Home » Summer : उन्हाळ्यात स्टायलिश लूक पाहिजे…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो

Summer : उन्हाळ्यात स्टायलिश लूक पाहिजे…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो

by Jyotsna Kulkarni
0 comment
Summer
Share

उन्हाळा म्हटला की सगळ्यांच्या डोक्यात सर्वात आधी येते ते कडक ऊन आणि घाम. या ऋतूमध्ये घरातून बाहेर पडायला देखील कंटाळा येतो. मात्र घरात किती दिवस बसून राहणार? कामासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावेच लागते. मात्र मग एक मोठा प्रश्न पुढे आ विसरून उभाच असतो. (Summer)

उन्हात बाहेर जायचे मग कपडे कोणते घालायचे? कारण उन्हामध्ये कम्फर्टेबल कपडे घालणे खूपच आवश्यक असते. मग आता साधे कपडे घातले तर आपण इतरांपेक्षा वेगळे (ऑड) आणि फॅशनेबल दिसणार नाही. अशा वेळेस काय करावे? उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे जेणेकरून आपण फॅशनेबल आणि कंफर्टेबल पण दिसू? चला तर जाणून घेऊया तुमच्या याच प्रश्नाच्या उत्तराबद्दल. (Summer Fashion)

* तुमचे आउटफिट निवडण्यापूर्वी, योग्य फॅब्रिक निवडणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात कॉटन, लिनेन, रेयॉन, शिफॉन आणि जॉर्जेट आदी प्रकारचे फॅब्रिक्स घालणे चांगले असते. उन्हाळ्यात या प्रकारच्या फॅब्रिकपासून बनवलेले पोशाख घातल्यास हे फॅब्रिक्स घाम शोषून घेतात, आणि शरीर थंड ठेवतात. या फॅब्रिक्सपासून बनलेले अनेक कपडे बाजारात सहज उपलब्ध होतात. (Marathi Latest News)

* उन्हाळ्यात कपडे निवडताना सर्वात आधी या ऋतूमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालावे हे लक्षात घेतले पाहिजे. उन्हाळ्यात खासकरून फिकट पिवळा, लिंबू कलर, हिरवा, लव्हेंडर असे रंग तुम्ही निवडू शकता. अशा रंगांचे कपडे उन्हाळ्यात डिसेंट दिसतात. खासकरून जर तुम्ही इंडियन वेयरमध्ये अर्थात ड्रेस किंवा कुर्ती घालणे आवडत असेल तर हे रंग नक्कीच उत्तम पर्याय आहे. (Latest Trending News)

==========

हे देखील वाचा : Wood Carving : काशीची काष्टकला !

==========

* उन्हाळ्यात पेस्टल रंगाचे कपडे नक्कीच कम्फर्टेबल पर्याय आहे. यामुळे तुमचा लुक सुंदर, सोबर दिसू शकतो. जर या रंगांचे एथनिक ड्रेस घालायचे असतील तर तुम्ही त्यासोबत ऑर्गेन्झा दुपट्टा कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक अधिकच उठून दिसेल.(Social News)Summer

* उन्हाळ्यात घट्ट कपडे घालणे टाळावे. कारण फिटिंग घट्ट असलेल्या कपड्यांमध्ये अधिक गरम होते आणि घामही खूप येतो. यामुळे उन्हाळ्यात सैल पोशाख निवडा. (Marathi Top News)

* उन्हाळ्यात स्लीव्हलेस कपडे घालणे टाळावे. कारण यामुळे टॅनिंग होण्याची दाट शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी फुल स्लीव्हजचे कपडे घालावेत. (Top Stories)

* उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट असलेले ड्रेस खूप छान दिसतात. यामुळे देखील तुम्ही अधिक एलिगंट आणि कॉन्फिडन्ट दिसतात.

==========

हे देखील वाचा : America : विमान अपघात मालिकेमागचे वास्तव !

==========

* उन्हाळ्यात मॅक्सी ड्रेस एक उत्तम पर्याय आहे. यामुळे हवा फिरते आणि लूक स्टायलिश दिसतो. उन्हाळ्यात टँक टॉप आणि शॉर्ट्स सेट, जंपसूट एक सोपा आणि स्टायलिश पर्याय आहे. याशिवाय वनपीस, पलाझ्झो, लॉन्ग शर्ट देखील घालता येतील. (Summer Fashion News)

* स्कार्फ. उन्हाळी फॅशनमध्ये स्कार्फ मोठी भूमिका बाजवताना दिसत आहे. अतिशय स्टयलिश पद्धतीने हे स्कर्फ तुम्ही कॅरी करू शकता. शिवाय बाजारात अतिशय हटके, सुंदर आणि आकर्षक विविध मटेरियलमध्ये असंख्य स्कार्फच्या व्हरायटी उपलब्ध आहेत. (Marathi News)

* सध्या अतिशय ट्रेंड होणारा आणि अतिशय लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे चिकनकारी. अलिग्नंट आणि सोबत लूक देणारे चिकनकारी कपडे कमालीचे स्टायलिश लूक देतात. अगदी टॉपपासून ते शरारा, पलाझो, ड्रेस आदी अनेक ट्रेंडी कापडायनामध्ये चिकनकारीने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. महिलांमध्ये देखील हा पारकर खूपच प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यासाठी चिकनकारी बेस्ट पर्याय आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.