Home » चिकनकारी एंब्रॉयडरी अशी ओळखा

चिकनकारी एंब्रॉयडरी अशी ओळखा

चिकनकारी एंब्रॉयडरीचा कुर्ता किंवा साडी याचा ट्रेंन्ड सध्या फार आहे. खरंतर ही एक जुनी एंब्रॉयडरी असून जी फॅशनच्या जगात फार फेमस आहे. प्रत्येक वर्गातील लोकांना लखनवी एंब्रॉयडरी खरेदी करणे पसंद करतात.

by Team Gajawaja
0 comment
fashion tips
Share

चिकनकारी एंब्रॉयडरीचा कुर्ता किंवा साडी याचा ट्रेंन्ड सध्या फार आहे. खरंतर ही एक जुनी एंब्रॉयडरी असून जी फॅशनच्या जगात फार फेमस आहे. प्रत्येक वर्गातील लोकांना लखनवी एंब्रॉयडरी खरेदी करणे पसंद करतात. कॉलेजला जाणाऱ्या तरुणी असो किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला प्रत्येकीला लखनवी चिकनकारी घालणे आवडते. यामुळे प्रत्येकीच्या कपाटात एकतरी चिकनकारी एंब्रॉयडरी ड्रेस जरुर असते. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या चिकनकारी एंब्रॉयडरीचे ड्रेस मिळतील. पण काही वेळेस आपल्याला यामध्ये फसवले जाते. (Fashion Tips)

आजच्या काळात लोक चिकनकारीच्या नावाखाली मशीनच्या मदतीने करण्यात आलेल्या डिझाइनचे कपडे तुम्हाला देतात. ज्याला आपण चिकनकारी एंब्रॉयडरी समजतो. अशा फसवणूकीपासून दूर राहण्यासाठई चिकनकारी एंब्रॉयडरी नक्की कशी ओळखायची हे पाहणार आहोत.

जर तुम्ही मार्केटमधून चिकनकारी कपडा खरेदी करणार असाल तर त्याच्या धाग्याकडे जरुर लक्ष द्या. याच्या धाग्याचे काम हाताने केले असेल तर तो धागा कॉटनचा असेल. मशीनच्या मदतीने केले असेलतर काही प्रकारचे थ्रेड मिळतील. जर रेशमच्या मदतीने काम केले असेल तर मशीनच्या रुपात डिझाइन करण्यात आले असेल. रेशमच्या धाग्यांनी करण्यात आलेले डिझाइन फार वेगळी असते. मशीनने रेशमचे डिझाइन करणे अत्यंत सोप्पे असते. मात्र हाताने रेशमच्या धाग्याने फाइन डिझाइन करणे मुश्किल होते.

Chikankari in India - History & Types

पण आधी सिल्वर जरी आणि गोल्डन जरीच्या माध्यमातून चिकनकारी डिझाइन केली जायची. फण आता अशा पद्धतीचे काम केलेले कारीगरी मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे जर तुम्हाला चिकनकारी मध्ये जरीचे काम केले असेल तर समजून जा हाताने डिझाइन केलेले नाही. तर यामध्ये मशीनचा वापर करण्यात आलेला आहे.

तुम्हाला माहिते असले पाहिजे की, मशीनच्या माध्यमातून ज्या कॉटन कापडावर चिकनकारी डिझाइन केले जाते त्याची क्वालिटी फार खराब असते. जे स्पष्टपणे दिसते. यामुळे चिकनकारी कपडे खरेदी करताना त्याचे कापड आणि थ्रेड याकडे जरुर लक्ष दिले पाहिजे. (Fashion Tips)

चिकनकारी कामासाठी सर्वाधिक उत्तम आणि प्योर कॉटनचा वापर केला जातो. त्यानंतर या कापड्यांवर ब्लॉक प्रिंट करून हातांनी धाग्यांच्या मदतीने काम केले जाते. ज्यावेळी भारतात जेव्हा चिकनकारी काम केले जायचे तेव्हा कॉटन ऐवजी मलमलचा कापड वापरला जायचा. अशा प्रकारचे कपडे राजा-महाराजा वापरायचे. पण हळूहळू अशा प्रकाराच्या डिझाइनसाठी कॉटनच्या कापडाचा वापर केला जाऊ लागला. कॉटनच्या कापडांव्यतिरिक्त चिकनकारी शिफॉन, जॉर्जेट, सिल्क आणि सिंथेटिक फॅब्रिकमध्ये सुद्धा मिळते. त्यामुळे चिकनकारी कुर्ता खरेदी करताना या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन तुम्हाला मूळ चिकनकारी कापडे खरेदी करता येतील.


हेही वाचा- थंडीत लोकरीच्या कपड्यांची अशी घ्या काळजी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.