आज कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा. आजच्या दिवसाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. आजच्या दिवशी सगळीकडे देव दिवाळी साजरी केली जाते. आपल्या पुराणांनुसार आजच्या दिवशी भगवान विष्णू यांनी त्यांच्या पहिला मस्य अवतार घेतला होता. शिवाय आजच्या दिवशी विष्णू त्यांच्या योग्य निद्रेतून बाहेर येतात आणि भगवान शिवांकडून सृष्टीचे पालकत्व स्विकारतात. शिवाय आजच्या दिवशी शंकराचे पुत्र कार्तिकेय यांचे दर्शन घेण्याची मोठी परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेला भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेऊन त्यांना मोरपीस वाहिले जाते. भगवान कार्तिकेय यांना युद्धाचा राजा असे देखील म्हटले जाते. त्यांनी तारकासुर राक्षसाचा वध करून लोकांचे आणि देवतांच्या त्याच्या अत्याचारापासून रक्षण केले होते. आजच्या दिवशी भगवान करतीय यांचे दर्शन घेतल्याने पुण्य मिळते अशी आस्था आहे. आज याच निमित्ताने आपण जाणून घेऊया भारतात असलेल्या भगवान कार्तिकेय यांच्या प्रसिद्ध मंदिरांबद्दल. (Todays Marathi Headline)
जीवाजी गंज, ग्वालियर
येथे भगवान कार्तिकेय यांचे भारतातील सर्वात जुने मंदिर असल्याचा दावा केला जातो. एका माहितीनुसार हे मंदिर जवळपास ४०० वर्ष जुने आहे. याची स्थापना कधी झाली याची नीटशी माहिती उपलब्ध नाही. मात्र ग्वालियरच्या सिंधिया राजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. हे मंदिर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते. मुख्य म्हणजे या मंदिराचे दरवाजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री बरोबर १२ वाजता उघडले जातात आणि लगेच लोकांना दर्शन घेता येते. (Marathi Trending Headline)

मान्यतेनुसार जेव्हा कार्तिकेय आणि गणेश यांच्यामध्ये पृथ्वी प्रदक्षिणेचा स्पर्धा झाली तेव्हा यात गणपती जिंकले. त्यांनी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारत पृथ्वी प्रदक्षणेचे पुण्य प्राप्त केले. ही बातमी जेव्हा कार्तिकेय यांना समजली तेव्हा ते क्रोधीत झाले आणि त्यांनी श्राप दिला की ज्या महिला कार्तिकेय यांचे दर्शन घेतील त्या विधवा होती तर जे पुरुष कार्तिकेय यांचे दर्शन घेतील ते सात जन्म नरकात जातील. याबाबत जेव्हा शंकर पार्वती यांना समजले तेव्हा त्यांनी कार्तिकेयला समजावले आणि त्यांचा राग शांत केला. तेव्हा कार्तिकेय यांनी जे लोकं कार्तिक पौर्णिमेला त्यांचे दर्शन घेतील ते पुण्यवान ठरतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे हे मंदिर वर्षभर बॅड बंद असते आणि कार्तिक पौर्णिमेलाच उघडते. (Top Marathi News)
कार्तिक स्वामी मंदिर, रुद्रप्रयाग, उत्तराखंड
उत्तराखंडमधील या कार्तिक स्वामी मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे मंदिर क्रौंच पर्वतावर तब्बल ३०५० मीटर उंचीवर डोंगराच्या टोकावर स्थित आहे. उत्तर भारतातील हे एकमेव कार्तिक स्वामींना समर्पित असलेले मंदिर आहे. धार्मिक कथेनुसार जेव्हा गणपती आणि कार्तिकेय यांच्यात झालेल्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेनंतर जेव्हा गणपतीने या स्पर्धेचे जेतेपद मिळ्वके तेव्हा कार्तिकेय यांनी याच ठिकाणी रागामध्ये आपल्या शरीरातील सर्व हाडांना अर्थात आपल्या अस्थींना आपल्या वडिलांना शंकरांना देऊन टाकले होते. या अस्थी आजही या मंदिरात आहेत. याची पूजा दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला केली जाते. या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला तीन किलोमीटरचा ट्रेक करावा लागेल. उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग येथून कनक चौरी गावापर्यंत पोहचायचे आणि तिथून तीन किलोमीटर वर चढाई केल्यावर कार्तिक स्वामी आपल्याला दर्शन देतात. (Latest Marathi Headline)

पलनी, डिंडीगुल, तमिलनाडु
दक्षिण भारतामध्ये कार्तिक स्वामींना खूपच मानले जाते. तिथे यांना मुरुगन या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे कार्तिकेय यांचे दक्षिण भारतात मंदिर नसेल तरच नवल. तामिळनाडू राज्यातील डिंडीगुल जिल्ह्यात पलनी गावात अरुल्मिगु दंडायुधपाणी मंदिर असून हे कार्तिक स्वामी अर्थात मुरुगन यांना समर्पित आहे. प्राप्त माहितीनुसार या मंदिरातील कार्तिक स्वामींची मूर्ती बोगार नावाच्या ऋषींनी बनवली असून, हे बोगार ऋषी आयुर्वेदामधील महान विद्वान होते. या ऋषींनी नऊ विषारी पदार्थाना एका विशिष्ट मापात घेऊन या मूर्तीला घडवले आहे. या मंदिराच्या परिसरातच बोगार ऋषींची समाधी देखील आहे. (Top Trending News)

=========
Tripurari Purnima : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘अशा’ पद्धतीने करा भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा
=========
हे मंदिर ५, ६ व्या शताब्दीमध्ये बनवले असल्याचे सांगितले जाते. चेर वंशातील राजा चेरामन पेरुमल यांनी हे मंदिर तयार केले. पुढे पांड्य वंशातील राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुरुगन यांचे दर्शन घेण्यस्तही तब्बल ६८९ पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र या मंदिरात गर्भगृहात जाण्याची कोणालाही परवानगी नाहीये. या मंदिरात मिळणार प्रसाद देखील खास असून यात तूप, वेलची, गूळ आणि मधाचा वापर केला जातो. या प्रसादाला GI टॅग देखील मिळाला आहे. पलनी स्टेशन कोयंबतूर रामेश्वरम मार्गावर आहे. तर या मंदिराजवळ कोयंबतूर विमानतळ जवळ आहे. यासोबतच तामिळनाडूमध्ये तिरुपरंकुंद्रम, स्वामीमलाई, तिरुथनी, पाझमुधिरचोलाई आणि तिरुचेंदूर ही देखील कार्तिक स्वामींची मंदिरं प्रसिद्ध आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
