Home » पावसाळ्यातही दिसायचे फॅशनेबल तर करा ‘या’ टिप्स फॉलो

पावसाळ्यातही दिसायचे फॅशनेबल तर करा ‘या’ टिप्स फॉलो

by Jyotsna Kulkarni
0 comment
fashion tips for rainy season
Share

पावसाळा म्हटले की अनेकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि मोठे हसू असते. मात्र बऱ्याच लोकांना पावसाळा अजिबातच आवडत नाही. कारण पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे घर सतत ओले वाटते, डासांचा त्रास, कपडे वाळत नाही, दमट हवामान, सतत एक विचित्र वास येतो आदी बरेच कारणं हा ऋतू न आवडण्याच्या मागे असू शकतात. (fashion tips for rainy season)

जे लोकं फॅशन आणि ट्रेंड फॉलो करता अशांना हा पावसाळा त्रासदायक ठरतो. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कपडे वाळत नाही आणि आपल्या आवडीचे, आपल्याला योग्य वाटेल असे कपडे घालता येत नाही. मेकअप करता येत नाही. पण असे नाही योग्य नियोजन केले तर आपण पाऊसात देखील आपली फॅशन आणि ट्रेंड पाळू शकतो. चला तर जाणून घेऊया या पावसाळ्यात तुम्ही फॅशन कशी आणि कोणत्या पद्धतीने फॉलो करू शकतात.

पावसाळ्यात कपडे कोणते घालावे हा मोठा आणि महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच जाणवतो. कारण कपडे पूर्णपणे वाळत नाही आणि ओलसर कपड्यांमुळे त्वचेला देखील त्रास होऊ शकतो. चला तर मग तुमचा हा प्रश्न सोडवू.

सर्वात आधी पावसाळ्यात ऑफिस, कॉलेजला जाताना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आणि घ्यायचे ते पाहू.

पावसाळ्यात चिखल आणि मातीचे डाग कपडयांना पडण्याची शक्यता खूपच जास्त असते. त्यामुळे या ऋतूमध्ये फिकट नाही तर गडद रंगाचे कपडे निवडा. यात लाल, निळा, पिवळा, हिरवा, नारंगी आदी रंगांची निवड करू शकता. तर प्रिंट किंवा डिझाइनचा विचार केला तर पावसाळ्यात फ्लोरल प्रिंटचे ड्रेस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यात तुम्ही आकर्षक आणि स्टयलिश दिसू शकता.

                हे देखील वाचा : फाउंडेशन लावल्यानंतरच चेहरा जाड दिसतो? जाणून घ्या परफेक्ट शेप देण्याची सोपी पद्धत

कपड्यांमध्ये आपण पाहिले तर लांब पँट असलेले ड्रेस पावसाच्या पाण्यात ओले होण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपण शॉर्ट किंवा अँकल लेन्थ लेगिन्स घालू शकतो. यासोबतच मिडी कपडे, स्केटर स्कर्ट हे देखील घालू शकतो. पुलोवर्स, डेनिम, लोकरीचे कपडे, सिल्क, लिनन आदी फॅब्रिक घालणे पावसाळ्यात टाळावे.

वेस्टर्न लुक करायचा असेल तर त्यात क्रॉप पॅंट निवडणे योग्य ठरू शकते. जर तुम्ही इंडियन लूक करणार असाल तर कुर्तीवर सलवार, लेगिंग्ज किंवा चुरीदार घालू शकता. सोबत दुपट्टा, स्कार्फ किंवा स्टोलचा वापर करु शकतो. श्रग्स देखील या काळात उत्तम पर्याय ठरू शकतो. यात किमोनो आणि काफ्तान श्रग्स जास्त उठावदार दिसतात. जीन्स लवकर वाळत नसल्याने त्याला पर्याय म्हणून पलाझो किंवा कोणत्याही रुंद-हेम्ड बॉटम्स घालू शकतो. मुख्य गोष्ट पावसात कुर्ता, टॉप, टी शर्ट या खाली स्लिप किंवा स्पॅगेटी घालाच.

पावसात शॉर्ट्स कपडे जास्त योग्य ठरू शकतात. जेणेकरून कपडे भिजत नाही. त्यामुळे तुम्ही शॉर्ट्स, फ्रॉक हे कपडे नक्की निवडू शकता. यामुळे तुम्ही फॅशनेबल देखील दिसाल. पावसाळ्यात घट्ट आणि जाड कापड असलेले कपडे घालणे टाळा.

                हे देखील वाचा : स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात

कपड्यांनंतर आपण चपला, शूज देखील योग्य निवडणे आवश्यक आहे. पाय ओले राहिले त्वचेचा त्रास किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते. अशावेळी आपण पावसाळी चपलांचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. कॅनव्हास किंवा कापडी शूज पावसाळ्यात खराब होतात. ओलावा आणि चिखलामुळे जास्त उंच आणि पूर्ण फ्लॅट चपला वापरणे टाळा. शिवाय रबरी बूट्स, जेली शूज आणि फ्लिप-फ्लॉप हे देखील उत्तम पर्याय आहेत. यासोबत तुम्ही वॉटरप्रूफ मोजे देखील घालू शकता.

पावसाळ्यात मेकअप केला तरी तो टिकवणे अवघड असते. पावसात ओले झाल्यास मेकअप देखील खराब होऊ शकतो. अशावेळेस वॉटरप्रूफ मेकअप उत्तम असेल. काजळ ओले झाल्यास डोळ्यांखाली पसरू शकते त्यामुळे, काजळ लावण्यापेक्षा वॉटरप्रूफ लायनर लावा. लिपस्टीकमध्ये तुम्ही न्यूड लिपस्टीक निवडा.

                हे देखील वाचा :  मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.