Home » U.S. F-1 Visa update : F-1 व्हिसा धारकांची अमेरिकेत कसून तपासणी

U.S. F-1 Visa update : F-1 व्हिसा धारकांची अमेरिकेत कसून तपासणी

by Team Gajawaja
0 comment
U.S. F-1 Visa update
Share

अमेरिकेच्या राष्ट्राध्य़क्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यावर अमेरिकेमध्ये शिक्षण किंवा नोकरीसाठी अन्य देशातून गेलेल्या नागरिकांवर कडक नियम लागू कऱण्यात आले आहेत. त्यातील मुख्य नियम म्हणजे, अमेरिकेत तुम्ही फक्त शिक्षण किंवा नोकरीसाठी आला आहात, हे लक्षात ठेवा, कुठल्याही अतिरेकी कारवाया किंवा त्यांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात सहभागी झाला असाल तरी, अमेरिकेतून बाहेर काढण्यात येणार आहे. यात या सर्वांच्या सोशल मिडियामधील डेटाचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. या सर्वांचाच फटका आता अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. (U.S. F-1 Visa update)

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे F-1 व्हिसा रद्द केले आहेत. कॅम्पस अ‍ॅक्टिव्हिटी आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे ही कारवाई विद्यार्थ्यांवर करण्यात आली आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी फक्त सोशल मिडियावर आलेल्या पोस्टना लाईक केले आहे. मात्र परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो या सर्वांबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत, या सर्व पोस्ट देशविरोधक असल्याचे सांगितले आहे. त्यांना पाठिंबा देणारे विद्यार्थीही देशविरोधक ठरवत त्यांचे व्हिसा रद्द कऱण्यात आल्यानं अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एका अहवालानुसार अमेरिकेत 11 लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी 3 लाख भारतीय विद्यार्थी असून यापैकी अनेकांचे अमेरिकेतील शिक्षण धोक्यात आले आहे.

अमेरिकेत सध्या ट्रम्प शासनाचा चाबूक जोरात चालू आहे. अमेरिका विरोधी भूमिका घेणा-यांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांना थेट देश सोडण्याचे आदेश देण्यात येत आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. दिवसाला असे 300 हून अधिक व्हिसा आम्ही रद्द करत आहोत, देशविरोधी माणसं अमेरिकेत नको, अशी रोखठोक भूमिका त्यांना जाहीर केली आहे. देशात, कोण पाहुणे म्हणून येतील आणि कोण येणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे, तसाच अमेरिकेलाही आहे. त्यामुळे इथे येणा-या विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षण घेण्यासाठीच यावे, जर त्यांचा सहभाग देशविघातक कारवाईमध्ये आढळला तर त्यांना लगेच त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, अशी तंबीच रुबियो यांनी दिली आहे. (U.S. F-1 Visa update)

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या या भूमिकेमुळे तिथे मोठ्या संख्येनं असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून आता ईमेल यायला सुरुवात झाली आहे. त्यात या विद्यार्थ्यांचा F-1 व्हिसा म्हणजेच विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय तुम्ही स्वतःहून हा देश सोडावा, कॅम्पस अ‍ॅक्टिव्हिटी आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीमुळे ही कारवाई झाल्याचे त्यात सांगण्यात आले आहेत. देशविरोधी पोस्ट लाईक किंवा शेअर करणाऱ्या विद्यार्थ्यंचा यात समावेश आहे. याबाबत ट्रम्प सरकारनं 10 मार्च रोजी CBP होम अॅप लॉंच केले आहे. त्यातून हे ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहेत. (International News)

===============

हे देखील वाचा : Blue City : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील कोणत्या शहराला ”ब्लू सिटी” म्हटले जाते?

===============

आता व्हिसाच रद्द झाल्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर अमेरिका सोडण्यावाचून दुसरा उपाय नाही. कारण व्हिसाशिवाय अमेरिकेत राहिल्यास दंड, अटक किंवा हद्दपारी होऊ शकते. हद्दपारी करण्याची पद्धतही क्रूर अशीच आहे. कारण असे करतांना, त्या विद्यार्थ्यांचा ताबा अमेरिकन पोलीस घेतात, आणि त्याला त्याचे सामान किंवा आवश्यक अशा वस्तू घेण्यासाठीही वेळ देण्यात येत नाही. यामुळेच अमेरिकेत रहाणारे विद्यार्थी हादरले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थी हे अमेरिकेतील विद्यार्थी चऴवळीमध्ये सक्रीय आहेत. तसेच अमेरिका आणि जागतिक राजकारण यासंदर्भात भूमिका व्यक्त करणारे आहेत. प्रसंगी या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या चुकांवरही बोट ठेवले आहे. (U.S. F-1 Visa update)

आता या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत जावे लागेल, अशी भीती वाटत आहे. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी लाखो-करोडो रुपयांचे कर्ज घेतलेले असते. अशा प्रसंगी शिक्षण अर्धवट राहिले, आणि अपेक्षीत नोकरी मिळाली नाही, तर हा कर्जाचा बोजा कसा कमी होणार, याची चिंता यापैकी अनेकांना आहे. सध्या अमेरिकन सरकारनं लॉंच केलेले ‘कॅच अँड रिव्होक’ हे अॅप विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेऊन आहे. यात जर कोणताही विद्यार्थी हमास किंवा इतर बंदी घातलेल्या संघटनांना पाठिंबा देताना आढळला तर त्याचा व्हिसा रद्द जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कुठल्याही संघटनेला कशा प्रकारेही पाठिंबा देऊ नये, असे आवाहन भारतीय परराष्ट्र विभागातर्फे करण्यात आले आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.