बॉलिवूडमध्ये काम करणे हे अनेक प्रादेशिक भाषांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे स्वप्न असते. तर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकरांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची एक तरी संधी मिळावी अशी इच्छा असते. आजपर्यंत बॉलिवूडमधील किंवा भारतीय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकरांना हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. इरफान खान, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा कबीर बेदी आदी अनेक कलाकारांची नावे या यादीत आपल्याला घेता येतील. आता या यादीत अजून एक नाव सामील होणार आहे, आणि ते नाव म्हणजे बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता फरहान अख्तर. हो लवकरच फरहान (farhan akhtar) हॉलिवूडच्या अतिशय मोठ्या आणि नावाजलेल्या चित्रपटाचा भाग बनणार.
फरहान अख्तर लवकरच डिज्नी प्लसच्या आगामी Ms. Marvel (farhan akhtar) या सिरीजमध्ये दिसणार आहे. फरहान आणि त्याची पत्नी असलेल्या शिबानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. फरहानच्या या मोठ्या अचिव्हमेंटसाठी शिबानीने एक सुंदर पोस्ट शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला. तिने एका बातमीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “यासाठी अजिबातच वाट पाहू शकत नाही. पहिला मेनस्ट्रीम मुख्य अभिनेता, जो मार्वल युनिव्हर्सचा भाग बनणार आहे. फरहान अख्तर मला तुझ्यावर गर्व आहे.”
======
हे देखील वाचा- ‘दबंग गर्ल’ ने मिस्ट्री मॅनसोबत केला साखरपुडा?, सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण
======
फरहान अख्तरने (farhan akhtar) त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका बातमीचा फोटो शेअर करत लिहिले, “खूपच आनंदित आहे, की जग तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि शिकण्यासाठी अशा संधी देते. मला ही भूमिका करायला खूपच आनंद मिळणार आहे.” एका माहितीनुसार या ‘मिस मार्वल’मध्ये फरहानचा पाहुण्या कलाकाराचा रोल असेल. फरहानला मिळालेल्या या मोठ्या संधीमुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पाकिस्तानी अभिनेता असलेला फवाद खानदेखील या सिरीजचा भाग असणार आहे.

‘मिस मार्वल’ ही सिरीज मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सची असणार आहे. यांनी आतापर्यंत थोर, कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, इंटमॅन आदी अनेक सुपरहिरो जगासमोर आणले. मिस मार्वलमध्ये इमान वेल्लानीला कमला खानच्या रूपात दाखवले जाणार आहे. कमला खान ही मार्वलचा पहिला टिन मुस्लिम सुपरहिरो असणार आहे. मार्चमध्ये या सिरीजचा ट्रेलर लाँच केला गेला होता. या ट्रेलरमध्ये फरहान (farhan akhtar) न दिसल्यामुळे त्याचे फॅन्स जरासे नाराज झाले.
मार्वलची ही सिरीज येत्या ८ जूनपासून डिज्नी प्लस आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाणार आहे. आदिल एल अरबी, बिलाल फलाह, मीरा मेनन, शरमीन ओबैद-चिनॉय यांनी मार्वलच्या या सिरीजच्या भागांचे दिग्दर्शन केले आहे.

फरहान अख्तरच्या (farhan akhtar) वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो त्याच्या आगामी ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. या सिनेमाचे तो दिग्दर्शन करणार असून, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी फरहानचा ‘तुफान’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या प्रेक्षकांनी सरासरी प्रतिसाद दिला.