Fight frequently in relationship- प्रत्येक नात्यात ही भांडण होत राहतात आणि ही सामान्य बाब आहे. म्हणूनच काही वेळेस भांडण झाल्यानंतर बहुतांश कपल्स ते लगेच मिटवण्याचा प्रयत्न करतात. कारण फार काळ अबोला धरला की आपल्याला ही पार्टनरशिवाय करमत नाही. पण अगदी लहान-लहान कारणांवरुन पार्टनरसोबत वाद होत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे. कारण यामध्ये एकमेकांच्या भावना दुखावून आपल्यालाच अधिक त्रास होते. नात्यातील गोडवा कमी होतो आणि आपल्याला पार्टनरपासून दूर जावेसे वाटते. अशातच तुम्हाला या सर्व गोष्टी थांबवून पार्टनर सोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये रहायचे असेल तर काही गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्या लागतीलच. पण एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण खरंच चुकलो का याचा सुद्धा विचार करणे फार महत्वाचे आहे.
प्रत्येक नात्यात ही भांडण होत राहतात आणि ही सामान्य बाब आहे. म्हणूनच काही वेळेस भांडण झाल्यानंतर बहुतांश कपल्स ते लगेच मिटवण्याचा प्रयत्न करतात. कारण फार काळ अबोला धरला की आपल्याला ही पार्टनरशिवाय करमत नाही. पण अगदी लहान-लहान कारणांवरुन पार्टनरसोबत वाद होत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे. कारण यामध्ये एकमेकांच्या भावना दुखावून आपल्यालाच अधिक त्रास होते. नात्यातील गोडवा कमी होतो आणि आपल्याला पार्टनरपासून दूर जावेसे वाटते. अशातच तुम्हाला या सर्व गोष्टी थांबवून पार्टनर सोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये रहायचे असेल तर काही गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्या लागतीलच. पण एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण खरंच चुकलो का याचा सुद्धा विचार करणे फार महत्वाचे आहे.
हे देखील वाचा- ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा पार्टनरसोबत संबंध जोडण्यास कामी येतील ‘या’ टिप्स
पार्टनरसोबत छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होत असतील तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा
-टेक्स मेजेसवर भांडण्यापासून दूर रहा
जेव्हा तुम्ही पार्टनरपासून दूर असता म्हणजेच तुमचे भांडण हे डिजिटली होते. यामागील कारण असे की, तुम्ही ज्या पद्धतीने टेक्स मेजेवर बोलता हे समोरच्या व्यक्तीला संताप आणू शकता. त्याला तुमच्या भावना स्पष्टपणे कळू शकत नाहीत. अशातच दोघांमधील वाद अधिक चिघळला जाऊ शकतो.
-पार्टनरसोबत भांडण करण्यापूर्वी थोडे थांबा आणि विचार करा
तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पार्टनरने आपल्या सोबत हे योग्य केले नाही तर तुम्ही संतापता आणि त्याला वाट्टेल ते बोलून मोकळे होतात. यावेळी तुमच्या तोंडून निघालेले शब्द हे आपण पुन्हा मागे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भांडण करण्यापूर्वी थोडे थांबा आणि विचार करा नक्की चुक कोणाची आहे किंव पार्टनर असा का वागला असेल.
-भांडण नको म्हणून झोपणे योग्य नव्हे
तुम्ही नेहमीच ऐकले असेल राग आला की झोपावे. पण नेहमीच नात्यात वाद होत असतील तर झोपण्याऐवजी तो वाद दोघांनी मिळून मिटवला पाहिजे. काहीजण दोघांमध्ये बाचाबाची होऊ नये म्हणून झोपण्याचा पर्याय निवडतात. यामध्ये तुम्ही कोणती क्रिया करत नाही किंवा काही बोलत नाहीत. पण एकमेकांशी संवाद झालाच नाही तर तुमच्यातील भांडण मिटणार कसे? त्यामुळेच भांडण झाले म्हणून झोपून जाणे योग्य नव्हे.
-पार्टनरला तुमच्या भावना पटवून द्या
समस्या समजून घेण्याचा बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमच्या पार्टनरला भावना पटवून द्या, कारण असे होऊ शकते की, त्याला तुमच्या भावना नक्कीच कळतील. या दरम्यान काही शब्द हे जपून वापरावेत जेणेकरुन जेव्हा तुम्ही पार्टनरला तुमची समस्या सांगाल तेव्हा भांडण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या.