धडधाकड असणाऱ्या व्यक्तीला दोन पाय, दोन डोळे, दोन कान, एक नाक आणि एक तोंड असते. तसेच तो आपल्या दोन्ही पायांचा वापर करुन चालू शकतो. मात्र विचार करा व्यक्ती जर एखाद्या जनावरासारखा चालू लागल्यास तर काय होईल? खरंतर ही बाब हैराण करणारीच आहे. अशातच आम्ही तुम्हाला अशा परिवाराबद्दल सांगणार आहोत जे खरंतर माकडांप्रमाणे किंवा जनावरांप्रमाणे चालतात. हे परिवार आपल्या हातापायचा वापर करुन चलतात. त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर वैज्ञानिक सुद्धा चक्रावले आहेत.(Family walk like animals)
खरंतर तुर्कीमधील एका लहान गावात राहाणारा हा परिवार आहे. या परिवाराबद्दल ऐकल्यानंतर लोक हैराण झाली आहेत. परिवारातील मंडळी ही आपल्या दोन पायांचा नव्हेच तर हातांचा सुद्धा चालण्यासाठी वापर करतात. त्यांचे चालणे थोडे विचित्र सुद्धा आहे. त्यांना पाहून असे वाटते की, आपले पूर्वजच आहेत आणि त्यांच्यावर विकासाचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. सुरुवातीला तुर्की मधील वैज्ञानिकांनी त्यांना ‘बॅकवर्ड इवोल्यूशन’ असे नाव दिले होते. परंतु आता वैज्ञानिकांना सुद्धा त्यांच्याबद्दल कळले आहे.
रेसिट आणि हॅटिस उलास यांच्या घरातील मंडळी जगापासून फारच विलप्त आणि वेगळी राहिली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणालाच कळले नाही. परंतु जेव्हा २००५ मध्ये ब्रिटिश वैज्ञानिकांनी एका तुर्की मधील प्राध्यापकांचा अप्रकाशित पेपर पाहिला तेव्हा तो पाहून त्यांना धक्काच बसला. या पेपरमध्ये वैज्ञानिकांनी उलास यांच्या परिवाराबद्दल सांगितले होते. जो हात-पायांचा चालण्यासाठी वापर करतात. याचा अर्थ असा होतो की, चार पायांवर जशी जनावर चालतात तशी ही मंडळी चालतात. तेव्हा त्यांनी दावा केला की, या परिवारातील मंडळींना युनर टॅन सिंड्रोम आहे. त्यामुळे लोक पायांसह आपल्या हातांचा वापर करुन चालतात.(Family walk like animals)
हे देखील वाचा- एरिया 51 काय आहे? ज्याबद्दल ऐकले पण खरंच ते एलियने बेस कॅम्प आहे?
बॅकवर्ड इवोल्यूशन पासून सुरु झालेली ही थेरी जेव्हा येथवर येऊन पोहचली तेव्हा वैज्ञानिकांना त्यांच्या परिवाराबद्दल अधिक जाणून घेण्याची आवड निर्माण झाली. तेव्हा कळले की, हात-पायाचा वापर करुन चालण्याची सवय ही त्यांना त्यांच्या जनेटिक समस्येमुळे निर्माण झाली आहे. भाऊ-बहिणींना कोजेनेटिल ब्रेन इमपेयरमेंट आणि सेरिबेलर एन्टाक्सिया ही मेंदूशी संबंधित समस्या आहे. ज्यामध्ये दोन पायांवर संतुलन ठेवणे मुश्किल होते. त्यामुळेच ती लोक हातांचा सुद्धा चालण्यासाठी वापर करतात.
तर रेसिट आणि हॅटिस उलास यांची १९ मुलांपैकी ५ मुलांना हा आजार आहे. जी दोन पायांऐवजी चार हात आणि पायाचा वापर करुन चालतात.आता वयाच्या २०-२० वर्षानंतर या भाऊ-बहिणींसंदर्भातील गोष्ट जगासमोर आली आहे. ते लोक अशाच पद्धतीने काही किलोमीटर सुद्धा चालत जातात. मात्र समस्या अशी की, लोक त्यांना टोमणे मारतातच पण त्यांच्याकडे विचित्र पद्धतीने सुद्धा पाहतात.