गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणूकीनंतर टेलिव्हिजनवर आणि डिजिटल मीडियात एक्झिट पोलच्या माध्यमातून असा अनुमान सांगितला जातो की, कोणत्या पक्षाचा विजय होऊ शकतो. तसेच कोणाला किती अधिक मत मिळतील. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल संदर्भातील नियम कठोर केले गेले आहेत. पण बहुतांश देशात असे सुद्धा आहे की, जेथे एक्झिट पोलवर आंशिंक किंवा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. (Exit Polls)
भारतात काही वर्षांपर्यंत निवडणूकीच्या टप्प्यांमध्येच मीडिया एक्झिट पोल दाखवल्यानंतर जेव्हा तक्रारी येऊ लागल्या त्यानंतर निवडणूक आयोगाने नियम कठोर करत गाइडलाइन्स जाहीर केलया. त्यामध्ये एक्झिट पोलचे टेलिकास्ट हे अंतिम टप्प्यानंतरच दाखवावेत.
भारतात एक्झिट पोलचा इतिहास ०३ दशक जुना
एक्झिटट पोल संदर्भात निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्स आणखी काही सांगतात. दरम्यान, आपल्या देशात एक्झिट पोलचा इतिहास हा ०३ दशकापेक्षा अधिक जुना नाही आहे. भारतीय प्राइव्हेट न्यूज चॅनल सुरु झाल्यानंतर एक्झिट पोल सारख्या गोष्टी समोर आल्या. पण अशा प्रकारचे अनुमान अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये अधिक दीर्घकाळापासून केले जातात.

काही देशांमध्ये एक्झिट पोलवर बंदी
भारताताची गोष्ट आहेच पण काही असे देश आहेत जेथे एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे किंवा कठोर नियम लागू केले आहेत. युरोपात १६ देश आहेत जेथे ओपिनियन पोलच्या रिपोर्टिंगसाठी बंदी आहे. ही बंदी निवडणूकीच्या २४ तासांपूर्वी ते एका महिन्यापर्यंत असते.
फ्रांन्समध्ये काय होते?
फ्रांन्समध्ये मतदानाच्या दिवसाच्या २४ तासांपूर्वी तुम्ही निवडणूकीसंदर्भात कोणतेही मतं मांडली जाऊ शकत नाहीत. यापूर्वी ही बंदी ७ दिवसांची होती, हे १९७७ पर्यंत लागू करण्यात आले होते. पण नंतर एका कोर्टाने त्यांना २४ तासांपर्यंत मर्यादित केले. कोर्टाने असे म्हटले की, 7 दिवसांची बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. (Exit Polls)
ओपिनियन आणि एक्झिट पोलला ‘या’ देशांमध्ये ७ दिवस आधीच बंदी
इटली, स्लोवाकिया आणि लक्जमबर्ग मध्ये कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलवर निवडणूकीच्या ०७ दिवस आधीच बंदी घातली जाते.
ब्रिटेनमध्ये काय होते?
ब्रिटेनमध्ये ओपिनियन पोल संदर्भात कोणतेही बंदी नाही. पण एक्झिट पोलचा अंदाज हा मतदान पूर्ण होत नाही तो पर्यंत देऊ शकत नाहीत.
जर्मनीत गुन्हा
जर्मनीत एक्झिट पोलला गुन्हा मानला जाातो. जर ते निवडणूकीच्या मतदानापूर्वीच सुरु केल्यास.
हे देखील वाचा- परदेशातून पैसे पाठवण्यामध्ये भारत सर्वात पुढे, UN रिपोर्ट
अमेरिकेत मीडिया काय करते?
अमेरिकेत ओपिनियन पोल्स कधी ही देऊ शकतो. एक्झिट पोलच्या अंदाज हा तेथे सुद्धा निवडणूकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर मीडियाद्वारे दिले जातात.