रशियाने मार्क जुकरबर्ग यांची कंपनी मेटा हिला दहशतवादी संघटनेच्या लिस्टमध्ये टाकले आहे. खरंतर मेटा इंस्टाग्राम आणि फेसबुकची पेरेंट कंपनीच आहे. मॉस्कोच्या एका कोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहशवादासंदर्भात गतविधी होत असल्याचा आरोप लावत दावा केला की, ते युक्रेनमध्ये सोशल मीडिया युजर्सला रशियनच्या विरोधात हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी पोस्ट करण्याची परवानगी देत आहे. रशियाने गेल्या वर्षात मार्च महिन्यातच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे. (FB & Instagram)
दरम्यान, रशियाने फेब्रुवारीत युक्रेनवर हल्ला केला होता. रशियाच्या अधिकाऱ्यांनी असा आरोप लावला होता की, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रशियाच्या विरोधात वाईट प्रचार करत आहेत. रशियात खासकरुन इंस्टाग्राम अत्यंत लोकप्रिय आहे. हे जाहिरात आणि सेल्ससाठी खुप महत्वाचे प्लॅटफॉर्म होते. मेटाच्या वकिलांनी त्यावेळी हे आरोप फेटाळून लावले. कोर्टाला त्यांनी म्हटले की, त्यांची संघटना कधीच दहशतवादी हालचालींमध्ये कधीच सहभागी झालेली नाही.

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाने उचलले हे पाऊल
रशियाने हे पाऊल युक्रेनच्या उर्जा केंद्रावर हल्ला सुरु केल्यानंतर एका दिवसानंतर उचलले आहे. रशियाने क्रिमिया पुल उडवल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले सुद्धा केले. दरम्यान २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाने सोशल मीडियावर करडी नजर ठेवली होती. त्यानंतर युरोपात टेक कंपन्यांनी रशियन मीडियावर बंदी घातली. (FB & Instagram)
दरम्यान, रशियात इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बंदी घातल्यानंतर टेलिग्राम अॅप डाऊनलोड करण्याची संख्या तेथे वाढली गेली. मात्र डेटा सिक्युरिटी आणि चुकीच्या सुचनांमुळे टेलीग्रामच्या सुरक्षिततेबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थितीत केले गेले बोते. तरीही रशियन नागरिकांनी टेलीग्राम अॅप डाऊनलोड केले. टेलीग्राम हे एक मास मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणेच काम करते.
हे देखील वाचा- व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलची बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवणी खरी झाली तर…
रशिया आणि युक्रेनमध्ये शांतीचे संकेत दिसत नाहीयेत
तर रशिया आणि युक्रेन सैन्य हे आता नवव्या महिन्यात प्रवेश करत असून अजून ही त्यांच्यामध्ये लढाई सुरु आहे. त्यामुळे शांतीचे कोणतेही संकेत कुठेच दिसून येत नाही आहे. दोन दिवसांपूर्वीच रशियाकडून काही दिवसानंतर युक्रेनची राजधानी किव मध्ये काही क्षेपणस्र उडवली गेली. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंक्सी यांनी असे म्हटले की, रशिया आम्हाला संपण्याचा प्रयत्न करत आहे.