Face Deep Cleaning Tips : दिवसभर चेहऱ्यावर मेकअप राहिल्यानंतर रात्रीच्या वेळेस व्यवस्थितीत न पुसल्यास त्वचेसंबधित समस्या होऊ शकतात. ब्युटी प्रोडक्ट्समध्ये असणाऱ्या केमिकल्सच्या कारणास्तव अँटीएजिंगची समस्या निर्माण होते. यामुळे मेकअप व्यवस्थितीत रिमूव्ह केल्यानंतर झोपावे. याशिवाय त्वचा डीप क्लिन करणेही महत्वाचे आहे. मार्केटमध्ये मेकअप रिमूव्हर आणि मेकअप रिमूविंग वाइप्स येतात. पण घरच्याघरी वापर केल्या जाणाऱ्या वस्तूंपासून मेकअप काढण्यासाठी मदत घेऊ शकता.
त्वचा डीप क्लिनिंग केवळ मेकअप रिमूव्ह करण्यासाठी गरजेचे नव्हे तर पोर्समध्ये जमा झालेली घाण देखील स्वच्छ करणे महत्वाचे असते. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या कमी होते. अशातच त्वचा फ्रेश दिसते. नॅच्युरल गोष्टींनी त्वचा डीप क्लिनिंग केल्यास स्किनमध्ये ब्लड फ्लो सुधारला जातो. जाणून घेऊया डीप क्लिजिंगसाठी कोणत्या वस्तूंचा वापर करू शकता याबद्दल सविस्तर….
कच्चे दूध
मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कच्च्या दूधाचा वापर करू शकता. यासाठी कॉटन बॉल दूधात बुडवून चेहरा स्वच्छ करा. दूधामुळे त्वचा स्वच्छ होण्यासह हाइड्रेटही राहते. याशिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या स्किन इरिटेशनच्या समस्येपासूनही दूर राहता.
काकडीचा ज्यूस
उन्हाळ्यात त्वचा फ्रेश राहण्यासाठी आणि त्वचेमधील तेल बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी काकडीच्या ज्यूसचा वापर करू शकता. फेस पॅकमध्ये काकडी मिक्स करुन त्वचेला लावू शकता. याशिवाय काकडीचा ज्यूस मेकअप रिमूव्हरप्रमाणे वापर करू शकता.
=================================================================================================
हेही वाचा :
High Heels : हाय हिल्स वापरणे म्हणजे ‘या’ आजारांना आमंत्रण देणे
पुरुष मंडळींनी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय
==================================================================================================
नारळाचे तेल
त्वचेसाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते. या तेलाने त्वचेला मसाज केल्याने त्वचा कोमल आणि मऊसर होते. याशिवाय त्वचा डीप क्लिजिंगर प्रमाणे काम करते. नारळाच्या तेलाने कोरड्या त्वचेची समस्याही कमी होते.(Face Deep Cleaning Tips)
दह्याचा वापर
त्वचा डीप क्लिन करण्यासाठी दही एक उत्तम नॅच्युरल प्रोडक्ट आहे. मेकअप क्लिन करण्यासाठी दही वापरू शकता. हातावर थोडेसे दही घेऊन चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचा कोमल आणि ग्लोइंग होण्यास मदत होईल.