिना येथील जंगलात मोठ्या ज्वाळा दिसत असून या आगीचा फैलाव अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं झाल्यामुळे या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या आगीमुळे गेल्याच महिन्यात कॅलिफोर्नियामधील जंगलात लागलेल्या आगीची आठवण काढण्यात येत आहे. अमेरिकेच्या जंगलात लागणा-या आगींचा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. आता अमेरिकेतील उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. येथील राज्यपालांनी आणीबाणीची घोषणा केली असून ही आग विझवण्यासाठी 410 कामगार प्रयत्न करीत आहेत. उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये कोरडे हवामान असून तिथे जोरदार वारे वाहत आहेत. (America)
हे वातावरण आग पसरवण्याठी कारणीभूत ठरत आहे. या आगीमुळे उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनातील सर्वच जंगलांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे या भागात रहाणा-या नागरिकांचे आधी स्थलांतर कऱण्यात येत आहे. यातच अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने या प्रदेशात लागलेली आग अधिक ठिकाणी पसरण्याचा धोका वर्तवला आहे. त्यामुळे या भागात रहाणारे नागरिक धास्तावले आहेत. मर्टल बीचच्या पश्चिमेकडील कॅरोलिना वन क्षेत्रात आग लागल्यानंतर अनेक भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ही आग सुमारे 4.9 चौरस किलोमीटर परिसरात पसरली आहे. या भागात सध्या वारे जोरात वाहत असून या वा-यांमुळे आग पसरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच या आगीचा फैलाव रोखण्यात अपयश येत आहे. कॅरोलिना येथील लागलेली ही आग उव्हारी राष्ट्रीय जंगलातही पसरली असून त्यामुळे मोठी वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. शिवाय या भागातील प्राण्यांनाही आगीचा फटका बसला आहे. आग ज्या भागात लागली आहे, तिथे लाकडाची बांधकामे अधिक आहेत. शिवाय वनसंपदाही आहे. (International News)
आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रगती झाली असली तरी एक तृतीयांश आग आटोक्यात आली आहे. पण त्यानंतरही उत्तर कॅरोलिनातील पोल्क काउंटीमधील ट्रायॉन शहरातील काही भागात आग वेगाने पसरल्याने येथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. वाळलेली झाडे, झुडुपे आणि कमी आर्द्रता यामुळे आग वेगाने पसरत आहे. दक्षिण कॅरोलिनाचे गव्हर्नर हेन्री मॅकमास्टर यांनी वणव्याला तोंड देण्यासाठी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. या काळात संपूर्ण राज्यात उघड्यावर आग जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलातही अशाचप्रकारे आग लागली होती. सुरुवातीला आगीचे स्वरुप अगदी लहान होते. मात्र नंतर या आगीनं कॅलिफोर्निया राज्याला पार भाजून टाकल्यासारखे दृष्य निर्माण झाले. कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत अमेरिकेचे 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहती आहे. (America)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
शिवाय 40 हजार एकरवर पसरलेल्या आगीत 10 हजार इमारती जळून खाक झाल्या. अनेक शाळा, बॅंका, सामाजिक संस्थांची कार्यालये या आगीत जळून गेली आहेत. सुमारे 30 हजार घरांचे या आगीत नुकसान झाले. त्यामुळे कॅलिफोर्निया आता नव्यानं उभारण्याचं आव्हान अमेरिकेपुढे आहे. वास्तविक या आगीची पाहणी करणा-यांनी आगीमुळे याहूनही अधिक नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. आगीमुळे कॅलिफोर्नियाचे एकूण नुकसान 150 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीत येथील मुलभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. या सर्वांची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. शिवाय त्यासाठी बराच कालावधीही जाणार आहे. लॉस एन्जलीस येथील आगीनं अनेक प्रतिष्ठितांच्या घरांना खाक केले आहे. असे असतांनाच आता अमेरिकेच्या दुस-या भागातही आगीचा मोठा प्रकोप सुरु असल्यामुळे कॅरोलिनामधील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कॅरोलिनामधील आगीमध्येही मोठे नुकसान होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे. या सर्वांची घरे बहुतांशपणे लाकडाची असल्यामुळे ती आगीत जळण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे आणि किंमती सामान सोबत घेऊन घरे सोडत आहेत. (International News)
सई बने