Eye Beauty Tips : चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांमुळे अधिक खुलले जाते. पण सुंदर दिसत असलो तरीही डार्क सर्कलच्या समस्येमुळे सौंदर्य कमी झाल्यासारखे काहींना वाटते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मिळतात जे तुम्हाला डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करू शकतात. अशातच घरच्याघरी नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन तुम्ही आय पॅक तयार करून डोळ्यांचे सौंदर्य वाढवू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
काकडीचा आय पॅक
काकडीमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेला चमक येते आणि डार्कनेसची समस्या कमी होते. काकडीमुळे डोळ्यांना थंडावा आणि फ्रेश ठेवण्याचे गुणधर्म असल्याने डोळ्यांना आराम मिलतो. जर तुम्ही काकडीचे स्लाइस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आलेली सूज कमी होण्यासह थंडावा मिळेल. काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स तुमच्या त्वचेला हाइट्रेड ठेवण्याचेही काम करतात.
बटाट्याचा आय पॅक
बटाट्यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे डार्क सर्कलची समस्या कमी करण्यास बटाट्याचा आय पॅक कामी येऊ शकतो. यासाठी बटाट्याचे पातळ गोलाकार काप करुन ते डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांभोवती आलेले डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.
ग्रीन टी बॅग्स
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिटेंड्स भरपूर प्रमाणात असता. त्वचेला फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही ग्रीन टी चा वापर करू शकता. यासाठी फ्रीजमध्ये थोडावेळ ग्रीन टी बॅग ठेवा आणि नंतर डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आलेली सूज आणि थकवा कमी होईल.
गुलाब पाणी
गुलाब पाण्यामुळे त्वचा रिलॅक्स आणि फ्रेश राहण्यास मदत होते. गुलाब पाणी नैसर्गिक मॉइश्चराइजर आहे. डोळ्यांजवळी त्वचा कोरडी असल्यास तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शतता. यासाठी एका कॉटन पॅडवर गुलाब पाण्याचे काही थेंब टाका. यामुळे डोळ्यांना येणारी सूज कमी होण्यासह थंडावाही मिळेल. (Eye Beauty Tips)
दही आणि हळदीचा पॅक
एक चमचा दह्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावा आणि 15 मिनिटांसाठी अशीच ठेवा. यानंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. यामुळे डार्क सर्कलची समस्या कमी होईल.