पुरुष मंडळी आपले पाकिट हे जीन्स किंवा पँन्टच्या मागील खिशात ठेवतात. ही एक सर्वसामान्य बाब आहे. पैसे ते काही प्रकारचे कार्ड असलेले आपले पाकिट मागील खिशात ठेवण्याची सवय बहुतांश पुरुष मंडळींना असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हिच सवय तुम्हाला एका गंभीर आजाराचे शिकार बनवून शकते. यामुळे तुमचे चालणे-फिरणे, उठणे-बसणे मुश्किल होऊ शकते.(Fat wallet syndrome)
नुकत्याच हैदराबाद मधील एका ३० वर्षीय व्यक्तिला एक आजार झाला. सुरुवातीला त्याला आपल्या धमन्यासंदर्भातील लहान समस्या असल्याचे समजत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर दुखणे ऐवढे वाढले की, त्याच्या ढुंगणाची डावी बाजू ते पंज्यांपर्यंत दुखू लागले होते. काही प्रकारी औषधं आणि उपचार घेतल्यानंतर ही त्याला काही फरक पडला नाही. अशातच अधिक तपास केल्यानंतर असे कळले की, त्याला फॅट वॉलेट सिंड्रोम होता.
फॅट वॉलेट सिंड्रोम म्हणजे काय?
फॅट वॉलेट सिंड्रोमने पीडित त्या व्यक्तीला उभे राहणे किंवा चालण्याच्या तुलनेत बसणे किंवा झोपण्यासाठी अधिक समस्या येऊ लागली होती. त्या व्यक्तीच्या एमआरआयसह काही प्रकारच्या चाचण्या केल्या. त्यामध्ये पाठीच्या मणक्याच्या खालील हिस्स्याच्या येथे असलेल्या धमन्यांवर दबाव किंवा त्या संकुचित झाल्यासारखी स्थिती नव्हती.

त्यानंतर डॉक्टरांनी त्याचे नर्व कंडक्शन केले. या मध्ये डॉक्टरांना कळले की, क्या व्यक्तीच्या डाव्या साइटिक नर्वला गंभीर रुपात नुकसान पोहचले आहे. मात्र हे नक्की कळत नव्हते की, त्यामागील कारण काय? तेव्हा त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की, तो नेहमीच पँन्ट किंवा जीनसच्या डाव्या पासूला पैसे आणि कार्ड्स सारख्या गोष्टी असलेले पाकिट ठेवायचा. जे जवळजवळ १० तासांपर्यत ऑफिसमध्ये राहण्यादरम्यान तो खिशातच असायचे. (Fat wallet syndrome)
फॅट वॉलेट सिंड्रोम ठरु शकतो अत्यंत वेदनादायक
यानंतर डॉक्टरांना कळले की, त्याच्या पाकिटामुळे पिरिफोर्मिस मसल्स दबल्या गेल्या आहेत. यामुळेच मणका ते पाया पर्यंत जाणारी साइटिका नसवर दबाव पडत होता. फॅट वॉलेट सिंड्रोम झाल्याने त्याचा थेट साइटिका नसवर दबाव पडू शकतो. यामुळे रुग्णाला अत्यंत वेदना ही होऊ शकतात.
हे देखील वाचा- तुमच्या मुलाचे वेगाने वजन वाढत असेल तर ‘या’ टीप्स जरुर फॉलो करा
समस्या नक्की काय आहे?
बहुतांश पुरुष मंडळी ही आपल्या खिशात पैशांव्यतिरिक्त महत्वाचे कागद, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड सारख्या गोष्टी ठेवतात. यामुळे त्यांचे पाकिट अधिक जड होते. अशातच पाकिट खुप वेळ खिशात राहिले आणि त्यात आपण खुप वेळ बसून राहिलो तर फॅट वॉलेट सिंड्रोम होण्याची समस्या वाढते. या सिंड्रोमला मेडिकल भाषेत पिरिफोर्मिस सिंड्रोम असे म्हटले जाते.