Eye Care Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनश्यलित झोपेचा अभाव, ताणतणाव आणि वाढतं वय यामुळे डोळ्यांच्या खाली सुरकुत्या दिसू लागतात. यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. अथवा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण तरीही कालांतराने डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि सुरकुत्या दिसू लागतात. खरंतर, डोळ्यांखाली सुरकुत्या येण्यामागे काही कारणे असू शकतात. अशातच घरच्याघरी या समस्येवर काही सोप्या आणि नैसर्गिक क्रिम्स प्रभावी ठरू शकतात. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.
1 एलोवेरा आणि बदामाचे तेल
एक चमचा एलोवेराच्या जेलमध्ये काही थेंब बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका. या दोन्ही गोष्टी एकजीव करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोळ्यांखालील सुरकुत्यांची समस्या कालांतराने दूर होण्यास मदत होईल.
2 नारळाच तेल आणि व्हिटमिन इ कॅप्सूल
1 चमचा खोबरेल तेलात १ चमचा व्हिटमिन इ कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण रात्री डोळेंच्या आजूबाजूला लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेला पोषण मिळण्यासह डोळ्यांखालील सुरकुत्यांची समस्या कमी होते.
===================================================================================================
हेही वाचा :
या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी
तूप की एलोवेरा, कोरड्या त्वचेसाठी काय उत्तम?
=======================================================================================================
3 दूध आणि मध
१ चमचा दूध आणि एक चमचा मध हे मिक्स करुन पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण १५ – २० मिनिट डोळ्यांच्या खाली लावून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेगा ग्लो येईल आणि डोळ्यांखालील सुरकुत्याही कमी होतील. (Eye Care Tips)
4 गुलाब पाणी आणि काकडी
काकडीचा रस आणि गुलाब पाणी सामान प्रमाणात घेतल्यानंतर एकत्रित करून घ्या आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या खाली लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. याशिवाय त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते.