Home » Eye flu पासून असा करा बचाव

Eye flu पासून असा करा बचाव

सध्या डोळ्यांचा संसर्ग ज्याला कंजक्टिवाइटिस असे सुद्धा म्हटले जाते याची साथ सुरु झाली आहे. या समस्येमुळे डोळ्यांची जळजळ, डोळेदुखी आणि डोळे लालसर होतात.

by Team Gajawaja
0 comment
Eye flu care tips
Share

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार सुद्धा पसरले जातात. त्याचसोबत आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमजोर होते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. मात्र पावसाळ्यात वातावरण अधिक दमट आणि ओलसर राहत असल्याने सर्वाधिक बॅक्टेरिया निर्माण होतात. एका बाजूला पूर आणि मुसळधार पावसामुळे समस्या तर दुसऱ्या बाजूला आजाराने घेरले जात आहे. अशातच सध्या डोळ्यांचा संसर्ग ज्याला कंजक्टिवाइटिस असे सुद्धा म्हटले जाते याची साथ सुरु झाली आहे. या समस्येमुळे डोळ्यांची जळजळ, डोळेदुखी आणि डोळे लालसर होतात. खरंतर या आजाराचे कारण एलर्जीक रिअॅक्शन आहे. मात्र काही प्रकरणात बॅक्टेरियाचे संक्रमण सुद्धा असू शकते. या संक्रमणाची सुरुवात डोळ्यांपासून होते. मात्र काही काळानंतर दुसऱ्या डोळ्यांना सुद्धा त्याचा संसर्ग होतो. अशातच डोळ्यांच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नक्की काय करावे याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Eye flu care tips)

कसा फैलावतो हा संसर्गजन्य आजार?
खरंतर कडाक्याच्या उन्हानंतर पाऊस पडल्यानंतर वातावरणात वेगाने बदल होतात. या ऋतूत हवेसह प्रदुषण आणि ओलसरपणामुळे फंगल इंन्फेक्शनची समस्या उद्भवते. यामध्ये सर्वाधिक समस्या ही डोळ्यांसंदर्भात असते. फंगल इंन्फेक्शन वाढल्यास डोळ्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. खासकरुन त्या लोकांसाठी जे डोळ्यांसाठी कॉन्टेक्ट लेंन्स वापरतात.

काय आहेत लक्षणं?
डोळ्यांसंदर्भातील या आजारात डोळे लाल होतात. डोळ्यांमधून पाणी येण्यासह जळजळ सुद्धा होते. या समस्येच्या सुरुवाचीला पापण्यांवर पिवळसर आणि चिकट असा एक द्रव तयार होऊ लागतो. डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे जाणवू लागते. डोळ्यांतून पाणी येण्यासह खाज ही येते. जर इंन्फेक्शन अधिक वाढले गेले तर डोळ्यांच्या कार्निया पर्यंत नुकसान पोहचू शकते. (Eye flu care tips)

ही कामं करण्यापासून दूर रहा?
-वारंवार डोळ्यांना हात लावू नका
-डोळे स्वच्छ पाण्याने धुत रहा
-डोळ्यांना स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपर किंवा कापडाचा वापर करा
-वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका
-संसर्ग झालेल्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात येऊ नये
-टीव्ही-मोबाईल अधिक वेळ पाहण्यापासून दूर रहा

हेही वाचा- Dengue Symptoms and Treatment: डेंग्यू आजाराची लक्षणे कोणती? कशी घ्याल काळजी? जाणून घ्या सविस्तर

कसा बचाव कराल?
-डोळ्यांच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अँन्टिबायोटिकल औषध किंवा ल्यूबक्रेटिंग आय ड्रॉप वापरा.
-डोळे आल्यानंतर नियमित आपले हात हँन्डवॉशने स्वच्छ करत रहा
-संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका
-डोळ्यांना बर्फाने शेकवा, जेणेकरुन जळजळ आणि दुखणे कमी होईल
-संक्रमित व्यक्तीचा चश्मा, टॉवेल किंवा उशीचा वापर करु नका


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.