Home » Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Fathers Day
Share

“कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात

ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात,
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात

माया बाबांची असते कस्तुरीपरी
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी”

या ओळी कुठे तरी वाचनात आल्या होत्या. या ओळींचा मतितार्थ इतका सुंदर आणि मनास भिडणारा आहे की, त्या ओळी थेट मनाच्या भिंतीवर कोरल्याचं गेल्या. आपल्या आयुष्यातील ‘वडील’ रुपी देवाला शब्दात मांडायचा अतिशय उत्तम प्रयत्न आहे हा. कायम आईबद्दल, आईच्या प्रेमाबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, आईच्या महतीबद्दल बोलले जाते. आईच्या कोणत्याही गोष्टीबद्दल कधीच शंका नसते. मात्र कधी कधी आईच्या पुढे बाप काहीसा मागे पडतो. जरी वडिलांचे प्रेम, कष्ट, माया, त्याग स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्या अस्तित्वाशिवाय सर्वच नगण्य असते. प्रत्येक घरातला खरा आधार हे वडीलच असतात. वरवर कितीही कठोर, शिस्तप्रिय दिसणारे वडील प्रत्यक्षात मात्र सर्वात जास्त हळवे आणि प्रेमळ असतात. (Fathers Day)

मात्र जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये दबलेल्या वडिलांना त्यांची दुसरी बाजू कधी दाखवताच येत नाही. अशा या वडिलांचा आपल्याला कधी कधी राग देखील येतो, भीती वाटते, आदर वाटतो. प्रत्येकालाच वडिलांपेक्षा आईच जास्त जवळची वाटत असते. कायम घराबाहेर राहून आपल्या गरज पूर्ण करण्यात व्यस्त असलेल्या बाबांना कधी आपण ओळखूच शकत नाही. सकाळी सगळ्यांच्या आधी उठून बाहेर जाणारा आणि रात्री सर्व झोपल्यावर घरात येणाऱ्या वडिलांचे कष्ट आपल्याला कदाचित दिसत नाही, किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच आपण वडिलांबद्दल खूप कमी वेळा व्यक्त होतो. (Marathi NEws)

Fathers Day

अशा या वडिलांच्या त्यागाची, प्रेमाची जाणीव व्हावी आणि आपण निदान एक दिवस तरी त्यांच्यासाठी, त्यांच्यासोबत राहावे, त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता,  प्रेम व्यक्त करता यावे, याच दृष्टिकोनातून कदाचित फादर्स डे साजरा करण्याची पद्धत रूढ झाली असावी. असा हा फादर्स डे आपण आज साजरा करत आहोत. मधल्या काही काळापासून विविध डेज सारी करण्याची मोठी प्रथा निर्माण झाली आहे. यातलाच एक अतिशय महत्वाचा डे म्हणजे फादर्स डे. दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 15 जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. जाणून घेऊया याच फादर्स डेबद्दल अधिक माहिती. (Marathi Top Headline)

जगभरातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना फादर्स डे साजरा केला जातो. पण जवळपास सर्वच देशांमध्ये जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे. भारत, अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तर स्पेन आणि पोर्तुगालमध्ये 19 मार्चला फादर्स डे साजरा होतो. (Todays Marathi Headline)

फादर्स डे चा इतिहास
अमेरिकेत १९१४ सालापासून मातृदिनासाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येऊ लागली. मात्र यामुळे पितृदिन साजरी करण्याची मागणी होऊ लागली. आईसाठी एखादा दिवस साजरा होत असेल तर वडिलांसाठी देखील एक दिवस साजरा करण्यात यावा, त्यांचे कर्तृत्व देखील मोठे असते. ज्यामुळे पुढे ५ जुलै १९०८ मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये फादर्स डेसाठी ३६२ पित्यांचा सन्मान करण्यात आला. हे सर्व पिता आधीच्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात मरण पावले होते. अशा पद्धतीने पितृत्वाचा सन्मान करणारा फादर्स डेसाठी पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Top Stories)

Fathers Day

‘फादर्स डे’ ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. या दिवसाची सुरूवात एका अमेरिकन महिलेने केले आहे. या महिलेचे नाव सोनोरा स्मार्ट डॉड असे आहे. तिच्या आईचे निधन झाल्यावर तिच्या वडिलांनी सहा मुलांचा सांभाळ एकट्याने केला. आईची कमी भरून काढत सर्व मुलांना एकट्याने वाढवले. त्यामुळे सोनोरा यांना कायम वाटायचे की, मदर्स डे प्रमाणेच फादर्स डे देखील असावा. (Social News)

या दिवशी आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम, कृतज्ञता व्यक्त करता यावी. यासाठी तिने अनेक प्रयत्न केले. तिच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यानुसार १९ जून १९१० रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. त्यानंतर १९६६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यात यावा, अशी अधिकृत घोषणा केली. हळूहळू हा फादर्स डे जगभर पसरला आणि साजरी केला जाऊ लागला. भारतामध्ये सुद्धा मागील काही वर्षांपासून फादर्स डे साजरा करण्यामागचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. यादिवशी मुलं आपल्या वडिलांना एखादी वस्तू भेट म्हणून देतात तर काहींजण बाहेर फिरायला घेऊन जातात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

=======

२०२५ ची फादर्स डे थीम
यंदा Fathers: Nurturing Resilience and Shaping Futures’ अशी थीम आहे. मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी वडिलांच्या योगदानावर भर देणे हा या थीमचा उद्देश आहे.

जागतिक पातळीवर फादर्स डे साजरा करण्याच्या वेळा आणि त्यामागील कारण वेगवेगळे आहे. पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफ यांचा जन्मदिवस म्हणून फादर्स डे साजरा केला जातो. तर, जिजसला माता मनणारे तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. यानंतर हळूहळू जगभरतील सुमारे ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला. (Marathi Trending News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.