Finance Tips : प्रत्येकाला आपले हक्काचे आणि स्वत:चे घर असावे असे वाटते. पण ज्यावेळी घर, प्रॉपर्टी खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा हा एक मोठा आर्थिक निर्णय असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. घर खरेदी करण्यासाठी काही वर्षंची मेहनत आणि बचत या गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. काहीवेळ घर खरेदीसाठी कर्ज देखील घ्यावे लागते. एवढेच नव्हे रजिस्टर चार्ज, स्टॅम्प ड्युटी आणि अन्य काही खर्चांकडे पहावे लागते. दुसऱ्या बाजूला काहीजण घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना पैसे कसे वाचले जातील याकडे लक्ष देतात. पण महिलांच्या नावावर घर खरेदी करण्याचे काही फायदे होतात याबद्दल तुम्हाला माहितेय का?
कलम 80सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट
ज्यावेळी महिलांच्या नावावर घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायचे असते किंवा कर्ज घ्यायचे झाल्यास इन्कम टॅक्सच्या कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते. प्रत्येक वर्षी होम लोनच्या प्रिंसिपल रीपेमेंटवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. ही टॅक्समधील सूट महिलांच्या फायद्यासाठी असते.
कलम 24 बी अंतर्गत अतिरिक्त टॅक्स डिडक्शन
होम कर्जावरील टॅक्समध्ये सूट मिळते, जी कलम 24 बी अंतर्गत दिली जाते. यानुसार, कर्जावर भरलेल्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा क्लेम करू शकता. ज्यावेळी महिलांच्या नावावर घर किंवा प्रॉपर्टी खरेदी केली जाते तेव्हा त्यांच्या नावावर कर्ज घेतले जाते. याच व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंतच्या सूटचा दावा करू शकता.
स्टॅम्प ड्युटी कमी
भारतातील काही राज्यांमध्ये महिलांच्या नावावर संपत्ती खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळते. यावेळी 1-2 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्ही 50 लाख रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर तुमच्या राज्यात स्टॅम्प ड्युटी 7 टक्के असल्यास 3.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल. पण महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैशांची स्टॅम्प ड्युटीमध्ये बचत करता येईल.
=======================================================================================================
हेही वाचा :
May : १ मे पासून एटीएमपासून सिलेंडरपर्यंत ‘हे’ नियम बदलणार
Chaar Dhaam : चारधाम यात्रेसाठी भाविकांचा महापूर !
=======================================================================================================
सब्सिडी आणि शासकीय योजना
भारत सरकारने महिलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. जेणेकरुन त्यांना संपत्ती खरेदी करण्यासाठी मदत मिळेल. जसे की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घर असल्यास त्यांना होम लोनच्या व्याजाच्या दरामध्ये सब्सिडी मिळते. यामुळे घराचा एकूण खर्च कमी होतो.(Finance Tips)
संपत्ती विवादामध्ये फायदा
जर संपत्तीवरुन वाद होत असेल तर महिलांच्या नावावर खेरदी केलेल्या प्रॉपर्टीवर तिची कायदेशीर सुरक्षा वाढली जाते. काही प्रकरणात संपत्तीचा वाद किंवा वारसा हक्काच्या मुद्द्यावरुन महिलांना प्राथमिकता दिली जाते.