आउटफिट्स खरेदी करताना रंग आणि पॅटर्न व्यतिरिक्त फॅब्रिककडे सुद्धा लक्ष देणे फार महत्त्वाचे असते. अशा फॅब्रिकचे कपडे खरेदी करावेत ज्यामध्ये तुम्ही कंम्फर्टेबल असाल. त्याचसोबच रंगाचे पॅटर्न आणि कॉम्बिनेशनकडे सुद्धा खास लक्ष द्यावे लागेल. आज आपण काही कलर पॅटर्नबद्दलच्या टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केलात तर नक्कीच स्टाइलिश दिसू शकता. (Fashion tips)
-डबल शेड निवडा
सध्या डबल शेडच्या कपड्यांचा ट्रेंन्ड फार आहे. तुम्ही सुद्धा डबल शेट पॅटर्न एखाद्या लग्नावेळी किंवा पार्टीसाठी निवडू शकता. हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. अशा प्रकारची तुम्ही स्टाइलिश साडी खरेदी करू शकता. ती तुम्हाला २ हजार ते ४ हजार रुपयांमध्ये मिळेल. जर तुम्ही अशा प्रकारची साडी कॅरी करत असाल तर याच्यासोबत मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक क्लासी दिसेल.
-ब्राइट रंग निवडा
आजच्या काळात ब्राइट रंग घालणे पसंद केले जाते. ब्राइट कलर्ससोबत चेहऱ्याचा रंग सुद्धा उजळ दिसतो. ब्राइट रंगाचे को-ऑर्ड सेट्स तुम्हाला शिखाला परवडणाऱ्या किंमतीत मिळतील. अशा रंगांच्या कपड्यांवर तुम्ही पिंक रंगाच्या ब्लशचा वापरू शकता. याव्यतिरिक्त तुमचे केस वेवी ओपन अथवा कर्ल्स करू शकता.
-कूल टोन
जर तुम्हाला एखाद्या लग्नसोहळ्यात किंवा पार्टीला जायचे असेल तर तुम्ही कूल टोन निवडू शकता. कूल टोन असणारे कपडे, साडी तुम्हाला मार्केटमध्ये दोन ते तीन हजारांमध्ये सहज मिळेल. पार्टीत किंवा एखाद्या फंक्शनमध्ये यामुळे तुमचा लूक अधिक खुलला जाईल. अशा कपड्यांसोबत ड्युई बेस मेकअप आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करून तुमचा लूक कंम्प्लिट करू शकता. (Fashion tips)
-वर्सेटाइल पीसेज करा ट्राय
जर तुम्हाला खास प्रकारचे कपडे खरेदी करायचे नसतील तर वर्सेटाइल पीसेजसोबत कपडे मॅच करून घालू शकता. मॅक्सी ड्रेस, शॉर्ट्सचे एक पेअर आणि एक फ्लोई टॉप बेस्ट ऑप्शन आहे. जे तुम्ही मिस मॅच करून नवे पेअर तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही काही प्रकारचे कपडे विविध पद्धतीने मॅच करून घालू शकता. यामुळे तुमचा लूक हटके दिसेलच पण तुम्ही स्टाइलिशही दिसाल.(Fashion tips)
-श्रग कॅरी करू शकता
थंडीच्या दिवसात स्टाइल करायची असेल तर श्रग जरुर तुमच्यासोबत ठेवा. यामुळे तुम्हाल थंडी वाजणार नाही आणि तुमचा लूक ही वेगळा दिसेल.
हेही वाचा- चिकनकारी एंब्रॉयडरी अशी ओळखा