Home » या कारणांमुळे अमिताभ बच्चन झाले कर्जबाजारी – ‘एबीसीएल’ कंपनीच्या अपयशाची कहाणी 

या कारणांमुळे अमिताभ बच्चन झाले कर्जबाजारी – ‘एबीसीएल’ कंपनीच्या अपयशाची कहाणी 

by Team Gajawaja
0 comment
Amitabh Bachchan Corporation Ltd
Share

एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची यशोगाथा आपण नेहमीच वाचत असतो. पण आज आपण पाहणार आहोत एका कंपनीच्या अपयशाची कथा. ती कंपनी म्हणजे अमिताभ बच्चन यांची  एबीसीएल (Amitabh Bachchan Corporation Ltd). 

एखाद्या क्षेत्रात नाव कमावले की, आपण परत नवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहायला लागतो. पण प्रत्येक क्षेत्रात आपला जम बसेलच असं नाही. असेच काहीसे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत घडले. बच्चन यांची एबीसीएल कंपनी डुबल्याचे आपण ऐकले असेलच. तर त्यांनी अशा कोणत्या चुका केल्या होत्या की ज्यामुळे एबीसीएल कंपनी बुडाली?

तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आघाडीचे अभिनेता होते. चित्रपटसृष्टीत यशस्वी झाल्यानंतर त्यांनी १९९५ ला व्यवसाय सुरु करायचे ठरवले आणि एबीसीएल (Amitabh Bachchan Corporation Ltd) कंपनीची स्थापना केली. एबीसीएल कंपनीमार्फत चित्रपटाची निर्मिती, गाण्यांचे रेकॉर्डिंग इ. व्यवसाय केले जात. 

जेव्हा एबीसीएल कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा सुरुवातीला या कंपनीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. या कंपनीच्या मार्फत १९९५ साली बॉंबे (हिंदी) चित्रपट वितरित करण्यात आला आणि तो सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. 

जस जसा चित्रपटात निर्मिती आणि वितरणामध्ये जम बसायला लागला तस तसे कंपनीने गाण्यांची पण कामे घ्यायला सुरुवात केली. दिलजले, रक्षक या चित्रपटांमधील गाण्यांचे संपूर्ण काम एबीसीएल कंपनीमार्फत करण्यात आले होते. त्यानंतर काही काळाने एबीसीएल कंपनीला मिळालेल्या एका कामामुळे कंपनीचे ग्रह फिरले. 

दरवर्षी जगभरात मानाने आयोजित केल्या जाणाऱ्या मिस वर्ल्ड कंपनीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट एबीसीएलला देण्यात आले. भारतातील बंगलोर शहरात चार महिन्यांमध्ये या स्पर्ध्येचे आयोजन करून तो यशस्वी करण्याचे आव्हान एबीसीएल कंपनीने स्वीकारले. 

१९९६ साली होणाऱ्या या स्पर्ध्येचा खर्च आयोजकांनी २ मिलियन डॉलर्स पर्यंत गृहीत धरला होता. पण तो खर्च तब्ब्ल ५ मिलियन डॉलर्सपर्यंत एबीसीएल कंपनीकडून दाखवण्यात आला. त्यावेळी भारतात अशा स्पर्धाना खास असा प्रेक्षकवर्ग नव्हता, बच्चन यांनी घाईघाईतच स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी कंपनीच्या डोक्यावर घेतली होती. त्यावेळी या कार्यक्रमाची तिकीट विक्री करण्यात कंपनी अयशस्वी ठरली. त्यामुळे एबीसीएल कंपनीला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले. 

१९९६ साली वर्षभरात एबीसीएल कंपनीने ६५ कोटींचा टर्नओव्हर केला. त्यातला त्यांना जवळपास १५ कोटी रुपयांचा फायदा झाला. पण मिस वर्ल्ड या कार्यक्रमातून कंपनीला जवळपास ४ कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले. त्यानंतरही एबीसीएलने उत्तर अमेरिकेत एक कार्यक्रम केला, ज्यात स्वतः अमिताभ बच्चन यांनी स्टेजवर डान्स केला होता. पण तो कार्यक्रम सुद्धा अयशस्वी ठरला. 

जेव्हा एका मागून एक कार्यक्रम अयशस्वी व्हायला लागले तेव्हा मात्र अमिताभ बच्चन यांना काय करावे ते समजतच नव्हते. त्यांचे आणि कार्यक्रम व्यवस्थापकाचे वाजल्यामुळे त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले. 

====

हे देखील वाचा: कोण होणार करोडपती कार्यक्रमाच्या नवीन पर्वात झाले आहेत ‘हे’ बदल, आता तुम्हीही होऊ शकता करोडपती! 

====

त्याच वर्षी म्हणजे १९९६ साली नवीन आलेल्या व्यवस्थापकासोबत त्यांनी ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची निर्मिती केली हा चित्रपट तिकीटबारीवर ठीकठाक चालला. परंतु, त्यानंतर कंपनीची निर्मिती असलेल्या सर्व चित्रपटांनी मात्र घोर निराशा केली. त्यानंतरच्या मृत्यूदाता या चित्रपटाने मात्र घोर निराशा केली. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सपशेल आपटला. 

एबीसीएल कंपनी १९९९ सालीच  डबघाईला आली होती आणि त्यामुळे अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले होते. पण अमिताभ बच्चन यांनी हार मानली नाही. कोणताही कमीपणा वाटून न घेता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी छोट्या पडद्यावर काम करायचे ठरवले. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर त्यांची दिमाखात एंट्री झाली आणि अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. निर्माते यश चोप्रा यांनी अमिताभ यांना ऑर केलेल्या मोहब्बते चित्रपटाने तर त्यांचे दिवसच पालटून गेले. या चित्रपटाच्या यशाने, “बच्चन अभि जिंदा हैं” हा संदेश चित्रपटसृष्टीला मिळाला. 

====

हे देखील वाचा: भेदक शब्दांतून प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करणारा ‘त्रिशूल’ चा नायक..

====

एबीसीएल निर्मित सात रंग के सपने, अक्स, असा एकामागून एक फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला चालूच होता. नाही म्हणायला मेजरसाहब, विरुद्ध – फॅमिली कम्स फर्स्ट, पा, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई केली, पण कुठलाही चित्रपट ‘सुपरहिट’ होऊ शकला नाही. तरीही कौन बनेगा करोडपतीच्या यशाने अमिताभ बच्चन मात्र आर्थिक संकटामधून सुखरूप बाहेर पडले.  

अमिताभ बच्चन यांनी एबीसीएल कंपनीची सर्व कर्जे फेडून टाकली आणि गमावलेला विश्वास आणि स्टेटस दोन्हीही परत मिळवले. अभिनय क्षेत्रात खूप मोठं नाव आणि प्रचंड यश मिळवलेल्या अमिताभ बच्चन यांना व्यवसायात मात्र अपयशच आले. परंतु, या अपयशावरही त्यांनी मात केली. विजेते असेच असतात!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.