Home » फेसबुकवर फ्रेंन्ड नसला तरीही लोक पाहू शकतात तुमचे प्रोफाइल, आजच करा ‘हे’ काम

फेसबुकवर फ्रेंन्ड नसला तरीही लोक पाहू शकतात तुमचे प्रोफाइल, आजच करा ‘हे’ काम

by Team Gajawaja
0 comment
Facebook Profile Locked
Share

फेसबुकचा वापर जवळजवळ सर्व लोक करतात. परंतु योग्य सेटिंग सेट केली नसेल तर तुमच्या प्रायव्हेसीला धोका उद्भवू शकतो. फेसबुकवर जी लोक तुमच्या फ्रेंन्ड लिस्टमध्ये असतात ते तुमच्या पोस्ट, फोटो, प्रोफाईल पाहू शकतात. असे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही प्रोफाइल फोटोसाठी Everyone निवडले असेल. अशातच तुमच्या प्रायव्हेसीला धोका उद्भवू नये म्हणून प्रोफाइलला लॉक लावा. ज्यामुळे अशी लोक तुमचे फोटो पाहू शकत नाहीत जे तुमच्या फ्रेंन्ड लिस्टमध्ये नाहीत.(Facebook Profile Locked)

फेसबुक प्रोफाइल लॉक प्रत्येक युजरसाठी फार महत्वाचे फिचर आहे. जे तुम्हाला कंट्रोल करण्यास मदत करतो की, तुमचा प्रोफाइल डेटा कोण पाहू शकतो किंवा कोणासाठी रिस्ट्रिक्टेड केले आहे. आपल्या प्रोफाइलसाठी असा ऑप्शन निवडा जो अज्ञात लोकांना तुमची प्रोफाइल पाहण्यापासून दूर ठेवू शकतो. फेसबुक प्रोफाइलवर लॉक फिचर युजर्स आपल्या प्रोफाइल फोटो किंवा पोस्टसाठी वापरु शकता. त्याचसोबत हे थर्ड पार्टीला सुद्धा तुमची टाइमलाइन पोस्ट पाहण्यापासून ही दूर ठेवते.

प्रोफाइल लॉक लावल्याने काय बदल होतात?
-तुमचे प्रोफाइल फोटो एखादा अज्ञात व्यक्ती पाहिला किंवा डाउनलोड केला जाऊ शकत नाही.
-कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटो पर्यंत पोहचू शकत नाही.
-याचा अर्थ असा की, तुमची टाइमलाइनवर सर्वाधिक लेटेस्ट किंवा जुने अपडेट पाहू शकत नाही.
-ते तुमचे कोणतेही प्रोफाइल फोटो किंवा अल्बम पाहू शकत नाहीत.

प्रोफाइलवर लॉक लावणे का गरजेचे आहे?
फेसबुकच्या मते, डिसेंबर २०२० मध्ये बांग्लादेश आणि विएतनाम मधील हॅकर्सने फेसबुकची पूर्ण प्रायव्हेसी सिस्टिम हॅक केली होती. त्याचसोबत त्यांनी फेसबुक युजर्सचा डेटा ही चोरला. फेसबुक लॉक प्रोफाइल फिचरमुळे या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर करण्यावर बंदी घालण्यास मदत करते. (Facebook Profile Locked)

Android युजर्स कसे लावाल लॉक?
-सर्वात प्रथम आपल्या अॅन्ड्रॉइड डिवाइसवर फेसबुक अॅप सुरु करा
-होम पेजवर आपला प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा
-तीन डॉटवरील मेन्यूवर टॅप करा
-पेजवर ऑप्शनमधील लॉक प्रोफाइल ऑप्शन निवडा
-लॉक प्रोफाइल पेजवर अखेर Lock your profile ऑप्शन निवडा
-असे केल्यानंतर, स्क्रिनवर एक पॉप मेसेज आल्यानंतर कळेल की, तुमचा प्रोफाइल लॉक केले आहे
-प्रोसेस पूर्ण होण्यासाठी OK वर टॅप करा

हे देखील वाचा- १ मार्च पासून सोशल मीडियात नवे नियम, ऑनलाईन तक्रार करता येणार

iPhone साठी वेगळी आहे प्रोसेस
-फेसबुकवर जा आणि नंतर डाव्या बाजूला तीन लाइन मेन्यूवर आपल्या नावावर टॅप करा
-तीन बोटांनी आपले नाव डॉट करा
-आपला प्रोफाइल लॉक करण्यासाठी, लॉक प्रोफाइल बटनाचा वापर करा
-सुनिश्चित करण्यासाठी Lock your profile वर पुन्हा टॅप करा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.