भारतातील फुटबॉलच्या चाहत्यांना एक जोरदार धक्का बसला आहे. कारण जेव्हा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला फिफाने तिसऱ्या पक्षाच्या अयोग्य हस्तक्षेपामुळे बंदी घातली गेली आहे. या बंदीनंतर आता भारतात ११ ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या वुमेंस अंडर-१७ विश्वकप खेळता येणार नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाने AIFF वर बंदी घातली होती आणि खेळाचे संचालन करण्यासाठी तीन सदस्यांची समिती सुद्धा गठित केली होती.(FIFA ban India)
कशी उठेल AIFF वरील बंदी
फिफाच्या सदस्य संघांना कायदा आणि राजकीय हस्तक्षेपापासून दूर व्हावे लागेल. म्हणजेच कोणत्याही संघातील सदस्यावर कोणत्याही राजकीय किंवा कायद्याचा हस्तक्षेप नसावा. फिफा परिषदेचे ब्युरो यांनी निर्णय घेतला आहे की, संस्पेशनपासून मुक्त होण्यासाठी आयएफएफला फिफाच्या नियम मान्य कराव्या लागतील. ज्यामध्ये COA चे आदेश रद्द करावे लागतील. म्हणजेच फिफाला नकोय की, थर्ड पार्टी कोणत्याही फुटबॉल संघालाचा चालवेल किंवा त्यांना निर्देशन देईल.
फिफाच्या प्रेस रिलिजमध्ये असे म्हटले आहे की, फिफा काउंसिलने ऑल इंडिया फुटबॉल एसोसिएशनला तातडीने संस्पेड करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यामध्ये थर्ड पार्टीचा समावेश आहे. जे फिफाच्या नियमांचे उल्लंन केल्यासारखे आहे. हे सस्पेंशन अशावेळी मागे घेतले जाईल जेव्हा अॅडमिनिस्ट्रेटर्स योग्य व्यक्तीच्या हाती असेल आणि बोर्डाचे संविध योग्य पद्धतीने लागू होती. बुधवार पर्यंत आयएफएफच्या अध्यक्ष पदासाठी नॉमिनेशन भरण्याची अखेरची तारीख होती. त्याचसोबत याबद्दल सुनावणी ही सुप्रीम कोर्टात नुकसीच झाली.
काय आहे प्रकरण आणि कोण आहे गुन्हेगार?
भारतीय फुटबॉलमध्ये जो गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरु आहे त्यामागील सर्वाधिक मोठे कारण प्रफुल्ल पटेल. वर्ष २००९ मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पहिल्यांदाच इंडियन फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाची कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर ते त्याच पदावर कार्यरत होते आणि २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा निवडणूकीच्या माध्यमातून नव्या अध्यक्षासाठी निवडणूक होते. परंतु पटेल यांनी त्या पदावर राजीनामा दिलाच नाही. त्यानंतर कोर्टात याबद्दल तक्रार करण्यात आली. कोर्टाने मे २०२२ मध्ये प्रफुल्ल पटेल यांना पदावरुन हटवले.(FIFA ban India)
हे देखील वाचा- खेळाडूंना दिली जाणारी पदकं ही खरंच सोन्या-चांदीची असतात? जाणून घ्या अधिक
माजी भारतीय कर्णधारने काय म्हटले
भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाइचुंग भुटिया यांनी असे म्हटले की, हे अत्यंत दुर्दैव आहे की फिफाने भारतीय फुटबॉलला बॅन केले आहे. मला असे वाटते की, हा एक कठोर निर्णय आहे. परंतु आपल्याकडे शानदार संधी सुद्धा आहे की आपली सिस्टिम ठीक करण्याची. स्टेकहोल्डर्स, खेळ मंत्रालय आणि एसोसिएशन यांनी एकत्रित यावे आणि सिस्टिम ठिक करावी. त्या सर्वांनी मिळून भारतीय फुटबॉलसाठी उत्तम पद्धतीने काम करावे.
कर्णधार सुनील छेत्रीने सुद्धा मांडले मत
यापूर्वी फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री खेळाडूंसोबत बातचीत करताना असे म्हचले की. फिफाच्या धमक्यांना घाबरु नका तर मैदानात आपले लक्ष ठेवा. त्याने असे ही म्हटले होते की, तुमच्या नियंत्रणाबाहेर गोष्ट आहे. जे कोणीही अधिकारी यामध्ये सहभागी आहेत ते या प्रकरणाला योग्यपणे सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील.