Home » जगातील ‘या’ बड्या व्यक्तींना घटस्फोट पडलाय महागात

जगातील ‘या’ बड्या व्यक्तींना घटस्फोट पडलाय महागात

by Team Gajawaja
0 comment
Expensive Divorce
Share

लग्नानंतर घटस्फोट घेणे हे प्रत्येक विवाहित दांपत्याच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट अनुभव असतो. कारण खुप वर्ष एकत्रित राहिल्यानंतर विभक्त होत असल्याचे त्याच्या आपल्या मनावर परिणाम होते. परंतु घटस्फोट ही विवाहित कपल्स मधील एक कायदेशीर प्रोसेस आहे. ज्यामध्ये विभक्त झाल्यानंतर पोटगी म्हणून नवऱ्याकडून एक निश्चित रक्कम मिळते. मात्र जगात असे काही घटस्फोट झाले आहेत ज्यांची जगभर चर्चा झालीच. पण त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान ही झाले. तर जाणून घेऊयात जगातील कोणत्या बड्या व्यक्तींना त्यांच्या घटस्फोट ठरलाय महागात. (Expensive Divorce)

चर्चेत ठरला जेफ बेजोस यांचा घटस्फोट
ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनचे बॉस जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नी मॅकेंजी मध्ये झालेला घटस्फोट हा जगभरात चर्चेत राहिला होता. २०१९ मध्ये जेफ बेजोस यांच्या पत्नी मॅकेंजी बेजोस यांचा घटस्फोट झाला आणि हा जगातील सर्वाधिक महागडा घटस्फोट होता. यामध्ये जेफ यांना माजी पत्नी मॅकेंजी यांना २.७५ लाख कोटी रुपये द्यावे लागले होते. ऐवढी रक्कम मिळाल्यानंतर मॅकेंजी बेजोस जगातील २२व्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनल्या होत्या.

MeToo कॅम्पेननंतर पत्नीने सोडली साथ

हॉलिवूड मधील सिनेमा मुगलच्या नावाने ओळखले जाणारे हार्वे विंस्टीन यांचा घटस्फोट ही चर्चेत राहिला. अभिनेत्री आणि महिला कलाकारांनी २०१७ मध्ये मीडिया मॅग्नेट यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. ज्यामुळे मी टू कॅम्पेनला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची फॅशन डिझाइनर जॉर्जीया चॅपमॅनने हार्वे विंस्टीन यांना घटस्फोट दिला. डिवोर्स सेटलमेंट कोटी रुपयांना झाला. ज्यावर गेल्या वर्षात अखेरच्या महिन्यात सहमती झाली. ही रक्कम जवळजवळ $15-$20 मिलियन होती.

२७ वर्षानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा विभक्त
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल जाहीर केले तेव्हा लोक असा विचार करु लागले की, जगातील सर्वाधिक श्रीमंत दांपत्य एकूण संपत्तीची वाटणी कशी करणार? अखेर एक मताने दोघांनी गेल्याच वर्षात घटस्फोट घेतला.(Expensive Divorce)

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर मेलिंडा फ्रेंच गेट्सला विविध कंपन्यांमध्ये कमीत कमी $6.3 बिलियन स्टॉक मिळाले होते. असे सांगितले जाते की, मेलिंडा गेट्सने या शेअर्स मधील एक तृतीयांश हिस्सा विक्री केला आहे.

मस्क यांचे ३ वेळा लग्न आणि घटस्फोट
ट्विटर आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांचे खासगी आयुष्य नेहमीच वादात राहिली. कारण त्यांनी ३ वेळा लग्न केले आणि दोन पत्नींना तलाक दिला. बिझनेस इनसाइडरच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये एलन मस्क यांनी असे सांगितले की, कशा पद्धतीने ते आपल्या मुलांना दोघ सांभाळतात. त्याचसोबत त्यांच्या नॅनीचा खर्च करतात. त्यांनी असे म्हटले की, ते घटस्फोटानंतर जस्टिनचे कपडे, चप्पल आणि अन्य गोष्टींसाठी प्रत्येक महिन्याला १६ लाख ४० हजार रुपये पाठवतात. एलन मस्क यांनी दावा केला होता की, लग्न मोडल्यानंतर त्यांना १ कोटी ४० लाख रुपये प्रत्येक महिन्याला कायदेशीर बिलांसाठी भरावे लागतात.

मस्क यांनी दुसऱ्यांदा अभिनेत्री तलुलाह रिले हिच्याशी लग्न केले आणि दोन वेळा घटस्फोट घेतला. २०१२ मध्ये पहिल्या बायकोपासून विभक्त झाल्याने रिले कथित रुपात ३४ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे गेले होते. दरम्यान, त्या दोघांमधील वाद मिटल्यानंतर पुन्हा त्यांनी लग्न केले होते. त्यानंतर मस्क यांनी २०१५ मध्ये पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यावेळी दोघांनी विभक्त होण्यासाठी १ अरब ३५ कोटी रुपये पेमेंट करण्यास सहमती व्यक्त केली होती.

हे देखील वाचा- किम जोंग 36 दिवसांसाठी होते गायब; काय असेल यामागचं कारण

घटस्फोटासाठी द्यावे लागले होते १.२ बिलियन डॉलर
बर्नी एक्लेस्टोन, माजी फॉर्मूला १ बॉस, २००९ मध्ये लग्न केल्यानंतर २४ वर्षानंतर क्रोएशियाई अरमानी मॉडेल स्लाविका रेडिक पासून वेगळे झाले. द सन यांच्या रिपोर्टनुसार दांपत्याने कराराबद्दल काहीच सांगितले नाही. पण असे मानले जाते की, एक्लेस्टोन यांनी माजी पत्नीला जवळजवळ १.२ बिलियन डॉलर म्हणजेच ९९ अरब रुपये दिले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.