आयुष्यातील स्वप्न पूर्ण करायची असतील तर आर्थिक प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही व्यवस्थितीत कमवत असाल आणि तुम्हाला पैसे कधी, कुठे खर्च करायचे हे योग्यपणे माहिती असेल तरच तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकता. मात्र याउलट परिस्थिती असेल तर कितीही प्रयत्न केले तरीही तुमचे बँक खाते हे रिकामेच राहिल. (Financial Planning)
एक्सपर्ट्सच्या मते विचार न करता पैसे खर्च केल्याने आर्थिक प्लॅनिंगवर त्याचा परिणाम होतो. अशातच आपण आपल्या काही सवयींमध्ये बदल करून आर्थिक सक्षम होऊ शकतो. उत्तम आर्थिक प्लॅनिंगसाठी तुम्हाला दररोजच्या खर्चातील काही पैसे बचत करणे आले पाहिजे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे असे मानतात की, लोकांना कमी वयापासूनच पैशांची बचत करता आली पाहिजे. अशातच नक्की कोणत्या प्रकारचे असे खर्च आहेत जे केल्याने तुम्ही कालांतराने कंगाल होऊ शकता त्याचबद्दल अधिक जाणून घेऊयात.
-उच्च व्याज दरावर कर्ज
जर तुम्ही उच्च व्याज दरावर कर्ज घेता तर तुमच्या बँक बँलेन्सवर त्याचा परिणाम होतो. कार लोन, होम लोन किंवा क्रेडिट कार्डवर बँक ग्राहकांकडून अधिक व्याज वसूल करते. काही वेळेस तर लोकांची संपूर्ण सॅलरी ईएमआय भरण्यातच जाते. त्यामुळे आर्थिक प्लॅनिंग करता येत नाही.
-पैसे डबल करण्याची स्किम
काही कंपन्या अशा आहेत ज्या रातोरात तुम्हाला पैसे डबल करून मिळतील असे आश्वासन देतात. मात्र अशा कंपन्यांमध्ये फसल्यानंतर तुमच्या मेहनतीचे पैसे फुकट जाऊ शकतात याचा सुद्धा विचार केला पाहिजे. वॉरेन बफे असे सुद्धा म्हणतात की, पैसा नेहमीच विश्वासू संस्थेतच गुंतवावा.
-लग्जरी सामान
दुसऱ्या लोकांना पाहून आपण ही लग्जरी सामानाची खरेदी करण्यास सुरुवात केली तर लवकरच कंगाल होऊ शकता. लग्जरी सामानासाठी खुप पैसे खर्च करावे लागतात. अशातच तुमची गरज खिशाला परवडणाऱ्या किंमतीत पूर्ण होत असेल तर उगाचच लग्जरी ब्रँन्डमध्ये पैसे खर्च करू नयेत.
-नवी कार खरेदी
लोक नवी कार खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. बहुतांश लोक कार ही कर्जावर घेतात. त्यामुळे व्याज हे लाखो रुपयांपर्यंत करावे लागते. अशातच नवी कार घेण्याऐवजी कमी किंमतीत जुनी किंवा सेकंड हँन्ड कार खरेदी करावी. (Financial Planning)
-खाण्यापिण्यासाठी अधिक खर्च
लोकांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवले पाहिजे. बाहेरचे महागडे अन्रपदार्थ थेट तुमच्या आर्थिक बजेटवर परिणाम करतात. घरीच बनवलेले पदार्थ खाणे नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचसोबत वायफळ खर्च करणे ही टाळले पाहिजे.
हेही वाचा- भारतातील स्टार्टअपला ‘या’ कारणास्तव परदेशी कंपन्या पैसे लावण्यास घाबरतायत