Home » Fake Instagram अकाउंटमुळे त्रस्त असाल तर असे करा रिपोर्ट

Fake Instagram अकाउंटमुळे त्रस्त असाल तर असे करा रिपोर्ट

जर तुम्ही सोशल मीडियाचा अधिक वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजकाल फेक इंस्टाग्राम अकाउंट एखाद्यासाठी धोक्याच्या घंटीसारखे असू शकते.

by Team Gajawaja
0 comment
Instagram Tips & Tricks
Share

जर तुम्ही सोशल मीडियाचा अधिक वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजकाल फेक इंस्टाग्राम अकाउंट एखाद्यासाठी धोक्याच्या घंटीसारखे असू शकते. इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यानंतर तुमच्या नावाने दुसऱ्या युजर्ससोबत फसवणूक होण्याचा धोका वाढला जातो. (Fake Instagram Account)

खरंतर हे अकाउंट मूळ अकाउंटसारखेच दिसते. त्याचसोबत फेक अकाउंट तयार करणारा व्यक्ती मूळ अकाउंटचे फॉलोअर्स देखील फॉलो करतात. त्यानंतर त्यांना एक मेसेज करत पैशांची फार गरज आहे असे त्यात लिहितात. लोक आपला मित्र-नातेवाईक समजून त्यांना पैशांची मदत करतात. नंतर त्यांना कळले मेसेज फेक अकाउंटवरून करण्यात आला होता. जेव्हा तुमचे फेक अकाउंट इंस्टाग्रामवर सुरू असल्याचे कळेल तेव्हा नक्की काय करावे आणि रिपोर्ट कसा करावा याच बद्दल जाणून घेऊयात.

फेक अकाउंटबद्दल असे करा रिपोर्ट
इंस्टाग्रामवर सुरक्षिततेसंबंधित काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुमचे फेक अकाउंट तयार करण्यात आलेले असल्यास तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन रिपोर्ट करू शकता. तुमच्याकडे इंस्टाग्राम अकाउंट असल्यास तुम्ही त्याबद्दल अॅपच्या माध्यमातून रिपोर्ट करू शकता. आपल्या डेस्कटॉप अथवा मोबाईल ब्राउजरवर जाऊन अकाउंट सुरक्षित करू शकता.

Gurugram man arrested for creating fake Instagram profile of woman - India Today

अॅन्ड्रॉइड आणि आयओएसवरून असा करा रिपोर्ट
-सर्वात प्रथम त्या खात्यावर जा ज्याचे तुम्हाला रिपोर्ट करायचे आहे
-स्क्रिनवर डाव्या बाजूला तीन बिंदूवर क्लिक करा
-अकाउंट रिपोर्टचा ऑप्शन निवडा
-तेथे तुम्हाला कारण सांगावे लागेल
-जर तुमच्याकडे वेगळी कोणती माहिती असल्यास ती देखील शेअर करू शकता
-अकाउंट रिपोर्टवर टॅप करा

डेस्कटॉपवरून असे करा रिपोर्ट
-त्या खात्यावर जावे ज्याचे तुम्हाला रिपोर्ट करायचे आहे
-अकाउंटच्या डाव्या बाजूा More ऑप्शनवर क्लिक करा
-अकाउंट रिपोर्ट निवडा
-तेथे कारण सांगावे लागेल, ज्या अकाउंटचा रिपोर्ट करायचा आहे
-तुमच्याकडे एखादी वेगळी माहिती असेल तर ती देखील देऊ शकता
-अकाउंट रिपोर्ट वर आता क्लिक करा (Fake Instagram Account)

फेक इंस्टाग्रामवर अकाउंटवर रिपोर्ट करताना
-अकाउंटचे नाव आणि युजरचे नाव
-अकाउंटचे फोटो-व्हिडिओ
-अकाउंटवरून करण्यात आलेले मेसेज
-वेगळी माहिती असेल ती देखील देऊ शकता.

जर तुम्ही फेक इंस्टाग्राम अकाउंटचे रिपोर्ट केल्यास तर इंस्टाग्रामची इंटरनल टीम ते ब्लॉक करते. त्यामुळे वरील काही टिप्स वापरून तुम्ही फेक अकाउंटसाठी रिपोर्ट करू शकता.


हेही वाचा- OTP शेअर न करताही बॅंक खाते होईल रिकामे, असे रहा दूर


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.