प्रत्येक स्त्रीसाठी तिचा लूक खूपच जास्त महत्वाचा असतो. नोकरी करणारी स्त्री असो किंवा घर सांभाळणारी आपण नेहमीच सुंदर, आकर्षक दिसावे असे त्यांना वाटत असते. ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना, सण समारंभांना जाताना प्रत्येक स्त्री तिच्या लुककडे प्रकर्षाने लक्ष देते. काय घालावे इथपासून ते त्यावर मेकअप, चप्पल, हेयर स्टाइल आदी अगदी बारीक सारीक गोष्टी देखील ती कटाक्षाने पाळते. (Monsoon Saree Fashion)
सामान्य दिवसांमध्ये स्त्रियांना त्यांची स्टाइल, त्यांची फॅशन जपणे सोपे असते, पण पावसाळ्यात यात अनेक अडचणी येतात. अशावेळेस अनेक महिला आपले मन मारून एक तर कुठे जात नाही आणि गेल्या तर आवडीची फॅशन करणे टाळतात. मात्र पावसाळ्यात देखील महिलांना त्यांची फॅशन, स्टाईल नक्कीच जपता येईल. त्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आपण पाळल्या तर फायदा होऊ शकतो.

आता असंख्य महिलांसाठी त्यांचा अतिशय कम्फर्ट, आवडीचा असा पेहराव म्हणजे साडी. आपल्या भारतीय महिलांचे स्टाइल स्टेटमेंट असलेल्या साड्यांमध्ये प्रत्येक स्त्री अतिशय सुरेख आणि आकर्षक दिसते. अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या नेहमी म्हणजे अगदी दैनंदिन जीवनात, खास दिवशी देखील साडयांनाच पसंती देतात. मात्र याच साड्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरतात. आपली फॅशन, कम्फर्ट पावसाळ्यात कसा सांभाळावा हा प्रश्न नेहमीच महिलांना पडतो. यासाठीच आम्ही आज तुम्हाला पावसाळ्यात साड्यांची फँशन कशी जपावी हे सांगणार आहोत. (Monsoon Saree Fashion)
पावसाळा सुरु झाला की, मागोमाग येतात ते सणवार. रोज साड्या न नेसणाऱ्या स्त्रिया देखील या सणवारांच्या दिवसांमध्ये साडयांना प्राधान्य देतात. मात्र पाऊस असताना कोणत्या साड्या नेसाव्या?, त्या कश्या सांभाळाव्या? आदी एक न अनेक प्रश्न महिलांसमोर असतात. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.
पावसाळ्यात प्लेन शिफॉन साड्या नेसू शकतात. या साड्यांचे वजन अतिशय कमी असते. त्यामुळेच या साड्या नेसणे आणि सांभाळणे अगदी सोपे असते. शिफॉन साड्यांमध्ये लहरिया आणि बांधणी प्रिंट्समधील साड्या पावसाळ्यात अतिशय चांगल्या स्टाइल स्टेटमेंट ठरू शकतात. पावसाळ्यात पार्टी, सण, समारंभात देखील याच फॅब्रिकमधील एम्ब्रॉयडरी केलेली शिफॉन साडी तुम्ही नेसू शकतात. मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउजसोबत या साड्या अधिक उठून दिसतात. ऑफिसपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये या प्रकारच्या साड्या तुफान लोकप्रिय आहेत. (Monsoon Saree Fashion)
पावसाळ्यात तुम्ही शिफॉनसोबत जॉर्जेट या फॅब्रिकला देखील पसंती देऊ शकतात. अतिशय हलके आणि स्वस्त फॅब्रिक म्हणून जॉर्जेट फॅब्रिक ओळखले जाते. पावसाळ्यात जॉर्जेटमधील फॅब्रिकमध्ये फ्लोरल, जॉमेट्रिक, पोल्का डॉट्स यांसारख्या प्रिंट्सच्या साड्या निवडू शकता. फॉर्मलसोबतच अगदी कॅज्युअल लूक देणाऱ्या या साड्या खूपच आकर्षक दिसतात. शिफॉन प्रमाणेच जॉर्जेटच्या साड्या देखील ओल्या झाल्यानंतर लवकर वळतात.
आपण पावसाळ्यात कोणते फॅब्रिक वापरावे हे पाहिले आता पण कोणते रंग या ऋतूमध्ये वापरणे योग्य असेल ते पाहूया. प्रत्येक ऋतूमध्ये आपण चहू बाजूने विचार करून रंगांची निवड करणे गरजेचे असते. काळ, वेळ, परिस्थिती यानुसारच तुमचा लूक असावा. त्यामुळे पावसाळ्यात बहुतकरून तुम्ही डार्क अर्थात गडद रंगांच्या साड्यांची निवड करणे योग्य असेल. पेस्टल रंग कितीही ट्रेंडमध्ये असले किंवा आवडत असले तरी असे रंग पावसाळ्यात आपण टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही डार्क, प्रसन्न वाटेल असे रंग निवडा. ज्यात केशरी, निळा, गुलाबी, पिवळा,जांभळा, मरून, काळा या कलर्सचा विचार करू शकतात. (Monsoon Saree Fashion)

======
हे देखील वाचा : ॲव्होकॅडो खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे
======
यासोबतच तुम्ही तुमच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमध्ये देखील नवनवीन प्रयोग करून पाहू शकतात. सध्या रेडी टू वियर, धोती साडी खूपच गाजत आहे. त्याचमुळे नेहमीच्या पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा हा ट्रेंड फॉलो करा. शिवाय आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसारख्या जेगिंग्ज किंवा जीन्सवर देखील साडी नेसून तरी करू शकता. (Monsoon Saree Fashion)
मुख्य म्हणजे साडीसोबतच काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे या ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या मेकअपकडे देखील लक्ष द्या. लाइट, न्यूड, वॉटरफ्रुफ मेकअपला पसंती द्या. साडीवर फूटवेअरमध्ये हाय हिल्स घालणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही फ्लॅट किंवा सॅंडल निवडू शकतात. साडीवर दागिने घालताना जर ते ओले झाले तर त्यांची पॉलिश जाणार नाही याची काळजी घेत दागिने निवडा.
