Home » यंदा फादर्स डे कधी? जाणून घ्या महत्त्व

यंदा फादर्स डे कधी? जाणून घ्या महत्त्व

वडील आणि मुलामधील अतूट नाते मजबूत करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. अशातच फादर्स डे कधी साजरा केला जाणार आणि महत्त्व काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Fathers Day 2024
Share

Fathers Day 2024 : प्रत्येक वर्षी मुल फादर्स डे ची वाट पाहत असतात. हा दिवस वडिलांना समर्पित केला जातो. खरंतर, वडील आणि मुलामधील अतूट बंधन मजबूत करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना वेगवेगळ्या पद्धतीने फादर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या जातात. अशातच यंदा फादर्स डे 16 जून 2024 रोजी साजरा केला जातो.

फादर्स डे चा इतिहास
भारतासह काही देशात फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ऑगस्ट महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. याशिवाय थायलँडमध्ये फादर्स डे डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो. खरंतर, फादर्स डे 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला वडीलांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. फादर्स डे सर्वप्रथम पश्चिम वर्जीनियामध्ये फेअरमोंटमध्ये 19 जून 1910 मध्ये साजरा केला होता.

फादर्स डे का साजरा केला जातो?
फादर्स डे साजरा करण्यामागील एक कथा आहे. ही कथा अमेरिकन गृहयुद्धातील विल्यम जॅक्सन स्मार्ट यांची मुलगी सोनोराची कथा आहे. सोनोरा वॉशिंग्टनमध्ये स्पोकन येथे राहणारी होती. सोनेराच्या आईचा बाळाला जन्म देण्यावेळीच मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर सोनोराने आपल्या वडील आणि लहान भावासोबत राहून आयुष्य जगले. ज्या प्रकारे सोनोराचे वडील सर्व मुलांची काळजी घ्यायचे त्याच प्रमाणे सोनोरा आपल्या वडीलांना सन्मान देऊ पाहत होती. (Fathers Day 2024)

अशातच स्पोकोन सेंट्रल मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये बिशपकडून मदर्स डे निमित्त धर्म उपदेश दिला होता. तो ऐकल्यानंतर सोनोराच्या मनात विचार आला की, अशाच प्रकारचा सन्मान वडीलांनाही मिळावा. याच गोष्टीवरुन सोरोना नेस्पोकोनने मिनिस्टीरियल एलाइंसोबत मिळून वडीलांचा जन्मदिवस म्हणजेच 8 जूनला वडिलांच्या सन्मानासाठी फादर्स डे साजरा करण्याचे ठरवले. तेव्हापासून फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.

असा साजरा करा फादर्स डे
फादर्स डे निमित्त तुम्ही वडिलांना एखादे पत्र, गिफ्ट अथवा डिनरसाठी घेऊन जाऊ शकता. याशिवाय तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल आभार व्यक्त करू शकता.


आणखी वाचा :
‘या’ मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला
पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे घर, मुकेश अंबानींच्या अँटेलियाला देते टक्कर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.