ऑनलाईन शॉपिंग, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्यासंदर्भातील सर्विस संबंधित एखाद्या प्रोडक्टबद्दल फेक रिव्हू लिहिणे किंवा लिहून घेणे आता कंपन्यांना भारी पडणार आहे. कारण सरकारने बनावट आणि पेज रिव्हूवर लगाम लावण्यासाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. बनावट रिव्हू रोखण्यासाठी नवे नियम २५ नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत. जर कंपन्यांकडून या नियमांचे पालन केले नाही तर सरकार त्याला नंतर अनिवार्य करु शकते. एखादी कंपनी नियमांचे पालन करत नसेल तर त्यांना अनफेयर ट्रेड प्रॅक्टिस मानले जाईल (Fake Reviews).
भारतीय मानक ब्युरोने एखादे सामान किंव सर्विसच्या रिव्हूसाठी नियम ठरवले आहेत. केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार यांनी हे नियम जाहीर करत असे म्हटले की, सुरुवातील हे नियम स्वैच्छिक असतील. त्यांनी पुढे असे म्हटले की, भारत पहिला देश आहे ज्याने सामान किंवा सेवेसाठी रिव्हू लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत.

फेक रिव्हूवर लागणार लगाम
हे नियम लागू झाल्यानंतर ई-कॉमर्स कंपन्या आता फेक आणि पेड रिव्हू करु शकत नाहीत. रोहित कुमार यांनी असे म्हटले की, रिव्हूसाठी बनवण्यात आलेल्या सर्व निमयांचे पालन केल्यानंतर बीआयएस वेरिफिकेशनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर बीआयएस एक सर्टिफिकेट देईल. त्यानंतरच कंपनी आपल्या वेबसाइटवर त्याचा उल्लेख करु शकते. ज्या कंपन्या या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई होणार
रोहित कुमार यांनी असे म्हटले की, कंपनीला आता हे सांगावे लागणार आहे की रिव्हूच्या आधारावर एखादे प्रोड्कटला दिलेली स्टार रेटिंग कशी आहे. त्यांनी असे म्हटले की, ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्यामुळेच सरकारने रिव्हूसाठी नियम तयार केले आहेत. हे नियम अशा सर्व वेबसाइट्ससाठी लागू होणार आहेत ज्या रिव्हू पब्लिश करतात. सरकार पैसे देऊन पॉझिटिव्ह आणि फाइव्ह स्टार रेटिंगच्या विरोधात दंडात्मक कारवाई करणार आहे. दुसऱ्या कंपन्यांसाठी निगेटिव्ह रिव्हू केल्यास तरीही कारवाई होणार आहे. (Fake Reviews)
हे देखील वाचा- डिजिटल ट्रांजेक्शन करणाऱ्यांसाठी अलर्ट! अशा प्रकारच्या UPI पेमेंटवर मर्यादा घातली जाऊ शकते
ग्राहकांना होणार फायदा
ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना ग्राहक प्रथम प्रोडक्टचे रिव्हू पाहतात. ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांना प्रोडक्ट हातात घेऊन पाहता येत नाही, त्यामुळेच ते प्रथम रिव्हू वाचतात आणि नंतर ते खरेदी करण्याचा विचार करतात. याच कारणास्तव काही कंपन्या आपल्या प्रोडक्टबद्दल बनावट रिव्हू करतात जेणेकरुन त्याचा खप अधिक वाढला जाईल.