Home » थंडीत पायांना हे तेल लावा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

थंडीत पायांना हे तेल लावा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपल्या शरीरातील काही समस्या दूर करण्यासाठी मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. खासकरून हिवाळ्यात मसाज केल्याने काही आरोग्यदायी फायदे मिळतात.

by Team Gajawaja
0 comment
Feet Massage Benefits
Share

Feet Massage Benefits : आपल्या शरीरातील काही समस्या दूर करण्यासाठी मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. खासकरून हिवाळ्यात मसाज केल्याने काही आरोग्यदायी फायदे मिळतात. शरीरासह पायांना मसाज केल्यानेही काही फायदे होतात.

पायांच्या तळव्यांना रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्याने शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होते. याशिवाय तणाव दूर होण्यास मदत मिळते. अशातच हिवाळ्यात पायांच्या तळव्यांना कोणते तेलाने मसाज करावे याबद्दल जाणून घेऊया अधिक….

नारळाचे तेल
केस ते त्वचेच्या मसाजसाठी नारळाचे तेल उत्तम मानले जाते. आपल्या त्वचेला हिवाळ्यात आतमधून हाइड्रेट राहण्यास नारळाचे तेल मदत करते. अशातच पायांच्या तळव्यांना नारळाच्या तेलाने मसाज करू शकता. याशिवाय नारळात अँटी-एंफ्लेमेंटरी, अँटी फंगल आणि मॉइश्चराइजिंग गुणधर्म असतात. जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात.

तीळाचे तेल
शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी पायांच्या तळव्यांना तीळाच्या तेलाने मसाज करू शकता. तुमचे सांधे सातत्याने दुखत असल्यास तीळाच्या तेलाने मसाज करा. यामुळे झोपही उत्तम लागते. तीळामध्ये कॉपर, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, हेल्दी ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात.

How to massage feet: 12 techniques for relaxation and pain relief

राईचे तेल
राईच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास सूज आणि पाय दुखण्याची समस्या कमी होऊ शकते. हिवाळ्यात राईच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मसाज करा. या तेलाने मसाज केल्याने कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही दूर राहाता येते.

बदामाचे तेल
शरीराच्या मसाजसाठी बदामाचे तेल अत्यंत लोकप्रिय आहे. याची खासियत अशी की, हे तेल चिकट नसते. बदामाचे तेल त्वचा अगदी सहज शोषून घेते. यामुळेच मसाज पार्लरमध्ये देखील बदामाचे तेल बहुतांशवेळा वापरले जाते. पायांच्या तळव्यांना बदामाच्या तेलाने मसाज केल्यास झोप न येण्याची समस्या दूर होईल. (Feet Massage Benefits)

ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलला हेल्दी मसाजसाठी उत्तम मानले जाते. या तेलामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. याशिवाय शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होते. दररोज तुम्ही सकाळी ऑलिव्ह ऑइलच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मसाज करू शकता. यामुळे खूप आराम मिळेल.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा:
गुलाबी ओठांसाठी ‘हे’ करा घरगुती उपाय
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ उपाय
रूम हिटर वापरत असाल तर ‘हे’ आधी वाचा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.