Home » मुलीशी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी अन्यथा नात्यात फूट पडू शकते

मुलीशी चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी अन्यथा नात्यात फूट पडू शकते

by Team Gajawaja
0 comment
Father and Daughter Relationship
Share

वडिल आणि मुलीचे नाते अत्यंत खास असते. जेथे मुलींना वडिलांची परी मानले जाते तर वडिलांना मुलींचे सुपर हिरो मानले जाते. अशा वडिल-मुलीच्या नात्यात दोघेजण एकमेकांना आपल्या सर्व गोष्टी सांगतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलीशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्या नाही पाहिजेत? यामुळे मुलीवर वाईट प्रभाव पडतोच पण तुमच्या नात्यात फूट ही पडू शकते. (Father and Daughter Relationship)

मुलगी आणि वडिलांचे नाते अगदी खास मैत्रीचे नाते मानले जाते. अशातच मुलगी आपल्या सर्व गोष्टी वडिलांना शेअर करते. पण वडिलांच्या काही गोष्टी या मुलीच्या भावना दुखावू शतकतात. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी मुलीला तुम्ही कधीच बोलू नयेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

-मुलासोबत तुलना करु नका
वडिल नेहमीच आपल्या मुलींची मुलांसोबत तुलना करतात. यामुळे मुलीला वाईट वाटू शकते. मुलींचे राहणीमान, वागण्या-बोलण्याची पद्धत ही मुलांपेक्षा फार वेगळी असते. त्यांचे विचार ही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे वडिलांनी कधीच मुलीची तुलना आपला मुलासोबत करु नये. भले मुलगा लहान असेल किंवा मोठा.

-काम करण्याचा सल्ला
वडिलांना आपली मुलगी फार प्रिय असते. त्यामुळे ते तिला हवं तसं वागण्याची मोकळीक देतात. परंतु समाज आणि परिवाराच्या दबावामुळे मुलीला घरातील काम करण्यास ही काहीवेळेस जबरदस्ती केली जाते. त्यामुळे मुलीला वाईट वाटू शकते. तिच्या मानसिक विकासावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे मुलीला कधीच जोरजबरदस्ती करुन घरातील कामे करण्यास सांगू नका.

-खाण्यासंदर्भात मस्करी नको
काही वेळेस वडिल मुलांना अधिक खाणं खाण्याचा सल्ला देतात. अशातच ते म्हणतात अधिक खाल्ल तर वजन वाढले जाईल. ही गोष्ट तुमच्या मुलीला वाईट वाटू शकते. त्यामुळे मुलीची  कधीच खाण्यावरुन मस्करी करु नये.

-हा सल्ला देऊ नका
हसणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु वडिल हे मुलीला नेहमीच हसत खेळत राहण्याचा सल्ला देतात. जेणेकरुन समोरच्या व्यक्ती तिच्याबद्दल अधिक बोलेल. पण तुमचा हा सल्ला कधीतरी चुकू शकतो. विनाकारण हसण्याच्या सवयीमुळे लोक मस्करी करु लागतात. (Father and Daughter Relationship)

हे देखील वाचा- लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवल्याने होतात ‘हे’ फायदे

-प्रत्येक गोष्टीसाठी अडवू नये
मुलींना काही गोष्टींचे पालन करण्यास जरुर सांगितले जाते. त्या गोष्टी ठरवलेल्या पद्धतीनेच केल्या पाहिजेत अशी ही जबरदस्ती करतात. यामुळे मुलीच्या मनात तुमच्या बद्दल राग निर्माण होऊ शकतो. तिला तिची मोकळीकता न मिळाल्यास तुमच्यात दूरावा निर्माण होऊ शकतोच. पण तिला वेळोवेळी एखादी गोष्ट करण्यापासून अडवल्यास ही तिला वाईट वाटू शकते.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.