Home » उंचावरुन खाली पडत असल्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ काय होतो?

उंचावरुन खाली पडत असल्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ काय होतो?

by Team Gajawaja
0 comment
Fall from height dream
Share

बहुतांश लोकांना असे स्वप्न पडतात आणि ही एक सर्वसामान्य बाब आहे. परंतु काही स्वप्न ही अत्यंक धक्कादायक असतात. त्यामध्ये काही लोकांना असे ही स्वप्न पडते की, ते एका उंचीवरुन खाली पडत आहेत आणि त्या भीतीने ते उठतात. तर स्वप्न पडण्यामागे ही काही कारण आहेतच. परंतु उंचावरुन खाली पडण्याचे स्वप्न वारंवार पडत असेल तर त्याचा काहीतरी अर्थ आहे. (Fall from height dream)

झोपेत खाली पडण्याची भावना निर्माण होण्याला हिप्निक जर्क असे म्हटले जाते. हा असा झटका असतो यावेळी तुमच्या डोळ्यावरची झोप उडते आणि तुम्हाला काय झाले आहे हेच कळत नाही.

आपला मेंदू शरिरावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. त्याला माहिती असते की, आपले श्वास किंवा शरिराचे दुसरे अवयव हे कशा पद्धतीने काम करतात. मेंदू हे नियंत्रमात ठेवतो की, आपण एका मिनिटांमध्ये किती वेळा श्वास घेतला आहे. कधी झोपतो, उठतो. या सर्वांचा रेकॉर्ड मेंदूकडे असतो. काही वेळा मेंदूला कळत नाही की, आपण सुस्त झोपलो आहोत तरी आपल्या हृदयाचे ठोके वाढले गेलेत त्यामुळे तो गोंधळला जातो. तो घाबरतो. त्याला व्यक्ती मृत होत होणार का अशी भीती वाटे. आपला श्वास मंदावल्याने त्याला काहीच कळत नाही.

खरंच मेंदू अशी स्थिती निर्माण करतो
जेव्हा आपल्या स्वप्नात आपण उंची पायऱ्या किंवा उंच ठिकाणावरुन खाली पडत असल्याचे पाहतो तेव्हा तुमच्या पायाला काहीतरी झाल्यासारखे वाटते. एकतर आपले डोळे बंद असल्याने आपल्यासमोर तेच दृश्य दिसत असते. अशातच आपल्याला कळत नाही नक्की काय होतेय आणि भीतीने आपण जागे होते. तेव्हा मेंदूला कळते की आपण जीवित आहोत.

कोणत्या गोष्टीमुळे होतो फायदा
कधी-कधी झोपेत झटके येणे सर्वसामान्य आहे. हे सर्वांसोबत होतो. परंतु दररोज असे होत असेल तर डॉक्टरांना भेटा. असे असू शकते की, तुमच्या शरिरात कॅल्शियम अथवा मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाली असेल. कॅल्शिम आपल्याला दूध, दही आणि केळ्यातून मिळते. तर मॅग्नेशियम आपल्याला मोड आलेली धान्य आणि भाज्यांमधून मिळते.(Fall from height dream)

झोपण्यापूर्वी तणावाच्या स्थिती बद्दल विचार करु नका
जर झोपण्यापूर्वी तुम्हाला व्यायाम करण्याची सवय असेल तर त्याची वेळ बदला. कारण झोपताना नोकरी अथवा कोणत्याही तणावाबद्दल विचार करायचा नाही. प्रयत्न करावा की, झोपण्यापूर्वी आपण दीर्घ श्वास घ्यावा. जेणेकरुन तुमचा मानसिक आणि शरिरीक थकवा कमी होईल.

हे देखील वाचा- खुप वेळ हेडफोन्स वापरत असाल तर आधी हे वाचा

मनोविज्ञान काय सांगते?
मनोविज्ञान असे सांगते की, जेव्हा तुम्ही असहाय्य स्थितीत असता तेव्हा तुम्हाला असे वाटत राहते की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवरील नियंत्रण गमावत आहेत. अशा स्थितीत आपण काय केले पाहिजे हे कळत नाही. आपण योग्य दिशेच्या शोधात राहतो.

म्हणजेच आपण असा विचार करु लागतो की, आयुष्यात आपल्या हातातून काही गोष्टी निसटत आहेत. परंतु असे झाले नाही पाहिजे. जेव्हा सातत्याने असे वाटत असेल तर तुम्ही तणावाखाली जाऊ शकता. नेहमीच तुम्हाला असुरक्षित वाटू शकते. खरंतर असे स्वप्न पडल्याने तुमचा तणाव आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.