Fashion Tips : बॉडीकॉन ड्रेस केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच नव्हे सामान्य महिलांना देखल सुंदर दिसतात. स्लिम असणाऱ्या महिलांवर बॉडीकॉन ड्रेस अत्यंत सुंदर दिसतात. पण ज्यांचे वजन अधिक असते त्यांच्यावरही असा ड्रेस छान दिसू शकतो. खरंतर बॉडीकॉन ड्रेस कॅरी करणे थोडे मुश्किल आहे. पण पँटी लाइन्स ते बेलीपर्यंत घट्ट असतात.अशातच तुम्ही पुढील काही टिप्स बॉडीकॉन ड्रेस परिधान करण्यापूर्वी लक्षात ठेवा.
योग्य शेपवेअरची निवड
बॉडीकॉन ड्रेसमध्ये तुम्हाल परफेक्ट फिगर हवी असल्यास आणि वजन वाढलेले असल्यास योग्य शेपवेअरची निवड करा. खरंतर शेप वेअर परिधान केल्याने तुम्ही बॉडीकॉन ड्रेसमध्ये बारीक दिसू शकता.
जाड आणि प्रिंट फॅब्रिकची निवड
तुम्ही वजनाने अधिक असाल तर प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस खरेदी करू शकता. प्रिंटेड ड्रेसमध्ये पँटी किंवा ब्रा लाइन दिसत नाही. प्रिंटेड ड्रेस इनरवेअर लाइन्स लपवतात. प्लॅन फॅब्रिकवर तुम्ही जॅकेट परिधान करू शकता.
योग्य नेकलाइन
जेव्हा तुम्ही बॉडीकॉन ड्रेस परिधान करता तेव्हा लोकांची नजर पहिली तुमच्या ड्रेसच्या गळ्याकडे जाते. यामुळे अशा ड्रेससाठी योग्य नेकलाइन निवडणे गरजेचे आहे. आजकाल वेगवेगळ्या नेकलाइन असणारे ड्रेस तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येतील. (Fashion Tips)
फुटवेअरकडे लक्ष द्या
तुमची उंची अधिक आणि तुम्ही बारीक असाल तर बॉडीकॉन ड्रेसवर फ्लॅट फुटवेअर घालू शकता. याशिवाय उंचीने कमी असल्यास या ड्रेसवर हिल्स फुटवेअर घालू शकता.