जेव्हा तुम्ही अंत्यसंस्कार हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणते दृष्य उभे राहते? तुम्ही म्हणाल रडणारी लोक, सर्वत्र शांती आणि प्रत्येकाच्या मनात मृत व्यक्तीबद्दलच्या भावना आणि त्यासंबंधित चर्चा. मात्र तुम्ही कधी अंतिम संस्कारावेळी एखाद्याला हसताना पाहिलेय का? हे शक्यच नाही. पण केरळातील एका परिवाराचा सध्या एक फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी फोटो काढण्यात आला आणि त्यामध्ये घरातील मंडळी हसताना दिसून येत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक आपली मतं व्यक्त करु लागली आहेत.(Family smiling in funeral)
द टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार, पथानाथीट्टा जिल्ह्यातील मलापली गावात पनावेलिल परिवार राहते. या परिवाराचा सोशल मीडियात फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका ही केली गेली. त्याचे कारण हेच की, ते अंत्यसंस्कारावेळी हसतायत. तुम्ही विचार करा की, या फोटोमध्ये काय चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही फोटो नीट पहाल तेव्हा त्यात तुम्हाला मृत महिलेला ठेवलेली एक ट्रांन्सपरंट पेटी दिसते. त्या महिलेचे नाव मरियम्मा असे असून त्यांचे निधन १७ ऑगस्टला झाले होते.
९५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंतिम संस्कारावेळी हसताना दिसून आला परिवार
मरियम्मा ९५ वर्षांच्या होत्या आणि त्यांचा मृत्यू हा वय झाल्याने आणि काही आजारांमुळे झाले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, त्यांची ९ मुल आणि १९ नातवंड आहेत. जी जगातील विविध ठिकाणी राहतात. मात्र त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याजवळ परिवारातील काहीजण त्यांच्याजवळ होते. त्यांच्या परिवारातील एका सदस्याने सांगितले की, त्यांचा उद्देश हा व्हायरल होण्याचा नव्हता. तर वृद्ध महिलेसोबत घालवलेल्या क्षणांना आठवून आनंद होण्याचा होता. त्यांचे असे मानणे होते की, आजीच्या चांगल्या काळाला आठवल्यास तिच्या आत्माला शांती मिळेल.(Family smiling in funeral)
हे देखील वाचा- कोण आहे बिलकिस बानो? का सरकारने सामूहिक बलात्काप्रकरणातील ११ आरोपींना दिला जामीन
केरळातील शिक्षण मंत्र्यांनी दिली साथ
मात्रभुमी वेबासाइट सोबत बातचीत करताना परिवारातील एका सदस्याने म्हटले की, हा फोटो पाहून लोक जे टीका करतायत त्यांना सहन होत नाहीयं की एखाद्याला आनंदाने निरोप दिला जातोय. केरळच्या शिक्षण मंत्री वी सिवानकुड्डी यांनी परिवाराची साथ दिली आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटले की. त्यांचा मृत्यू अत्यंत दु:खद असेल पण त्यांना आनंदाने निरोप देणे चांगले आहे. त्यामुळे त्या आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपले जीवन आनंदात घालवतील.