चित्रपटांमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या जोड्या पडद्यावर बघत असतो. कधी कधी काही जोड्या एका पेक्षा अधिक वेळा पाहायला मिळतात आणि त्या जोड्या हळूहळू आपल्याला आवडायला लागतात. आजपर्यंत आपण चित्रपटांमध्ये अनेक अजरामर आणि तुफान हिट झालेल्या जोड्या पाहिल्या आहेत. काही जोड्यांनी तर त्यांचा असा काही चार्म निर्माण केला जो आजतागायतही प्रेक्षकांवर तसेच आहे. अशीच एक तुफान गाजणारी, प्रसिद्ध आणि लोकप्रिय असणारी जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल (shahrukh and kajol). शाहरुख खान आणि काजोल बॉलिवूडची सर्वात गाजलेली आणि तुफान लोकप्रिय जोडी. केवळ या जोडीचे नाव ऐकूनच सिनेमा हिट होणार असे समजले जायचे, आणि प्रत्यक्षात तसे व्हायचे देखील. शाहरुख खान आणि काजोल (shahrukh and kajol) यांच्या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. या दोघांना एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. बॉलिवूडमधील आयकॉनिक जोडी असलेल्या शाहरुख खान आणि काजोलला फक्त फॅन्सचं नव्हे तर इंडस्ट्रीमधील कलाकार देखील एकत्र काम करताना पाहू इच्छित आहे.(shahrukh and kajol)

सर्वांची ही इच्छा लवकरच पूर्णत्वास जाणार असून, बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक असलेला करण जोहर या दोघांना एकत्र आणणार आहे. सध्या करण जोहर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने करण बऱ्याच दिवसांनी दिग्दर्शक म्हणून सर्वांच्या समोर येणार आहे. करणच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

आता बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये होणाऱ्या चर्चांनुसार या सिनेमात करण जोहरने शाहरुख खान आणि काजोल यांना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी निवडले आहे. जर सर्व योग्य झाले तर शाहरुख आणि काजोल लवकरच या सिनेमाची शूटिंग करणार असून, ही शूटिंग मुंबईतच केली जाईल. जर ही बातमी खरी असली तर तब्ब्ल सात वर्षांनी शाहरुख आणि काजोल (shahrukh and kajol) यांना एका सिनेमात पाहण्याची संधी त्यांच्या फॅन्सला मिळणार आहे, यापूर्वी ते २०१५ साली आलेल्या रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ सिनेमात एकत्र दिसले होते. करण जोहरचा हा रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा त्याच्यासाठी खूपच खास असून एक दिग्दर्शक म्हणून तो या सिनेमातून पुनरागमन करत आहे. चित्रपटाची शूटिंग सुरु असून बरीच शूटिंग झाल्याचे देखील सांगितले जात आहे.
तत्पूर्वी शाहरुख आणि काजोल (shahrukh and kajol) यांनी एकत्र दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता हैं, बाजीगर, माय नेम इज खान , दिलवाले आदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सध्या शाहरुख त्याच्या आगामी ‘पठाण’ या सिनेमात व्यस्त असून, चित्रपटाचे शूटिंग चालू आहे.