Home » Navratri :पाचवी माळ: नवदुर्गेचे पाचवे स्वरूप – श्री स्कंदमाता

Navratri :पाचवी माळ: नवदुर्गेचे पाचवे स्वरूप – श्री स्कंदमाता

by Jyotsna Kulkarni
0 comment
Navrtari
Share

आज नवरात्राचा पाचवा दिवस. घटस्थापना होऊन चार दिवस झाले असून आज आपण देवीच्या पाचव्या रूपाची स्कंदमातेची पूजा करणार आहोत. नवरात्रोत्सव म्हणजे शक्तिच्यादेवतेचा उत्सव. नवरात्रात नऊ दिवस दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरुपांचे पूजन करणे शुभ लाभदायक तसेच पुण्यफलदायक मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या नऊ रुपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते. आज २६ सप्टेंबर रोजी नवरात्राचा पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई. भगवान कार्तिकेय बालस्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत. स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते. (Navratri)

नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते, ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो. त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो. नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. देवीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग सुख-शांतीचे प्रतीक आहे. मातृत्वाचे हे रुप व्यक्तीला शांती आणि आनंदाचा अनुभव देतो. देवी स्कंदमातेची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या देवीची पूजा-प्रार्थना केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. जाणून घेऊया नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त. (Marathi)

स्कंदमातेचे रुप
नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे. (Todays Marathi Headline)

Navratri

स्कंदमातेची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एके काळी तारकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करुन ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याच्या तपश्चर्येने प्रसंन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले. त्यानुसार, तारकासुराने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले. पण ब्रह्माजींनी तारकासुराला समजावून सांगितले की, जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अमरत्वाचं वरदान देण्यास ब्रह्माजींनी नकार दिला. यावर तारकासुराने भगवान शिवच्या पुत्राच्या हातून मृत्यूचे वरदान मागितले कारण तारकासुराला वाटत होते की, शिव तपस्वी आहे आणि ते कधीही लग्न करणार नाही. अशा स्थितीत त्याला मुलगा होणार नाही आणि तो मरणार नाही. तारकासूराने मागीतल्या प्रमाणे ब्रह्मदेवाने तारकासुराला हे वरदान दिले. (Latest Marathi Headline)

वरदान मिळाल्यानंतर तारकासुराने सर्वत्र अत्याचार सुरू केला. तारकासुराच्या अत्याचाराने त्रस्त सर्व देवी-देवतांनी देवांचे देव महादेव यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी देवी-देवतांनी तारकासुराच्या अन्यायापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी महादेवाला साकळे घातले. देवांची व्यथा लक्षात घेत शिवने म्हणजेच महादेवाने माता पार्वतीशी विवाह केला. त्यानंतर कार्तिकेयचा जन्म झाला. कार्तिकेयने मोठे झाल्यावर तारकासूर या राक्षसाचा वध केला. कार्तिकेयजींना स्कंद असेही म्हणतात. त्यामुळे स्कंद म्हणजे कार्तिकेयची माता असल्यामुळे देवी दुर्गेच्या या रुपाला स्कंदमाता असेही संबोधले जाते. (Trending Marathi News)

स्कंदमाता देवीचे पूजन
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. शक्यतो हिरवे वस्त्र परिधान करावे. स्कंदमाताला हिरवा रंग प्रिय आहे. त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा पूजास्थळी पाट किंवा चौरंगावर स्कंदमातेचं चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. यानंतर गंगाजलाने शुद्ध करून कलशात पाणी घेऊन त्यात काही नाणी टाकून कलश स्थापना करा. आता पूजेचे व्रत घेऊन स्कंदमातेला रोळी-कुमकुम लावा आणि नैवेद्य अर्पण करा. आता धूप-दीपातून आईची आरती करा आणि आरतीनंतर घरातील सर्व लोकांना प्रसाद वाटप करा. (Top Marathi Headline)

स्कंदमाता मंत्र
ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥

प्रार्थना मंत्र
सिंहासनगता नित्यं पद्माञ्चित करद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥ (Latest Marathi News)

स्कंदमातेची स्तुति
सर्वभू‍तेषु माँ स्कन्दमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

========

Navratri : नवरात्र! महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांची माहिती

========

स्कंदमातेची आरती
जय तेरी हो स्कंद माता.
पांचवां नाम तुम्हारा आता..
सबके मन की जानन हारी.
जग जननी सबकी महतारी..
तेरी जोत जलाता रहू मैं.
हरदम तुझे ध्याता रहू मै..
कई नामों से तुझे पुकारा.
मुझे एक है तेरा सहारा.. (Top Trending News)
कही पहाडो पर है डेरा.
कई शहरों में तेरा बसेरा..
हर मंदिर में तेरे नजारे.
गुण गाए तेरे भक्त प्यारे..
भक्ति अपनी मुझे दिला दो.
शक्ति मेरी बिगड़ी बना दो..
इंद्र आदि देवता मिल सारे.
करे पुकार तुम्हारे द्वारे..
दुष्ट दैत्य जब चढ़ कर आए.
तू ही खंडा हाथ उठाए..
दासों को सदा बचाने आयी.
भक्त की आस पुजाने आयी.. (Social News)

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.