Home » अपमान झाला ,उभी राहिली कोट्यावधींची कंपनी !

अपमान झाला ,उभी राहिली कोट्यावधींची कंपनी !

by Team Gajawaja
0 comment
Ferruccio Lamborghini
Share

जगातील सर्वात महाग गाड्यांपैकी एक, जर रस्त्यात चुकून ही कार कुणाला दिसली तर तो माणूस थांबून या गाडीला बघतोच Sorry या कारला बघतोच. हा पण भारतात ही कार जास्त दिसत नाही, तरी पण अनेक पंजाबी गाण्यांमार्फत तीने भारतात प्रवास केला आहे. ती गाडी म्हणजे Lamborghini. ज्यांना गाड्यांची आवड आहे, ज्यांचं आयुष्यात एकतरी गाडी घेण्याचं स्वप्नं असतं त्यांनी एकदा तरी Lamborghini कंपनीच्या कारचा वॉलपपेपर मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर ठेवलाच असेल. पण तुम्हाला माहीती आहे का की, Lamborghini ही गाडी तयार होण्यामागचं कारण अपमान होता. आता तो कोणी कोणाचा केला? Lamborghini ही कार कंपनी तयार कशी झाली? जाणून घेऊया. (Ferruccio Lamborghini)

 

Ferruccio Lamborghini ज्यांनी Lamborghini या कार कंपनीची स्थापना केली. त्यांचा जन्म इटलीच्या Renazzo शहरात एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून वाडिलांसोबत त्यांनी शेतीची कामं केली. पण शेतींच्या कामांपेक्षा त्यांना शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्ये जास्त रस होता. त्यामुळे Ferruccio यांनी शेतीमध्ये लक्ष न देता मेकॅनिकल कोर्समध्ये शिक्षण घेतलं. (International News)

Ferruccio यांना पहिली नोकरी लागली ती इटालियन रॉयल एअर फोर्समध्ये मेकॅनिक म्हणून. त्यांचं काम आणि मेहनत बघून त्यांचं काही महिन्यातच प्रमोशन झालं. आता ते मेकॅनिक जरी असले तरी एअर फोर्समध्ये कामाला असल्यामुळे ते एक सैनिकच होते, त्यामुळे त्यांना दूसऱ्या महायुद्धात लढाईत उतरावं लागलं. ज्यामध्ये त्यांना ब्रिटेन सैनिकांनी बंदी बनवलं. दुसरं महायुद्ध संपेपर्यंत ते बंदीच होते. ब्रीटेनच्या कैदेतून सुटल्यानंतर Ferruccio Lamborghini यांनी स्वत:च एक गॅरेज उघडलं. (Ferruccio Lamborghini)

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मित्रराष्ट्रांनी इटलीत अनेक लष्करी वाहनं आणि उपकरणं मागे सोडली होती. यात निकामी झालेल्या वाहनांपासून Ferruccio Lamborghini यांनी ट्रॅक्टर बनवायला सुरुवात केली. हा काळ १९४७चा होता, या काळात इटलीत मोठ्या प्रमाणात कृषी आणि औद्योगिक प्रगती होत होती. तेव्हाच Ferruccio Lamborghini यांनी स्वत: बनवलेला Carioca नावाचा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणला. त्या काळातल्या इतर ट्रॅक्टरपेक्षा हा ट्रॅक्टर वेगळा होता. म्हणून तो लगेच प्रसिद्ध झाला त्याची मागणी वाढली. Ferruccio Lamborghini यांनी लॅम्बोर्गिनी ट्रॅटोरी नावाची ट्रॅक्टर मैन्‍युफ़ैक्‍चरिंग कंपनी सुरू केली. (International News)

ट्रॅक्टर कंपनीचा बिझनेस जोरात चालू होता. पैसा पण खूप येतं होता. Ferruccio Lamborghini हे एक मेकॅनिक होते. त्यांना स्पोर्ट्स कार खूप आवडायच्या. त्यामुळे त्यांनी फरारी या कंपनीची ‘250 GT Coupé’ ही कार खरेदी केली. आता मूळचा मेकॅनिक माणूस, ती गाडी चालवताना त्यांना इंजिन आणखी सुधारवता येईल असं वाटलं. ही गोष्ट त्यांच्या वाटण्यापर्यंतच मर्यादित राहिली असती, तर Lamborghini ही कार बनलीच नसती. पण त्यांनी इंजिनच्या सुधारा बद्दल फरारी कंपनीत जाऊन सांगण्याचा विचार केला. ज्यामुळे फरारी ही कार आणखी चांगली होऊ शकेलं. पण जेव्हा त्यांनी हे फरारी कंपनीत सांगितलं तेव्हा त्यांचं बोलणं कोणी ऐकूनच घेतलं नाही उलट त्यावर फरारी कंपनीवाले असे म्हणाले की, “खराबी आमच्या गाडीत नाही, तर गाडी चालवणाऱ्यामध्ये आहे.” शिवाय ते त्यांना असंही म्हणाले की, “चांगलं हेच आहे की तुम्ही ट्रॅक्टरच बनवा.” (Ferruccio Lamborghini)

======

हे देखील वाचा : मानसी किर्लोस्कर टाटा

======

हे बोलणं Ferruccio यांच्या मनाला खूप लागलं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी एक स्पोर्ट्स कार बाजारात आणण्याचा विचार केला. फेरारीला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व प्लॅनिंग करण्यात आलं आणि एक कार स्पेशल डिझाइन करण्यात आली. लॅम्बॉर्गिनी यांनी १९६३ मध्ये आपली पहिली स्पोर्ट्स कार ३५० जीटीव्ही लाँच केली. या स्पोर्ट्स कारच्या मॉडेलने खूप नाव कमावलं. यानंतर लॅम्बोर्गिनीने अनेक स्पोर्ट्स कार मार्केट मध्ये आणल्या. त्यामुळे फेरारीचं थोडं का असेना पण लॅम्बोर्गिनीने मार्केट खालं. आज दोन्ही ही जगतल्या कंपन्या जगातल्या सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स कार ब्रँड आहेत. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.