आजच्या काळात प्रत्येक जणं मोबाईल आणि लॅपटॉपसमोरच पाहायला मिळतात. या दोन गोष्टी मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. कामाच्या निमित्ताने आपण तासंतास यांचा वापर करत आहोत. मात्र या दोन गोष्टींचा अति आणि सतत वापर केल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या डोळ्यांवर होत आहे. मोबाईल आणि लॅपटॉप वापरताना आपल्याला याचा अंदाज येत नाही. कामामुळे आपण आपला जास्तीत जास्त वेळ याच गोष्टींचा वापर करण्यात घालवतोय. आता आपण काम तर बंद करू शकत नाही, मात्र यापासून डोळ्यांचे जे नुकसान होते, जो त्रास होतोय तो नक्कीच कमी करू शकतो. (Eye Care Tips)
टीव्ही स्क्रीन, मोबाईल फोन आणि लॅपटॉपसमोर जास्त वेळ घालवू नये असे आपण कायम ऐकत असतो. घरातील लोकं कायम आपल्याला असे सांगतात. याचे कारण, यामुळे डोळे खराब होण्याची भीती असते. बराच वेळ तुम्ही लॅपटॉप किंवा कंम्प्यूटरसमोर बसल्याने त्यातून निघणाऱ्या निळ्या किरणांमुळे तुमच्या आरोग्यावर तसेच डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या खरे आहे. आजच्या डिजिटल युगात तुम्ही सतत निळा प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या स्क्रीनसमोर बसतात. पण, हे हानिकारक ठरू शकतो. (Health)
डिजिटल डिव्हाइसेस म्हणजेच मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशाला हाय इंटेंसिटी व्हिजिबिलिटी लाइट (HEV) म्हणतात. याचा अर्थ उच्च-ऊर्जेचा दृश्य प्रकाश असा होतो. निळ्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असते, जी दृश्य प्रकाश स्पेक्ट्रमचा भाग आहे. हा इतका हलका रंग आहे की आपण उघड्या डोळ्यांनीही पाहू शकतो. हे लॅपटॉपसह अनेक डिजिटल डिव्हाइसमधून बाहेर येते. निळ्या प्रकाशाचे काही फायदे असू शकतात, परंतु निळ्या प्रकाशाचा दीर्घकाळ संपर्क डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतो. सूर्यप्रकाशातही निळा प्रकाश असतो. (Eye Care)
यामुळे धूसर दृष्टी, जवळच्या किंवा दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण, डोकेदुखी आणि डोळ्याभोवती वेदना, मान दुखणे, खांदे दुखणे, डोळे दुखण्याची तक्रार आदी अनेक त्रास होतात. शिवाय कम्प्यूटरसमोर बसून काम करण्याचा अजून एक मोठा तोटा म्हणजे डोळा दुखणे आणि ताण येणे. यासोबतच डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, अंधुक दिसणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. या सिंड्रोममध्ये, डोळ्यांच्या प्रत्येक भागात अश्रू किंवा द्रवपदार्थाचा प्रसार कमी होतो. त्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होतात. डोळ्यांना खाज येण्याची समस्याही वाढू शकते. (Marathi)

डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपाय
डोळ्यांची उघडझाप करा
आठ नऊ तास सतत लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसून काम करत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी ५ ते १० मिनिटं डोळ्यांची उघडझाप करून व्यायाम करू शकता. हा व्यायाम केल्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन आराम मिळेल. (Marathi News)
नियमित डोळ्यांची तपासणी
आपले डोळे नियमितपणे तपासा. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्यांवर वेळेवर उपचार करणे सोपे होईल. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चश्म्यांचा वापर करा. कधी कधी चूकीच्या नंबरचा चश्मा लावल्यामुळे देखील डोळ्यांच्या तक्रारी वाढतात. (Top Marathi News)
लॅपटॉप आणि डोळ्यांमध्ये योग्य अंतर
अनेक जण लॅपटॉपचा वापर करताना तो मांडीवर घेऊन बसतात. त्यामुळे लॅपटॉप आणि डोळ्यांमधील अंतर कमी होते आणि आपण फार जवळून लॅपटॉपची स्क्रिन पाहतो. यामुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे लॅपटॉप आणि डोळ्यांमध्ये अंतर राखणे फार गरजेचे आहे. (Latest Marathi HEadline)
डोळ्यांवर थंड पाण्याचा हबका मारा
काम करताना मध्येच छोटा ब्रेक घेऊन डोळ्यांवर आणि तोंडावर थंड पाणी मारा. काम संपल्यावर तोंडावर/डोळ्यांवर गार पाण्याचा हबका मारल्यास किंवा गार पाण्याने तोंड धुतल्यास डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि डोळे चुरचुरणं थांबतं. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होऊन थकवा दूर होतो आणि ताजंतवानं वाटेल.(Top Stories)
डोळ्यांना तेल लावा
रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यांना खोबरेल तेल आणि बदाम तेल मिक्स करून लावा. यामुळे डोळ्यांना आराम आणि थंडपणा मिळेल. रात्री लावलेले तेल सकाळी धुवावे. (Top Trending Headline)
नैसर्गिक ओलावा
डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते. (Latest Marathi News)
=========
Weight Loss Tips : रात्री जेवल्यानंतर करा ही 4 कामे, वेगाने वजन होईल कमी
थंडीत कोरड्या ओठांना थुंकी लावून ओलसर करता? वाचा Lip Licking Syndrome चे नुकसान
=========
अँटी ग्लेअर स्क्रीन वापरा
लॅपटॉप आणि स्मार्टफोनमध्ये अँटी ग्लेअर स्क्रीन वापरा. जर फोनमध्ये अँटी ग्लेअर स्क्रीन नसेल, तर अँटी ग्लेअर लेन्स किंवा चष्मा लावले जाऊ शकतात. तुमचा लॅपटॉप, फोन आणि तुमचा चेहरा यामध्ये किमान १६ ते १८ इंच अंतर ठेवा. अंधारात स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरू नका. रात्री फोन डार्क मोडमध्ये ऑन करून वापरा. स्मार्टफोन स्क्रीनचा ब्राइटनेस नेहमी संतुलित ठेवा म्हणजे जास्त किंवा कमी नाही. (Top Marathi Headline)
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात, जे डोळ्यांची जळजळ आणि सूज कमी करतात. कडुलिंबाची पाने उकळून पाणी थंड करा आणि त्याने डोळे धुवा याने डोळ्यांना आराम मिळेल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
