Home » Jewellery : लग्नसराईसाठी पारंपरिक दागिन्यांचे आकर्षक पर्याय

Jewellery : लग्नसराईसाठी पारंपरिक दागिन्यांचे आकर्षक पर्याय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jewellery
Share

सर्व सणवार, तुळशीचे लग्न देखील झाले आता सगळीकडे लग्नसराईला दणक्यात सुरुवात झाली आहे. चातुर्मासामध्ये बंद असलेले लग्न तुळशी विवाहानंतर पुन्हा सुरु होतात. त्यामुळे आता प्रत्येक कुटुंबामध्ये लग्न होतां दिसतील. आता लग्न म्हटल्यावर महिला वर्ग जास्तच उत्साही असतात. लग्नांमध्ये छान तयार होऊन जायचे आणि मिरवायचे, प्रत्येक स्त्रीला खूप आवडते. आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्नाला जाताना महिला वर्ग पारंपरिक वेशभूषेला जास्त प्राधान्य देतो. जरी काठाची सिल्कची साडी नेसण्याकडे महिलांचा जास्त कल असतो. मात्र अनेकदा या साड्यांवर वेगवेगळे कोणते दागिने परिधान करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आज आम्ही तुमच्या ह्याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. आपल्या महाराष्ट्रीय दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक आकर्षक आणि सुंदर पारंपरिक दागिन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्ही लग्नामध्ये घालून जाऊ शकता आणि मस्त मिरवू शकत. सोबतच इतर लोकांकडून कौतुक देखील करून घेऊ शकता. (Maharashtrian Jewellery)

चिंचपेटी
गळ्याला घट्ट बसणार हा दागिने सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. चिंचपेटी हा एक पारंपरिक महाराष्ट्रातील दागिना आहे, जो खासकरून नऊवारी किंवा सहावारी साडीवर परिधान केला जातो. हा नेकलेस मोत्यांपासून बनवलेला असतो. चिंचेच्या पानाच्या आकाराच्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्यांचे किंवा हिऱ्यांचे कोंदण करून रेशमी दोऱ्यांनी तयार केलेला असतो. सध्या चिंचपेटीमध्ये देखील भरपूर विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. मोत्याची वेल असलेल्या चिंचपेटीला तर बाजारात सध्या खूप जास्त मागणी आहे. कारण वेल असलेली चिंचपेटी गळ्यात घातल्यानंतर गळ्याचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते. यामुळे गाला भरगच्च दिसतो आणि सौंदर्यला चार चांद लागतात. (Marathi News)

आज तर चिंचपेटी केवळ मोत्यामध्ये नाहीतर ऑक्सिडाइज मध्ये सुद्धा उपलब्ध झाली आहे. जी तुम्ही कॉटन साडी किंवा मल कॉटन फॅब्रिकची साडी परिधान केल्यानंतर तुम्ही घालू शकता. तुम्ही थोडा वेगळा लूक करण्याचा विचार करत असला तर मोत्यांऐवजी गोल्डन रंगाची चिंचपेटी सुद्धा साडीवर घालू शकता. यामुळे गळा भरगच्च दिसतो आणि इतर कोणताही दागिना परिधान करण्याची आवश्यकता भासत नाही. (Marathi)

Jewellery

कोल्हापुरी साज
कोल्हापुरी साज हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे, जो मुख्यत्वे लाखेपासून बनवला जातो आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. यात सोन्याच्या तारेने गुंफलेले ‘जाव मणी’ आणि पानाच्या आकाराची नक्षी असते. हा साज खूप लोकप्रिय आहे. याशिवाय या हारमध्ये चंद्र, शंख, कासव, भुंगा तर बेलपान अशी शुभ शकुने असणार्‍या गोष्टी असतात. लग्न समारंभात किंवा इतर वेळी काठापदराची साडी नेसल्यानंतर तुम्ही कोल्हापूरी साज परिधान करू शकता. सध्या कोल्हापुरी साजमध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात ऑक्सिडाइज कोल्हापुरी साज देखील बाजारात सहज मिळतो. अनेक अभिनेत्रीचा तर हा आवडता दागिना आहे. (Marathi Trending News)

Jewellery

वज्रटीक
वज्रटीक हा पारंपरिक मराठी दागिना आहे, जो विशेषतः गळ्यात घालण्यासाठी वापरला जातो आणि तो साडीसोबत घालण्याकरिता छान दिसतो. या दागिन्यात सोन्यचे मणी, रेशीम धागा आणि सोन्यच्या तारांचा वापर केला जातो. वज्रटीक हा अतिशय जुना पेशवेकालीन दागिना असल्याचे सांगितले जाते. हा दागिने अतिशय सुंदर आणि आकर्षक असून हा घातल्याने तुमचे लूक अधिकच खुलून येईल यात शंका नाही. (Latest Marathi Headline)

Jewellery

पुतळीहार
पुतळीहार हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे, जो विशेषतः कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे. यात सोन्याच्या गोल चपट्या पुतळ्या (नाण्यांसारख्या) एका माळेत गुंफलेल्या असतात आणि त्यावर देवी लक्ष्मी, राम-सीता, किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. या हाराला होनहार, मोहरमाळ, अश्रफीहार, फलमाची माळ असेही म्हणतात. १६ व्या-१७ व्या शतकात असलेल्या ‘निष्क’ या दागिन्याशी याचा संबंध जोडला जातो.  हा पारंपारिक दागिना विशेषतः नऊवारी साडीवर घातला जातो आणि लग्न समारंभांमध्ये लोकप्रिय आहे. (Top Marathi Headline)

Jewellery

चितांग
चितांग हा एक पारंपरिक महाराष्ट्रातील दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना असून, गोलाकार पट्टी आणि फासा (पेंडंट) असतो. याला ‘चिंताक’ किंवा ‘चितिका’ असेही म्हणतात आणि हा कर्नाटकातील दागिना आहे. चितांग हा वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा दागिना आहे. यात एक गोलाकार किंवा १ ते १.५ सेमी सपाट पट्टी आणि पुढे जोडलेला फासा असतो. या दागिन्याचा संदर्भ आठव्या शतकापूर्वीपासून मिळतो आणि हा मूळचा कर्नाटक शैलीचा आहे. महाराष्ट्रातही हा दागिना ‘चित्तांग’ या नावाने ओळखला जात असे. हा दागिना लहान मुलांच्या मनगटातील ‘बिंदल्या’प्रमाणे दिसतो, पण तो मोठ्या आकाराचा असतो. आजकाल, हा दागिना तांब्याच्या बेसवर सोन्याच्या मुलाम्याने बनवलेल्या स्वरूपातही उपलब्ध आहे. जरा हटके डिझाइन असलेला हा चितांग दागिना नक्कीच तुम्हाला चारचौघात अधिक सुंदर बनवेल. (Top Trending News)

Jewellery

=========

Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ पौष्टिक लाडूंचे सेवन

Winter Trip : हिवाळ्यातील पर्यटनासाठी ‘ही’ आहेत भारतातील बेस्ट

=========

बोरमाळ
बोरमाळ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक दागिना आहे, जो गळ्यात घातला जातो. हा दागिना लहान बोराच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांची माळ असते, जी एका धाग्यात गुंफलेली असते. सोन्याच्या मण्यांऐवजी काहीवेळा पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाख भरली जाते, ज्यामुळे कमी सोन्यात मजबूत आणि आकर्षक दागिना तयार होतो. बोरमाळ बोराच्या आकाराच्या मण्यांपासून बनवलेली असते. यात गोल आणि लांबट चौकोनी अशा दोन्ही प्रकारच्या मण्यांचा वापर केला जातो. बोरमाळ प्रामुख्याने सोन्याची असते, पण चांदीमध्येही ती उपलब्ध असते. हा दागिना पारंपरिक सण-उत्सवांसोबतच रोजच्या वापरासाठीही उपयुक्त आहे. पूर्वी एक सरीची बोरमाळ जास्त प्रचलित होती, परंतु आता दोन किंवा त्याहून अधिक सऱ्यांच्या बोरमाळाही मिळतात. याशिवाय ही बोरमाळ ऑक्सिडाइजमध्ये देखील मिळते. मुख्य म्हणजे तुम्ही गळ्यात काहीही न घालता केवळ बोरमाळ घातली तरी तुमचे रूप खुलून येईल. (Social News)Jewellery

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.