Fashion Tips : लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण लग्नसोहळ्यात किंवा एखाद्या पार्टी फंक्शनला स्लिम दिसण्यासाठी काही फॅशन टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील.
लग्नसोहळ्यात सुंदर आणि स्लिम दिसण्यासाठी बहुतांशजणी चुकीच्या कपड्यांची निवड करतात. खरंतर यावेळी आपल्या शरीराच्या आकाराकडेही लक्ष दिले पाहिजे. याशिवाय चुकीच्या प्रिंट आणि स्टाइलचे कपडे निवडल्यास तुम्ही स्लिम दिसण्याऐवजी जाड दिसू शकता. अशातच लग्नसोहळ्यात स्लिम दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे तुमच्याकडे असायला पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
काळ्या रंगाचे ब्लाऊज
आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काळा रंग हा शरीराचा आकार एक इंचाने कमी दिसण्यास मदत करतो. काळ्या रंगांच्या कपड्यांमध्ये तुम्ही थोडे बारीक दिसता. यामुळे लग्नसोहळ्यात तुम्हाला स्लिम दिसायचे असल्यास काळ्या रंगाच्या ब्लाऊजची निवड करू शकता. या ब्लाऊजवर कोणत्याही रंगाची साडी परफेक्ट दिसते. अथवा काळ्या रंगाचे लॉन्ग ब्लाऊज आणि स्कर्ट हे कॉम्बिनेशनही ट्राय करू शकता.
लहान प्रिंट असणारे कपडे
जर तुमचे वजन अधिक आणि पोट बाहेर आलेले असल्यास मोठ्या प्रिंटऐवजी लहान प्रिंट असलेल्या कपड्यांची निवड करा. मोठ्या प्रिंटमध्ये तुम्ही अधिक जाड दिसू शकता. लग्नसोहळ्यावेळी स्लिम दिसण्यासाठी लहान प्रिंट असणारे कपडे निवडणे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या पर्सालिटीला देखील ते सूट करतील. याशिवाय तुम्ही चेक्स किंवा आवडव्या रेषा असणाऱ्या प्रिंट्सची निवड करू नका. यामुळे तुमची उंची कमी दिसेल.
कपड्यांचे फिटिंग
कपड्यांचे व्यवस्थितीत फिटिंग असल्यास तुम्ही बारीक आणि स्लिम दिसू शकता. आजकाल ओव्हरसाइज आणि सैल कपडे घालण्याचा ट्रेण्ड आहे. पण फॅमिली फंक्शनवेळी तुम्हाला स्लिम दिसायचे असल्यास बॉडी फिटिंग कपड्यांची निवड करा. जर सैल कपडे परिधान करायचे असल्यास गडद रंगाचे कपडे निवडता. गडद रंगांमध्ये तुम्ही अधिक जाड दिसत नाहीत.
लेहंगा
काहीवेळेस लग्नसोहळ्यावेळी लेहंगा हमखास परिधान केला जातो. मोठी डिझाइन किंवा पॅटर्न असणाऱ्या लेहंग्यात तुम्ही अधिक जाड दिसू शकता. यामुळे लग्नसोहळ्यात स्लिम दिसण्यासाठी लहान पॅटर्न अॅम्ब्रॉयडरी निवडा. याशिवाय लेहंग्यावरील ब्लाऊजसाठी देखील अधिक अॅम्ब्रॉयडरीची निवड करू नका. तुमचा लेहंगा आणि ब्लाऊज अधिक डिझाइन केलेले असल्यास तुम्ही त्यामध्ये अधिक जाड दिसू शकता.
अनारकली ड्रेस
लग्नात स्लिम दिसण्यासाठी तुम्ही अनारकली ड्रेसची निवड करू शकता. यामुळे तुमची उंची वाढलेली दिसतेच. तसेच या ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता. अनारकली ड्रेसवर अधिक गडद मेकअप करणे टाळा. ज्वेलरीबद्दल बोलायचे झाल्यास ड्रेसवर अधिक डिझाइन असल्यास कानात मोठे झुमकेच घाला. (Fashion Tips)
गडद रंगाची साडी
काही वेगवेगळ्या पॅटर्नमधील आउटफिट्सच्या तुलनेत गडद रंगाची साडी निवडू शकता. यामुळे तुम्ही स्लिम दिसू शकता. लग्नासाठी लाल, पिंक, जांभळा, काळा, रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीची निवड करू शकता.