Home » तुम्ही उंचीने कमी असाल तर फॅशनसंबंधित या चुका करणे टाळा

तुम्ही उंचीने कमी असाल तर फॅशनसंबंधित या चुका करणे टाळा

उंचीने कमी असणाऱ्या मुलींनी नेहमीच फॅशनसंदर्भातील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा आउटफिट निवडताना चुका केल्यास तुमचा लुक बिघडला जाऊ शकतो.

by Team Gajawaja
0 comment
Fashion Tips
Share

Fashion Tips : तुम्ही बहुतांशजणांना हे बोलताना ऐकले असेल की, उंचीने अधिक असलेल्या तरुणींना कोणत्याही पद्धतीने कपडे सूट करतात. पण उंची कमी असेल तर आवडीचे कपडेही निवडताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशातच आत्मविश्वास डगमगला जातो. त्यामुळे तुमची उंची कमी असेल तर फॅशनबद्दलच्या काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक….

हेव्ही लेअर्स
उंचीने कमी असेल तर तुम्ही हेव्ही लेअर्स किवा फ्रिल्स असणारे कपडे परिधान करू नयेत. अशा कपड्यांमध्ये उंची अधिकच कमी दिसून येते. तुम्हाला लेअरिंग पसंत असेल तर तुम्ही मोनोक्रोम लुक ट्राय करू शकता. यामुळे तुमची उंची थोडी वाढलेली दिसेल.

ओव्हरसाइज टॉप किंवा अधिक लांब ड्रेस
ओव्हरसाइज कपडे सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. असे कपडे परिधान केल्यानंतर फार रिलॅक्स वाटते. पण तुमची उंची कमी असल्यास ओव्हरसाइज कपडे घालणे टाळले पाहिजे. याशिवाय अधिक लांब ड्रेसही परिधान करू नका. त्याऐवजी असे टॉप्स निवडा जे तुमच्यावर व्यवस्थितीत फिट बसतील.

मोठ्या पॅटर्न्सचे कपडे
उंची कमी असल्यास तुम्ही मोठे आणि बोल्ड प्रिंट्सचे कपडे परिधान करणे टाळा. अशा कपड्यांमुळे तुमचे शरिर अधिक कव्हर होत असल्याचे दिसेल. त्याऐवी लहान आणि मीडियम प्रिंट असणारे आउटफिट्स निवडा. यामुळे तुमची उंची वाढल्यासारखी दिसेल.

बल्की शूज
पेन्सिल हिल्सऐवजी वेज हिल्स सॅण्डल घालणे फार कंम्फर्टेबल असतात. पण उंची कमी असेल तर अशा प्रकारचे सॅण्डल घालू नये. यामुळे तुमची उंची अधिक कमी दिसेल. तुम्हाला व्हेज हिल्स अधिक पसंत असतील तर पातळ स्ट्रॅप्स किंवा न्यूड रंगातील निवडा. (Fashion Tips)

ओव्हरसाइज बॅग
ओव्हरसाइज बॅग अशा लोकांसाठी बेस्ट असतात जे अधिक सामान कॅरी करतात. पण तुमची उंची कमी असेल तर तुम्ही ओव्हरसाइज बॅग कॅरी करणे टाळा. त्याऐवी तुम्ही लहान किंवा मध्यम आकारातील बग कॅरी करा.


आणखी वाचा :
सुंदर त्वचेसाठी रात्री झोपना करा हे उपाय, उजळेल सौंदर्य
लग्नसोहळ्यात स्लिम दिसायचेय? लक्षात ठेवा या गोष्टी
सेलो स्किन म्हणजे काय? जाणून घ्या याची कारणे आणि उपचार

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.