काही लोकांना गाड्यांची फार आवड असते. तर काहींना गाड्यांच्या क्रमांकाचे प्रचंड वेड असते. असेही काही लोक असतात ज्यांना या दोन्ही गोष्टी आवडतात. त्यापैकीच एक व्यक्ती म्हमजे बलविंदर साहनी. हे तिसऱ्या श्रेणीतील व्यक्ती आहेत. ते दुबईत राहत असून त्यांच्याकडे जवळजवळ शेकडो गाड्या आहेत. ते RSG ग्रुपचे मालक आहेत. एखाद्याकडे ऐवढ्या गाड्या असणे हे श्रीमंतीचे लक्षण आहे. पण त्याचे क्रमांक खास ठेवणे हे त्यापेक्षाही काही पटींनी भन्नाट आहे. (Expensive number plate)
दुबईत राहणारे भारतीय वंशाचे उद्योगपती साहनी यांच्याकडे खुप गाड्या आहेत. यामध्ये काही रोल्स रॉयसचा सुद्धा समावेश आहे. याच रोल्स रॉयस मध्ये एक नंबर प्लेट ही ३.३ कोटी दिहरमची आहे. भारतीय करेंसीमध्ये त्याची किंमत ६० कोटी रुपये असावी. त्या प्लेटचा क्रमांक D5 असा आहे. खरंतर तर ते पाच क्रमांकाला आपला लकी नंबर मानतात. हे असे पहिल्यांदाच झाले नसेल जेव्हा सहानी यांनी ऐवढी महागडी नंबर प्लेट खर्च करून घेतली.
साहनी यांच्याकडे आधीपासूनच एक महागडी नंबर प्लेट आहे. या प्लेटचा क्रमांक आहे 05.या प्लेटसाठी त्यांनी २.५ कोटी दिहरम खर्च केले होते. भारतीय करेंसीमध्ये याची किंमत ४५.३ कोटी रुपयांच्या आसपास असेल. मात्र युनिक नंबर प्लेट असावी असे त्यांना नेहमीच वाटते. ६० कोटींची प्लेट खरेदी केल्यानंतर त्यांना आपले प्लेट कलेक्शन अधिक वाढवायचे आहे. त्यांना अधिक महागडी नंबर प्लेट खरेदी करायची आहे. (Expensive number plate)
खरंतर सहानी यांना D5 नंबर प्लेट बोली लावून खरेदी करावी लागली होती. या ऑक्शनचे आयोजन दुबई रोड अॅन्ड ट्रांसपोर्टने केले होते. ८० प्लेटसाठी ३०० लोकांकडून बोली लावली जात होती. यामध्ये त्यांनी ६० कोटी रुपयांच्या रक्कमेवर ही प्लेट जिंकली. ही या ऑक्शनच्या इतिहासातील सर्वाधिक महागडी बोली आहेच. पण त्याचसोबत जगातील सर्वाधिक महागडी नंबर प्लेटसुद्धा ठरली आहे. या लिलावाचे आयोजन प्रत्येक २ महिन्यांनी केले जाते.
हेही वाचा- युरोपवर येणार मोठं संकट; बाबा वेंगाची भविष्यवाणी