Eye care- आजकाल आपण खुप वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर वेळ घालवत असल्याने बहुतांश जणांना सध्या डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. काहींना डोळे चुरचुरणे, डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे अशा समस्या होत आहे. परंतु नोकरी करत असलेल्या व्यक्तीला कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम करणे भागच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अधिक वेळ लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करा. भूक लागली म्हणून वाट्टेल ते खाणे सोडून द्या. अशा गोष्टींचा तुमच्या खाण्यापिण्यात समावेश करा जे तुमच्या डोळ्यांची काळजी घेतली. म्हणून आम्ही तुम्हाला अशा काही हेल्थी फूड्स संदर्भात सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची काळजी तर घेतली जाईलच पण काही समस्यांपासून सुद्धा तुम्ही दूर रहाल.
-पालेभाज्यांचे सेवन करणे काही मुल, तरुण किंवा वृद्धांना आवडत नाही. परंतु त्यामध्ये विटामिन, लोह आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या डोळ्यांसह संपूर्ण शरिराची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. तर पत्तेदार सागमघ्ये मोतिबंदू सारखी डोळ्यांना होणारी समस्या दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला डोळ्यांनी व्यवस्थित आणि स्पष्ट पहायचे असेल तर नक्कीच पालेभाज्या खा.
हे देखील वाचा- खाल्ल्यानंतर कधीच करु नका ‘या’ चुका, आरोग्याला बसेल फटका
-दुसरी गोष्ट म्हणजे अंडी खा. अंड हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातेच पण तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही ते तितकेच फार महत्वाचे आहे. अंड्यात अँन्डिऑक्सिडंट असतात. त्याचसोबत तुमच्या शरिराला पुरेशा प्रमाणात अंड्यातून प्रोटीन मिळते. त्यामुळे नाश्त्यात अंड्याचे सेवन जरुर करा.
-सुकामेवा मधील बदाम हे उत्तम ऑप्शन आहे जे तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करेल. कारण बदामामध्ये विटामिन ई हे पुरेशा प्रमाणात असते. डोळ्यांना स्पष्ट दिसण्यासाठी तुम्ही दररोज दोन-तीन बदाम खाल्ले पाहिजेत.(Eye care)
-डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टॉमेटो सुद्धा खुप फायदेशीर आहे. कारण टोमॅटो मध्ये ल्युटिन, लाइकोपिन नावाचे तत्व असतात जे तुमच्या डोळ्यांची काळजी घेते. तुम्हाला अधिक स्पष्ट दिसण्यासाठी टॉमेटो खाण्याचा काही वेळेस सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त सूर्याच्या हानिकारक युवी किरणांपासून होणाऱ्या नुकसानीपासून सुद्धा बचाव करते.
त्याचसोबत तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ नये असे वाटत असेल तर भाज्यांमध्ये ब्रोकलीचा सुद्धा समावेश करा. कारण रेटिनाला कोणत्याही प्रकारच्या रेडिकल डॅमेजपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रोकली ही फायदेशीर ठरु शकते. भाज्यांमध्ये असलेले सल्फोराफेन हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास नेहमीच मदत करते.