Eye Care Tips : वाढत्या वयासह आपल्या शरिरात काही बदल दिसून येतात. त्यापैकी एक म्हणजे डोळ्यांवरही परिणाम होतो. खासकरुन वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तुम्हाला डोळ्यांचे आरोग्य राखायचे असल्यास तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक….
डोळ्यांचे चेकअप
वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही वेळोवेळी डोळ्यांचे चेकअप केले पाहिजे. यामुळे डोळ्यासंबंधित होणाऱ्या समस्येबद्दल तुम्हाला कळेल. डोळ्यासंबंधित उपचार वेळच्यावेळी करावेत असा सल्लाही नेहमी तज्ज्ञांकडून दिला जातो.
पोषण तत्त्वयुक्त डाएटचे सेवन
डाएटमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सचा समावेश करावा. यामुळे तुमचे संपूर्ण आरोग्य हेल्दी राहण्यासाठी डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते. तुमच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, हिरव्या भाज्या, मासे, पालक, संत्र सारख्या गोष्टींचा समावेश करावा.
हाइड्रेट राहा
डोळे आणि संपूर्ण आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करा. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने डोळे कोरडे होण्याची समस्या दूर होईल.
धुम्रपान करण्यापासून दूर राहा
धुम्रपान केल्याने काही आजार मागे लागतात. खासकरुन डोळ्यासंबंधित आजार वाढले जातात. जसे की, मोतीबिंदू, ऑप्टिक नर्व्ह डॅमेज, विजन लॉस अथवा आंधळेपणाची समस्या वाढली जाते. (Eye Care Tips)
स्क्रिन टाइम कमी करा
दीर्घकाळ स्क्रिन पाहिल्याने डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. स्क्रिन टाइम कमी करून तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकता. याशिवाय प्रत्येक एक तासानंतर 20 मिनिटांचा ब्रेक घ्या.